
Sunjay Kapur Property Dispute: प्रसिद्ध उद्योगपती संजय कपूर यांच्या मालमत्तेवरून सुरू असलेल्या हाय-प्रोफाइल वादामुळे (High-Profile Property Dispute) मृत्यूपत्र (Will) लिहिणे किती महत्त्वाचे आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. करिश्मा कपूरचे माजी पती असलेल्या संजय कपूर यांच्या निधनानंतर, वारसदारांमध्ये संपत्तीवरून कायदेशीर तंटे (Legal Disputes) उभे राहिले आहेत. तुमच्या कुटुंबात असे वाद टाळण्यासाठी प्रत्येक भारतीयाने या प्रकरणातून 5 महत्त्वाचे नियम शिकायलाच हवेत.
नेमका वाद काय आहे? (The Dispute)
संजय कपूर यांच्या निधनानंतर, त्यांची आई रानी कपूर यांनी दावा केला की त्यांच्या पतीने (संजय कपूर यांचे वडील) लिहिलेल्या मृत्यूपत्रात त्यांनाच सर्वात मोठी लाभार्थी (Beneficiary) मानले आहे. दुसरीकडे, कपूर यांच्या मालकीची कंपनी सोना कॉमस्टारने (Sona Comstar) हे दावे फेटाळले.
संजय कपूर यांच्या पत्नी प्रिया सचदेव यांनीही मालमत्तेवर तिचा हक्क सांगितला आहे. त्याचबरोबर त्यांची दुसरी पत्नी आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या मुलांनीही वडिलांच्या संपत्तीत आपला हक्क सांगितला आहे.
या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi High Court) कपूर यांच्या सर्व मालमत्तांची संपूर्ण यादी (Complete List of Assets) मागवली आहे. त्यामुळे मृत्यूपत्र किंवा ट्रस्ट नसल्यास भविष्यात मोठ्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
( नक्की वाचा : Menstruation Cycle: मासिक पाळीचा 'हा' Viral Video पाहून डोळ्यात येईल पाणी, या कुटुंबानं जिंकली सर्वांची मनं )
संजय कपूर प्रकरणातून 5 गोष्टी शिकल्या पाहिजे
प्रत्येक व्यक्तीने विशेषतः ज्यांच्याकडे मोठी मालमत्ता आहे किंवा ज्यांचे एकापेक्षा अधिक विवाह झाले आहेत, त्यांनी त्यांच्या वारसदाराबाबत नियोजन Succession Planning) स्पष्ट आणि पारदर्शक (Transparent) ठेवली पाहिजे, हेच या वादातून स्पष्ट झाले आहे.
1. मृत्यूपत्र किंवा ट्रस्ट तयार करणे (Create a Will or Trust)
कायदेशीररित्या वैध असलेली स्पष्ट वसीयत (Valid Will) किंवा कौटुंबिक ट्रस्ट (Family Trust) तयार करून तुम्ही तुमच्या इच्छेनुसार मालमत्तेचे विभाजन करू शकता. यामुळे तुम्ही ज्यांना मालमत्ता देऊ इच्छिता, त्यांनाच ती मिळेल याची खात्री होते.
2. कुटुंबाशी संवाद साधा (Communicate with Family)
तुमच्या वारस योजनांविषयी कुटुंबातील सदस्यांशी मोकळेपणाने चर्चा (Open Discussion) करणे खूप महत्त्वाचे आहे. यामुळे भविष्यात गैरसमज आणि वाद कमी होण्यास मदत होते.
3. कागदपत्रे अपडेट ठेवा (Keep Documents Updated)
वेळोवेळी तुमच्या कायदेशीर कागदपत्रांचा आढावा घ्या आणि त्यांना अपडेट करत राहा. आयुष्यातील मोठे बदल (उदा. लग्न, घटस्फोट, मुलांचा जन्म) झाल्यानंतर हे करणे अत्यंत आवश्यक आहे.
( नक्की वाचा : Ladki Bahin Yojana: 'लाडकी बहीण' योजनेचे e-KYC करताना OTP येत नाही? ही सोपी पद्धत वापरा आणि लगेच समस्या सोडवा )
4. व्यावसायिक सल्ला घ्या (Seek Professional Advice)
कायदेशीर सल्लागार (Legal Advisor) किंवा आर्थिक नियोजक (Financial Planner) यांचा सल्ला घेणे नेहमीच सर्वोत्तम असते. ते तुमचे सर्व दस्तऐवज कायदेशीररित्या वैध आहेत आणि तुमच्या इच्छेनुसार तयार केले आहेत, याबाबत तुम्हाला योग्य मार्गदर्शन करु शकतात.
5. कुटुंबासाठी सुरक्षा कवच (A Safety Shield for Family)
तुमच्या मालमत्तेचे योग्य नियोजन (Property Planning) करणे ही केवळ कायदेशीर औपचारिकता (Legal Formalities) नाही, तर ते तुमच्या कुटुंबासाठी एक सुरक्षा कवच (Security Shield) आहे. जेव्हा तुम्ही सर्वकाही आधीच निश्चित करता, तेव्हा तुमच्या कुटुंबियांना नंतर कायदेशीर समस्यांचा सामना करावा लागत नाही.
मृत्यूपत्रासाठी आवश्यक कायदेशीर अटी (Legal Requirements for a Will)
कोणतेही मृत्यूपत्र कायदेशीररित्या वैध होण्यासाठी खालील 6 अटी पूर्ण करणे आवश्यक आहे:
लिखित स्वरूप: मृत्यूपत्र लिखित स्वरूपात असणे आवश्यक आहे. तोंडी मृत्यूपत्र (Oral Will) केवळ काही विशिष्ट परिस्थितींमध्येच मान्य होते.
सही बंधनकारक: मृत्यूपत्र बनवणाऱ्या व्यक्तीची (Testator's) त्यावर सही असणे बंधनकारक आहे.
सहीचा पर्याय: मृत्यूपत्र तयार करणारा व्यक्ती सही करू शकत नसेल, तर तो दुसऱ्या व्यक्तीकडून आपल्या उपस्थितीत सही करवू शकतो.
साक्षीदार: मृत्यूपत्रावर किमान 2 किंवा त्याहून जास्त साक्षीदारांच्या (Witnesses) सह्या आवश्यक आहेत. हे साक्षीदार मृत्यूपत्र तयार करणाऱ्या व्यक्तींच्या समोर सही करतात.
मानसिक आरोग्य: मृत्यूपत्र बनवताना मानसिकरित्या निरोगी (Mentally Sound) असणे आवश्यक आहे.
दबाव नको: मृत्यूपत्र तयार करणाऱ्यावर कोणताही दबाव होता किंवा तो मानसिकरित्या अस्वस्थ होता हे सिद्ध झाले तर ते मृत्यूपत्र (Invalid) फेटाळले जाऊ शकते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world