- वर्ष 2026मधील दुसरे सूर्यग्रहण 12 ऑगस्ट रोजी श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीला असणार आहे
- हे खग्रास पूर्ण सूर्यग्रहण रात्री 9.04 वाजता सुरू होऊन दुसऱ्या दिवशी पहाटे 4.25 वाजेपर्यंत असेल.
- भारतात या सूर्यग्रहणाचे दर्शन होणार नाही त्यामुळे सूतक काळही भारतात लागू होणार नाही
Surya Grahan 2026: सूर्यग्रहण ही हिंदू धर्म आणि ज्योतिषशास्त्रामध्ये एक महत्त्वाची खगोलीय घटना मानली जाते. जेव्हा जेव्हा सूर्यग्रहण लागते, तेव्हा लोक त्याचे धार्मिक, ज्योतिषीय आणि वैज्ञानिक पैलू जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. वर्ष 2026 मध्ये लागणारे दुसरे आणि शेवटचे सूर्यग्रहण देखील विशेष मानले जात आहे. हे ग्रहण ऑगस्ट महिन्यात लागणार असून धार्मिक दृष्टिकोनातून अनेकांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. जाणून घेऊया ऑगस्ट 2026 मध्ये लागणाऱ्या सूर्यग्रहणाशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी-
वर्षातील दुसरे सूर्यग्रहण केव्हा लागणार?
वर्ष 2026 चे दुसरे सूर्यग्रहण 12 ऑगस्ट 2026 रोजी लागणार आहे. हे ग्रहण श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीला असेल. याच दिवशी आषाढ महिन्याती अमावस्या देखील येत आहे, ज्यामुळे या ग्रहणाचे धार्मिक महत्त्व आणखी वाढले आहे.
ग्रहणाची वेळ काय असेल?
भारतीय वेळेनुसार, हे सूर्यग्रहण 12 ऑगस्टच्या रात्री 9 वाजून 4 मिनिटांनी सुरू होईल आणि 13 ऑगस्टला पहाटे 4 वाजून 25 मिनिटांपर्यंत राहील. हे खग्रास (पूर्ण) सूर्यग्रहण असेल, जे जगाच्या काही भागांत स्पष्टपणे पाहिले जाऊ शकेल.
(नक्की वाचा : Adhik Maas 2026: अधिक मासात जावयाला 33 अनारसे दान का करतात? लेकीच्या संसारात काय बदलतं? ज्योतिषी कुलकर्णींनी सांगितलेले शास्त्र वाचा)

Photo Credit: NDTV Marathi
सूर्यग्रहण भारतात दिसणार का?हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. धार्मिक मान्यतांनुसार, जेव्हा ग्रहण भारतात दिसत नाही, तेव्हा त्याचा सूतक काळ (वेध काळ) देखील मान्य केला जात नाही. त्यामुळे भारतात राहणाऱ्या लोकांसाठी सूतकाशी संबंधित नियम लागू होणार नाहीत.
(नक्की वाचा : Adhik Maas 2026: अधिक मासात दीपदान का करावे? 9 प्रमुख तिथीसह 33 संख्येचं महत्त्व, वाचा वेदमूर्तींची माहिती)
हिंदू धर्मात ग्रहण काळाला आध्यात्मिक साधनेची वेळ मानले जाते. या काळात देवाचे ध्यान, मंत्र जाप आणि पूजा-अर्चा करणे शुभ असते. याव्यतिरिक्त ग्रहणाच्या वेळी अन्न शिजवणे आणि खाणे वर्ज्य मानले जाते. ग्रहण संपल्यानंतर गंगास्नान किंवा स्नानाच्या पाण्यात गंगाजल मिक्स करून स्नान करण्याचा सल्ला दिला जातो.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world