जाहिरात

Hot Tea : उन्हाळ्यात चहा शरीराला गरम ठेवतो की थंड? ही वैज्ञानिक कारणं तुम्हाला अचंबित करतील

Hot Tea Summer Benefits: अनेक चहाप्रेमी म्हणतात, गरम चहा प्यायल्याने शरीर थंड होतं. वाचायला वेगळं वाटतं, मात्र यामागे वैज्ञानिक कारण आहे.

Hot Tea : उन्हाळ्यात चहा शरीराला गरम ठेवतो की थंड? ही वैज्ञानिक कारणं तुम्हाला अचंबित करतील
Hot tea summer Benefits:

Drinking Hot Tea in Heat: उन्हाळ्यात जेव्हा तापमान ४० डिग्रीच्या पार जातं तेव्हा थंड पदार्थ किंवा थंड पेय पिण्याची इच्छा होते. मात्र भारतात एक सवय अशी आहे जी ऋतू पाहत नाही, ती म्हणजे चहा पिण्याची. अनेक चहाप्रेमी म्हणतात, गरम चहा प्यायल्याने शरीर थंड होतं. वाचायला वेगळं वाटतं, मात्र यामागे वैज्ञानिक कारण आहे. अनेक संशोधनं, उदाहरणार्थ द जर्नल ऑफ फिजियोलॉजिक सायन्सेस आणि युरोपियन ऑफ अप्लाइन फिजियोलॉजीनुसार, गरम पेय शरीरात थर्मोजेनिक परिणाम निर्माण करतात. ज्यामुळे शरीराचं तापमान वाढतं, घाम येतो आणि हाच घाम शरीराला थंड ठेवतो. कोणकोणत्या स्थितीत चहा फायदेशीर आहे? जाणून घेऊया. 

विज्ञान काय सांगतं?

जेव्हा तुम्ही गरम चहा पिता, त्यावेळी शरीरांतर्गत तापमान काही वेळासाठी वाढतं. याचा परिणाम म्हणजे शरीरातून जास्त घाम बाहेर येतो. जेव्हा हा घाम त्वचेतून बाहेर पडतो, तेव्हा शरीर थंड होतं. याचा अर्थ, चहा तुम्हाला थेट थंड करत नसलं, तरी शरीराच्या शीतकरण प्रणालीला (घाम येणे) सक्रिय करतो.

मात्र लक्षात ठेवा...

खूप गरम चहा घसा आणि अन्न नलिकेचं नुकसान करतं. यासाठी कमी गरम असलेला चहा पिणं केव्हाही चांगलं. 

नक्की वाचा - Benefits Of Drinking Coffee : 14 दिवस दररोज कॉफी प्यायल्याने काय होतं? शरीरात होणारे 4 जबरदस्त फायदे

परंपरा आणि विज्ञान...

भारत, मध्य पूर्व आणि आफ्रिका यांसारख्या उष्ण प्रदेशांमध्ये लोक शतकानुशतके गरम पेय पीत आले आहेत. ही केवळ एक सवय नसून, शरीराच्या गरजेतून विकसित झालेली एक परंपरा आहे.

चहा प्रत्येक स्थितीत शरीराला थंड ठेवत नाही, यासाठी काही गोष्टी अवलंबून आहेत. 

कधी फायदा होतो?

जेव्हा वातावरण गरम आणि कोरडं असेल. 
जेव्हा घाम सहजपणे सुकतो
जेव्हा शरीराची घाम निर्माण करण्याची क्षमता चांगली असेल.

केव्हा कमी प्रभावी 

जास्त आर्द्रतेमध्ये
जेव्हा घाम सुकत नाही.
ज्या लोकांना जास्त घाम येत नाही.

थंड पेयांमुळे तत्काळ आराम मिळतो, पण त्यामुळे शरीर जास्त वेळ थंड राहत नाही. चहा शरीराला हळूहळू पण अधिक प्रभावीपणे थंड करतो.

Latest and Breaking News on NDTV

काय काळजी घ्याल?

जास्त चहा पिऊ नका (त्यात कॅफीनचे प्रमाण जास्त असू शकते).

फक्त कोमट चहा प्या.

उत्तम प्रतीची चहापत्ती वापरा.

रिकाम्या पोटी जास्त चहा पिणे टाळा.

उन्हाळ्यात चहा पिणे ही केवळ एक सवय नाही, तर त्याला वैज्ञानिक आधार आहे. जर तुमच्या शरीरात योग्य प्रमाणात घाम येत असेल आणि हवामानामुळे तो सुकण्यास मदत झाली, तर चहा तुम्हाला थंडावा देऊ शकतो.

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

Listen to the latest songs, only on JioSaavn.com