जाहिरात

Kitchen Tips And Tricks: लाडक्या बहिणींनो, रोजची कामे होतील जलद अन् सोपी! वापरा 'या' 15 भन्नाट किचन टीप्स

Best Kitchen Tips And Tricks: लाडक्या बहिणींच्या किचनमधील कामात मदत होणारी तसेच अनेक कामे जलद आणि सोपी करण्यासाठी काही खास टिप्स आणि हॅक्स वापरल्या जातात

Kitchen Tips And Tricks: लाडक्या बहिणींनो, रोजची कामे होतील जलद अन् सोपी! वापरा 'या' 15 भन्नाट किचन टीप्स

15 Great Kitchen Tips And Tricks For Women:  स्वयंपाकघरातील कामे दररोजची असली तरी ती अनेकदा खूप वेळखाऊ आणि किचकट वाटतात. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत गृहिणींना किचनमधील कामे करावी  लागतात. भाज्या चिरण्यापासून ते जेवण बनवून स्वयंपाकघर स्वच्छ करेपर्यंत लाडक्या बहिणींची अक्षरशः दमछाक होते. आता लाडक्या बहिणींच्या किचनमधील कामात मदत होणारी तसेच अनेक कामे जलद आणि सोपी करण्यासाठी काही खास टिप्स आणि हॅक्स वापरल्या जातात (Best Kitchen Tricks For Easy Work). तुम्हाला त्या टीप्स माहित आहेत का? नसेल तर जाणून घ्या आणि या 15 छोट्या टीप्स नक्की लक्षात ठेवा, ज्यामुळे किचनमधील कामे जलदपणे होतील.  (Best Kitchen Tips In Marathi) 

किचनमध्ये काम करताना या टीप्स लक्षात ठेवा!| Tips And Tricks In Kitchan

  • 1. अनेकदा भाजीमध्ये दही घातल्यास ते फाटते. हे टाळण्यासाठी दही घातल्यावर भाजी मध्यम आचेवर शिजवा. ती चांगली उकळल्यानंतरच मीठ घाला. यामुळे दही फाटणार नाही आणि भाजीही स्वादिष्ट होईल.
  • 2. लिंबाचा रस वापरल्यावर तुम्ही साले फेकून देता का? यापुढे असे करू नका. या साली एकत्र करून त्यात मीठ शिंपडा आणि उन्हात ठेवा. काही दिवसांत लिंबाच्या सालींचे चविष्ट लोणचे तयार होईल.
  • 3. पोहे धुताना ते अनेकदा एकमेकांना चिकटतात. हे टाळण्यासाठी पोहे धुतल्यावर लगेचच त्यात लिंबाचा रस मिसळा. यामुळे पोहे मोकळे आणि मऊ राहतील.
  • 4. कच्ची केळी उकळताना ती काळी पडतात. हे टाळण्यासाठी उकळताना पाण्यात थोडे मीठ आणि हळद पावडर घाला.
  • 5. पोळी तव्याला चिकटून राहिल्याने ती व्यवस्थित फुगत नाही. पोळी भाजण्याआधी तव्यावर थोडे मीठ टाकून तो स्वच्छ पुसून घ्या. यामुळे तवा गुळगुळीत होईल आणि पोळी चिकटणार नाही.
  1. Latest and Breaking News on NDTV
  • 6. केळी फ्रिजमध्ये ठेवल्यास ती लवकर खराब होतात. केळी सामान्य तापमानातच चांगली राहतात.
  • 7. स्वयंपाकघरातील ओटा (स्लॅब) स्वच्छ करण्यासाठी पाण्यात थोडे मीठ मिसळा. यामुळे कीटक, माश्या आणि झुरळे दूर राहतील.
  • 8.  कांदा चिरताना डोळ्यातून पाणी येत असेल तर कांद्याची साल काढून तो काही वेळासाठी पाण्यात बुडवून ठेवा. त्यानंतर चिरल्यास डोळ्यांतून पाणी येणार नाही.
  •  9. पुरीचा मऊ आणि खुसखुशीतपणा टिकून राहण्यासाठी पीठ मळताना त्यात एक चमचा रवा किंवा तांदळाचे पीठ मिसळा. यामुळे पुऱ्या खुसखुशीत आणि मऊ राहतील.
  • 10.  भेंडी लवकर सुकते. ती जास्त काळ ताजी ठेवण्यासाठी तिच्यावर थोडे मोहरीचे तेल लावा.
  • 11. मेथीची भाजी कडू लागत असेल तर तिच्या पानांवर थोडे मीठ टाकून काही वेळ तसेच ठेवा. यामुळे तिचा कडूपणा कमी होईल.
  • 12. इडली मऊ होत नसेल तर तांदूळ आणि उडदाची डाळ भिजवताना त्यात अर्धा कप साबुदाणा मिसळा. हे सर्व एकत्र वाटून इडली बनवल्यास ती खूपच मऊ होईल.
  • 13.  मिरची पावडर लवकर खराब होऊन त्यात आर्द्रता येते. हे टाळण्यासाठी पावडरच्या डब्यात हिंगाचा एक तुकडा ठेवा.
  • 14. मायक्रोवेव्हमध्ये भात आणि भाज्या लवकर गरम होत नसतील तर त्यांना प्लेटवर गोलाकार आकारात पसरवा, मध्यभागी जागा सोडा. यामुळे अन्न लवकर गरम होण्यास मदत होते.
     
Listen to the latest songs, only on JioSaavn.com