Sudha Murty Motivational Quotes: तुमची मुले गाठतील प्रगतीचे शिखर, फॉलो करा सुधा मूर्तींचे हे प्रेरणादायी विचार

Sudha Murty Motivational Quotes : सुधा मूर्ती यांचे जीवन सर्वसामान्यांसाठी प्रेरणास्त्रोत आहे. आपल्या मुलांमध्ये आत्मविश्वास व धैर्य या गुणांची कमतरता निर्माण होऊ नये, याकरिता सुधा मूर्तींचे प्रेरणादायी विचार त्यांना फॉलो करायला सांगा.

जाहिरात
Read Time: 2 mins
Parenting Tips By Sudha Murthy: सुधा मूर्ती यांनी मुलांच्या संगोपनाशी संबंधित सांगितल्या या खास गोष्टी

Sudha Murthy Motivational Quotes: समाजसेविका आणि लेखिका सुधा मूर्ती (Sudha Murty) यांनी लहान मुलांसाठी गोष्टींची कित्येक पुस्तके लिहिली आहेत. त्यांनी भारतीय शिक्षण, गावांचा विकास आणि महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी आपले महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. तरुण-तरुणींसाठी सुधा मूर्ती या प्रेरणास्थानी आहेत.

मुलांना योग्य वळण लागावे तसेच जीवनामध्ये त्यांनी चांगल्या गोष्टी आत्मसात कराव्यात, याकरिता सुधा मूर्तींनी दिलेल्या शिकवणीचे - विचारांचे (Sudha Murty Motivational Quotes) लहानपणापासूनच पालन केल्यास भविष्याकरिता फायदेशीर ठरू शकते. आपल्या मुलांमध्येही आत्मविश्वास आणि धाडसीवृत्ती या गुणांची कमतरता निर्माण होऊ नये, असे तुम्हाला वाटत असेल तर त्यांना सुधा मूर्तींचे (Motivational Quotes of Sudha Murty) हे प्रेरणादायी विचार नक्की फॉलो करायला सांगा

(Summer Health Tips : सावधान!उन्हाळ्यात बाटलीबंद थंड पाणी पिताय?p)

Sudha Murthy Motivational Quotes:

तुमची स्वप्नं कधीही सोडू नका

"आयुष्यामध्ये कधीही आपली स्वप्नं सोडू नये. स्वप्न पूर्ण करणे कितीही अशक्य वाटत असले, तरीही चालेल. कठोर परिश्रम करत राहिल्यास स्वप्नं पूर्ण होतील. लहान मुलांच्या ही बाब जेव्हा लक्षात येईल, तेव्हा छोट्या-मोठ्या अपयशांची त्यांना भीती वाटणार नाही".

नेहमी शिकत राहा

"आयुष्यामध्ये कधीही नवीन गोष्टी शिकण्याची प्रक्रिया थांबवू नये. जगामध्ये सातत्याने नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत असतात. प्रगती होण्याकरिता नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती असणे आवश्यक आहे. शिकण्याच्या प्रक्रियेमुळे मेंदू सतर्क राहण्यास मदत मिळते".  

(Health Tips : चुकीच्या पद्धतीने खाताय पालक? आरोग्यावर होतील दुष्परिणाम)

अपयशाला घाबरू नये 

"सुधा मूर्ती यांच्या मते अपयशास घाबरू नये. तुम्ही तुमच्या अपयशातून धडा घेऊन पुन्हा प्रयत्न केले पाहिजे. अपयश हा यशाच्या मार्गातील एक महत्त्वपूर्ण भाग आहे. मुलांनी त्यांच्या अपयशातून धडा घेतला तर त्यांना आयुष्यामध्ये प्रगती करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही".

इतरांना महत्त्व द्या 

"सुधा मूर्ती म्हणतात की केवळ स्वतःचा विचार करणे योग्य नाही. आपण समाजामध्ये राहतो, यामुळे इतरांच्या भावना आणि गरजांचा आदर करणे गरजेचे आहे. स्वतःपुरता मर्यादित असलेला माणूस जीवनामध्ये कधीही पुढे जाऊ शकत नाही. मुलांनी लहानपणापासूनच इतरांच्या भावनांचा आदर करायला शिकले पाहिजे".

(Health Tips : नेहमीच्या चहाऐवजी प्या 'हा' पिवळ्या रंगाचा चहा)