
Tulsi Vivah 2024 : तुळशीच्या रोपाला हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्व आहे. दरवर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या द्वादशी तिथीला तुळशी विवाह (Tulsi Vivah) केला जातो. या दिवशी तुळशीच्या रोपास नववधूप्रमाणे सजवून पूजा केली जाते आणि शालिग्रामशी (भगवान विष्णूंचे रुप) (Lord Vishnu) तुळशीचा विवाह लावला जातो. कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या द्वादशीला प्रदोष काळ म्हणजे संध्याकाळच्या वेळेस तुळशीचा विवाह सोहळा संपन्न केला जातो. तुळशी विवाह सोहळ्याचे आयोजन केल्यास कुटुंबामध्ये सुख-शांती टिकून राहते आणि दाम्पत्याचे जीवनही चांगले होते, असे मानले जाते. तसेच काही कारणास्तव ज्या लोकांच्या लग्नास उशीर होत आहे, अशा लोकांसाठीही हा सोहळा शुभ ठरू शकतो. यंदा तुळशीचे लग्न कधी आहे आणि यादरम्यान कोणकोणते शुभ योग जुळून आले आहेत? हे जाणून घेऊया...
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
(नक्की वाचा: Tulsi Vivah 2024: तुलसी विवाहचे काय आहे महत्त्व? सोहळ्याच्या यादीची करून घ्या नोंद)
तुळशीचे लग्न कधी आहे? (When Is Tulsi Vivah 2024)
यंदा 13 नोव्हेंबर रोजी तुलसी विवाह सोहळा आहे. द्वादशी तिथीस 12 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 4.04 वाजता आरंभ होणार असून 13 नोव्हेंबरला दुपारी 1.01 वाजता तिथी समाप्त होईल.
(नक्की वाचा: यंदा कर्तव्य आहे? लग्नाच्या तारखांची यादी समोर, 5 महिन्यात 42 मुहूर्त)
तुलसी विवाहच्या दिवशी जुळून आले हे योग
यंदा तुळशी विवाहाच्या दिवशी अनेक अद्भुत योग जुळून आले आहेत. तुळशी विवाहाच्या दिवशी सकाळी 7.52 वाजेपासून सर्वार्थ सिद्धी योगास प्रारंभ होत आहे. हा योग 13 नोव्हेंबरला संध्याकाळी 5.40 वाजेपर्यंत असणार आहे. यासोबतच रवि योग देखील जुळून आला आहे, जो शुभ कार्यासाठी सर्वोत्तम मानला जातो. हर्ष योग आणि वज्र योगही आहे. या दिवशी तुलसी माता आणि शालिग्राम स्वरुपातील भगवान विष्णूंचा विवाह सोहळा विधीवत संपन्न केला जातो.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)