Bottle Gourd Chutney Recipe: उन्हाळा सुरू झाला की प्रत्येकजण आहारामध्ये स्वतःच्या आवडीनुसार बदल करतात. पचनास जड आणि तिखट-तेलकट खाद्यपदार्थांऐवजी लोक आहारात पचनास हलके, थंड पदार्थांचा समावेश करतात. यापैकी एक पौष्टिक पर्याय म्हणजे दुधीभोपळा. यामध्ये पाण्याचे प्रमाण भरपूर असल्याने शरीर थंड राहण्यास मदत मिळते. पण अनेक जण चवीमुळे दुधी भोपळा खाणे टाळतात. जर तुम्हालाही दुधी भोपळा आवडत नसेल, तर एकदा ही रेसिपी नक्की करून पाहा. दुधी भोपळ्याची चटपटीत चटणी केवळ स्वयंपाकाची चवच वाढवत नाही, तर उन्हाळ्यात शरीराला थंडावाही मिळतो.
उन्हाळ्यात दुधीभोपळ्याची चटणी का ठरते खास?
दुधी भोपळ्याची प्रकृती थंड असते, ज्यामुळे शरीर आतील बाजूने थंड राहण्यास मदत मिळते. यामध्ये फायबरचे प्रमाणही चांगले असल्याने पचनप्रक्रिया सुधारते. चटणीमध्ये दही मिक्स केल्यास हा पदार्थ शरीरासाठी अधिक आरोग्यदायी ठरतो. ज्या मंडळींना उन्हाळ्यात पोटाशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागतो, ते डाएटमध्ये या चटणीचा समावेश करू शकतात.
(नक्की वाचा: Dal Cooking Tips: डाळ शिजवताना तुम्हीही करताय मोठी चूक? डाळ होईल हॉटेलसारखी टेस्टी, फक्त या टिप्स फॉलो करा)
दुधी भोपळ्याची चटणी तयार करण्यासाठी लागणारे साहित्य
- एक कप किसलेला दुधी भोपळा
- एक कप ताजे दही
- दोन हिरव्या मिरच्या
- आले (एक छोटा तुकडा)
- एक चमचा भाजलेली जिरे पूड
- चवीनुसार मीठ
- थोडी कोथिंबीर
(नक्की वाचा: Aloe Vera Detox Drink : उन्हाळ्यात शरीर डिटॉक्स करण्यासाठी कसे तयार करावे अॅलोव्हेरा ड्रिंक? वाचा सोपी पद्धत)
दुधी भोपळ्याची चटणीची रेसिपी- सर्वप्रथम दुधी भोपळा धुवून, सोलून आणि किसून घ्या.
- हा किस हलका वाफवून घ्या किंवा पॅनमध्ये थोडा वेळ शिजवून मऊ करावा.
- किस पूर्णपणे गार झाल्यावर मिक्सरमध्ये हिरव्या मिरच्या आणि आल्यासोबत वाटून घ्या.
- आता यामध्ये दही घालून चांगले फेटा, जेणेकरून मिश्रणाला मऊ टेक्श्चर येईल.
- मिश्रणामध्ये मीठ आणि भाजलेली जिरे पूड टाकून मिक्स करा.
- शेवटी कोथिंबीर टाकून सर्व्ह करा.

Photo Credit: NDTV Marathi
(टीप: तुम्हाला हवे असल्यास चटणी करताना पुदिना किंवा लसूण मिक्स करू शकता. तसेच मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी दिल्यास चव अधिक वाढते. ही चटणी पोळी, पराठा किंवा भातासोबत खाऊ शकता.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world