जाहिरात

Pigeons Problems : गुटर गूं थांबवा! कबूतरांना घरातून कायमचे पळवून लावणारे 'हे' आहेत A to Z सोपे उपाय

Ways to Get Rid of Pigeons :तुम्ही शहरात राहत असाल, तर रोज सकाळी खिडकीवर होणारे 'गुटर गूं' आणि छतावर जमा होणारे कबूतर ही तुमच्यासाठी एक रोजची गोष्ट असेल.

Pigeons Problems : गुटर गूं थांबवा! कबूतरांना घरातून कायमचे पळवून लावणारे 'हे' आहेत A to Z सोपे उपाय
Ways to Get Rid of Pigeons : कबूतरांना तुमच्या घरापासून दूर ठेवण्यासाठी काही अतिशय प्रभावी मार्ग आहेत.
मुंबई:

Ways to Get Rid of Pigeons : तुम्ही शहरात राहत असाल, तर रोज सकाळी खिडकीवर होणारे 'गुटर गूं' आणि छतावर जमा होणारे कबूतर ही तुमच्यासाठी एक रोजची गोष्ट असेल. अनेकांना हे पक्षी गोंडस वाटतात, पण बहुतांश लोकांसाठी मात्र ते एक मोठी डोकेदुखी ठरतात. कबूतरांनी एकदा का तुमच्या घरात किंवा बाल्कनीमध्ये वस्ती केली की, भिंतींवर डाग, छतावर आणि बाल्कनीमध्ये घाण तसेच सगळीकडे पडलेले पंख यांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते.

तुम्ही त्यांना कितीही वेळा हाकलून लावले, तरी ते पुन्हा तिथे येतातच. त्यांना कायमचे दूर ठेवण्यासाठी तुम्ही अनेक उपाय करून पाहिले असतील, पण तरीही यश मिळाले नसेल. काळजी करू नका, कबूतरांना तुमच्या घरापासून दूर ठेवण्यासाठी काही देसी आणि अतिशय प्रभावी मार्ग आहेत, ज्यांचा वापर करून तुम्ही ही समस्या सोडवू शकता.

कबूतरांना दूर ठेवण्यासाठी प्रभावी पद्धती

कबूतर तसे फार हुशार नसले तरी ते अतिशय सतर्क असतात. त्यांना काही गोष्टी अजिबात आवडत नाहीत आणि त्याचाच वापर करून तुम्ही त्यांना सहज दूर ठेवू शकता.

( नक्की वाचा : Cab Driver : 'भैय्या' म्हणू नका... ' कॅब ड्रायव्हरने कारमध्ये प्रवाशांसाठी लावले 6 'कडक' नियम, चर्चा तर होणारच )
 

तीव्र आवाज आणि चकचकीत वस्तू

कबुतरांना तीव्र आवाज आणि चमकदार गोष्टींचा खूप त्रास होतो. याचा फायदा घ्या!

तुम्ही तुमच्या गच्ची किंवा बाल्कनीमध्ये जुन्या CDs,ॲल्युमिनियम फॉइल किंवा चकाकणारी टेप (Reflective Tape) लटकवू शकता. हवेत हलणाऱ्या या वस्तू जेव्हा प्रकाश परावर्तित करतात, तेव्हा त्यांच्या डोळ्यांवर थेट प्रकाश पडतो आणि त्यांना तिथे बसण्याचे धाडस होत नाही.

शिकारी पक्ष्यांचे पुतळे वापरा

कबुतरांना त्यांच्या नैसर्गिक शिकारींची म्हणजेच गरुड किंवा घुबड यांची भीती वाटते. गरुड किंवा घुबडाचे *प्लॅस्टिकचे पुतळे* किंवा मॉडेल बाल्कनीमध्ये किंवा छतावर ठेवा. त्यामुळे कबूतरांना वाटते की, जवळपास कोणीतरी शिकारी पक्षी फिरत आहे आणि ते त्वरित ती जागा सोडून पळून जातात.

( नक्की वाचा : कर्जमुक्तीचा महामंत्र! 6 वर्षांत 53 लाखांचे Home Loan फेडणाऱ्या इंजिनियरने सांगितल्या 'या' 6 खास टिप्स )
 

कबूतरांना कोणत्या वासाचा तिटकारा?

कबुतरांना तीव्र आणि तिखट वास अजिबात आवडत नाही. तुम्ही काही नैसर्गिक सुगंधाचा वापर करून त्यांना दूर ठेवू शकता.  लिंबू,कापूर,व्हिगेनर लसूण किंवा  मिरची यांचा तीव्र वास कबुतरांना सहन होत नाही.तुम्ही कापसाचे छोटे गोळे घ्या आणि त्यावर व्हिनेगर किंवा लिंबाचा रस टाकून ते छताच्या किंवा खिडकीच्या कडेला ठेवा. हा साधा उपाय खूप परिणामकारक ठरतो.

याशिवाय, बाजारात अनेक बर्ड रिपेलेंट स्प्रे (Bird Repellent Spray) उपलब्ध आहेत. यामध्ये अशाच प्रकारच्या तीव्र वासांचा वापर केलेला असतो. याचा वापर केल्यास कबूतरांना कोणतेही नुकसान न पोहोचवता ते आपोआप त्या जागेपासून दूर राहतात आणि तुमची बाल्कनी गलिच्छ होण्यापासून वाचते.

दाणे देणे बंद करा

तुम्हाला कबूतरांना तुमच्या छतावर वारंवार येण्यापासून थांबवायचे असेल, तर तिथे दाणे टाकणे पूर्णपणे थांबवा. तरीही तुम्हाला त्यांना खायला घालायचे असेल, तर घरापासून दूर आणि *स्वच्छ* जागा निवडा, जिथे त्यांनी वस्ती केली तरी तुम्हाला अडचण होणार नाही.

बाजारात उपलब्ध असलेल्या उपाययोजना

कबूतर कायमचे पळवून लावण्यासाठी बाजारात अनेक कबूतर निवारक औषधे (Pigeon Repellents) उपलब्ध आहेत. पिजन रिपेलेंट (Pigeon Repellent) हे सर्वात उत्तम निवारक मानले जाते, जे वापरल्यानंतर कबूतर तुमच्या बाल्कनीमध्ये येत नाहीत. तुम्हीही जर कबूतरांच्या त्रासाला कंटाळले असाल, तर तुम्ही हे देसी आणि बाजारात उपलब्ध असलेले उपाय नक्की वापरून पाहू शकता आणि आपल्या घराला या 'गुटर गूं'पासून मुक्त करू शकता.

स्पष्टीकरण : ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. हा कोणत्याही समस्येवरील पर्यायी उपाय नाही. अधिक माहितीसाठी नेहमी एखाद्या तज्ज्ञ किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. NDTV नेटवर्क या माहितीच्या जबाबदारीचा दावा करत नाही. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com