Lunar eclipse and solar eclipse 2026 time : यंदाच्या वर्षीही अवकाशात अद्भूत खगोलीय घटना घडणार आहेत आणि खगोलप्रेमींसाठी खास पर्वणी घेऊन येणार आहेत. यात ग्रहण तर नेहमीच अभ्यासकांसह खगोलप्रेमींसाठी कुतुहलाचा आणि अभ्यासाचा विषय असतोच. यावर्षी ऑगस्ट महिन्यात सर्वात मोठं सूर्यग्रहण असणार आहे. तर त्याच महिन्यात चंद्रग्रहणाचाही नजारा पाहायला मिळणार आहे. पाहूया खगोलीय घटनांवरचा हा एक ग्लोबल रिपोर्ट.
वर्षातील सर्वात मोठं सूर्यग्रहण...l biggest solar eclipse of the year 2026
2026 वर्ष सुरू होताच फेब्रुवारीमध्येच वर्षातलं पहिलं सूर्यग्रहण पार पडलं. अर्थात ते भारताप्रमाणे जगातील अनेक ठिकाणी दिसलं नाही. आता सूर्यग्रहणाची पर्वणी पुन्हा चालून येणार आहे ती ऑगस्ट महिन्यात. १२ ऑगस्टला सूर्यग्रहण आहे. हे पूर्ण सूर्य ग्रहण असणार आहे. अर्थात पूर्ण ग्रहणाची स्थिती ही काही मिनिटंच टिकते. मात्र संपूर्ण ग्रहण प्रक्रिया बराच काळ चालू राहते आणि यंदा ती अधिक काळ असणार आहे. १२ ऑगस्टला रात्री ९ वाजून ४ मिनिटांनी ग्रहणाला सुरुवात होईल. तर १३ ऑगस्टला पहाटे ४ वाजून २५ मिनिटांनी ग्रहण संपणार आहे. आता हे ग्रहण जेव्हा असेल त्यावेळी भारतात रात्र असणार आहे, त्यामुळे भारतातील खगोलप्रेमींना हे ग्रहण पाहता येणार नाही. त्यामुळे ग्रहणकाळातील सूतककाळ भारतात पाळावा लागणार नाही. मात्र हे ग्रहण या वर्षातील सर्वात मोठं आणि दुर्मिळ ग्रहण ठरणार आहे.
नक्की वाचा - Chandra Grahan Effect : 15 दिवसात 2 ग्रहणं, महाभारतातही उल्लेख, कुणाला धोका? पुढील 6 महिने काळजी घ्या
कुठे दिसणार?
ग्रीनलँड, आईसलँड, स्पेन, आर्क्टिक प्रदेश
भारतात सूर्यग्रहण का दिसणार नाही? l (surya grahan 12th August 2026)
भारतात सूर्यग्रहणावेळी रात्र
भारतता सूतक काळ असेल का?
भारतात सूर्यग्रहण दिसणार नाही, त्यामुळे सूतककाळ लागणार नाही
चंद्रग्रहण कधी आहे? भारतातून चंद्रग्रहण दिसणार का? l lunar eclipse be visible from India?
ऑगस्ट महिन्यातच चंद्रग्रहणही दिसणार आहे. २८ ऑगस्टला चंद्रग्रहण आहे. यावेळी चंद्र रक्ताळलेल्याप्रमाणे दिसेल. याला ब्लड मून असं म्हणतात. यावेळी चंद्राचा ९३ टक्के भाग पृथ्वीच्या छायेखाली असेल. २८ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजून ५३ मिनिटांनी ग्रहणाची प्रक्रिया सुरू होईल आणि दुपारी १२ वाजून ३५ मिनिटांनी संपेल. थोडक्यात पाच तास 39 मिनिटं ग्रहण असेल. मात्र हेही ग्रहण भारतातून दिसणार नाही, कारण ग्रहणावेळी भारतात सकाळ झालेली असेल. हे ग्रहण अमेरिका, युरोप आणि आफ्रिकेच्या काही भागांमध्ये दिसेल.
चंद्रग्रहण कधी? l When is the lunar eclipse?
28 ऑगस्ट 2026 (chandra grahan 28th August 2026)
किती वाजता?
सकाळी 6:53 ते दुपारी 12:35
कुठे दिसणार?
अमेरिका,युरोप, आफ्रिकेचा काही भाग
भारतात का दिसणार नाही?
ग्रहणावेळी भारतात सकाळ
यंदा १७ फेब्रुवारीला वर्षातलं पहिलं सूर्यग्रहण झालं मात्र तेही भारतातून दिसलं नाही. तर पहिलं चंद्रग्रहण ३ मार्च रोजी होळीच्या दिवशी दिसलं मात्र भारतात ते पूर्व भारतातून पाहता आलं.
भारतात यंदा कोणते ग्रहण दिसणार आहेत का?
गेलं चंद्रग्रहण भारतातील अनेक ठिकाणांहून पाहता आलं होतं. मात्र एक वाईट बातमी म्हणजे यंदाचं चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण दोन्हीही भारतातून दिसणार नाहीत. मात्र तरी इतरत्र अभ्यासकांना ग्रहणकाळात इतर अनेक साधनांच्या माध्यमातून अभ्यास करता येईल आणि अद्भूत खगोलीय घटना अनुभवता येऊ शकते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world