
Surya Mangal Yuti 2025 : दिवाळीचा सण सुरु होण्यापूर्वी 17 ऑक्टोबरला ग्रहांचा राजा सूर्य तुळा राशीत प्रवेश करणार आहे. या राशीत आधीच मंगळने प्रवेश केला आहे. त्यामुळे सूर्याच्या या गोचरमुळे तुळा राशीत सूर्य-मंगळची युती बनणार आहे. दिवाळीच्या धनत्रयोदशी सणाच्या पार्श्वभूमीवरच हा राजयोग होणार आहे. तसच हा सण 18 ऑक्टोबरला असून त्या दिवशी शनिवार आहे. अशातच धनत्रयोदशीच्या आधीच सूर्य-मंगळच्या या युतीमुळं चार राशींना प्रचंड मोठा लाभ होणार असल्याचं सांगितलं जात आहे. ज्योतिषांचं म्हणणं आहे की, सूर्य-मंगळाची ही यूती वृषभ,सिंह, तुळा आणि कुंभ राशीच्या लोकांना लाभदायक ठरू शकते.
या राशीच्या लोकांचं नशिबच चमकेल, वाचा सविस्तर माहिती
वृषभ राशी : वृषभ राशीच्या लोकांसाठी धनप्राप्तीचे योग असू शकतात. गुंतवणुकीत मोठा फायदा होऊ शकतो. जे लोक प्रॉपर्टीत गुंतवणूक करण्याचा विचार करत आहेत, त्यांच्यासाठी ही वेळ लाभदायक ठरणार आहे. नवीन घर,वाहन किंवा सोनं-चांदी खरेदी करणं तुमच्यासाठी खूप शुभ राहू शकतं. तुम्ही जर खूप चिंतेत असाल,तर या शुभयोगामुळे तुमची चिंताही दूर होऊ शकते.
सिंह - सूर्य-मंगळची युती धनत्रयोदशीला तुमचं नशिब चमकवू शकते. माता लक्ष्मी आणि कुबेर देवाची तुमच्यावर विशेष कृपा असेल. उद्योगधंद्यात अचानक लाभ होऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांनाही फायदा होऊ शकतो. तुमची थांबलेली कामे पूर्ण होतील. शत्रूंनी रचलेले कट उद्ध्वस्त होतील. आरोग्यात सुधारणा होईल.
नक्की वाचा >> रेल्वे प्रवाशांनो! घाई घाईत ट्रेन पकडताय? एस्केलेटरवर जाताना 'ही' चूक अजिबात करू नका, महिलेसोबत बघा काय घडलं..
तुळा राशी : तुळा राशीतच सूर्य-मंगळची यूती होणार आहे. तुमच्या घरात सुख-समृद्धी नांदू शकते. एखादी आनंदाची घटनाही घडू शकते.आर्थिक लाभ होऊ शकतो.कर्ज, खर्चाच्या समस्येपासून सुटका होऊ शकते. तुमच्या आर्थिक संपत्तीत वाढ होऊ शकते.
कुंभ राशी : सूर्य-मंगळाच्या यूतीमुळे कुंभ राशीलाही लाभ होणार आहे. तुमचं बँक बॅलेन्स वाढू शकतं.नोकरी-धंद्यात यश मिळू शकतं. अविवाहित लोकांचं लग्न फिक्त होऊ शकतं. आई-वडिलांच्या सहकार्याने एखादं महत्त्वपूर्ण काम पार पडू शकतं. आई-वडिलांचं आरोग्य उत्तम राहू शकतं.
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
नक्की वाचा >> Video : जे अक्षय कुमारला जमलं नाही..ते शाहरुखने केलं, 'लापता लेडीज' फेम नितांशी गोयल स्टेजवर पडता पडता वाचली
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world