जाहिरात

UPSC Recruitment 2025: अकाऊंटंट ते लेक्चरसाठी सरकारी नोकरीची संधी! कधी, कुठे कराल अर्ज? जाणून घ्या प्रोसेस

UPSC Invites Applications For 213 Posts Including Medical Officer, Lecturer Know Details: केंद्रीय लोकसेवा आयोगाने (म्हणजेच UPSC ने मोठी भरती जाहीर केली आहे. किती असेल पगार? कसा कराल अर्ज? जाणून घ्या

UPSC Recruitment 2025: अकाऊंटंट ते लेक्चरसाठी सरकारी नोकरीची संधी! कधी, कुठे कराल अर्ज? जाणून घ्या प्रोसेस

UPSC Medical Officer Recruitment 2025: सध्या प्रत्येकजण चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात आहे. भविष्याच्या सुरक्षेसाठी चांगल्या पगाराची नोकरी असावी असे प्रत्येकाला वाटते. तुम्हीदेखील अशा नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने (Union Public Service Commission), म्हणजेच UPSC ने मोठी भरती जाहीर केली आहे. एकूण २१३ पदांसाठी ही भरती असून यासाठी आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवर सविस्तर अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.

 केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) मेडिकल ऑफिसर (Medical Officer), लेक्चरर (Lecturer) आणि इतर पदांसाठी अर्ज मागवले आहेत. एकूण २१३ रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार UPSC च्या अधिकृत वेबसाइट upsconline.nic.in वर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख २ ऑक्टोबर २०२५ आहे. या भरतीमध्ये मेडिकल ऑफिसर पदासाठी लेव्हल ९ (Level 9) नुसार वेतनश्रेणी निश्चित करण्यात आली आहे.

UPSC लेक्चरर, मेडिकल ऑफिसर भरती २०२५: उपलब्ध पदांची संख्या|UPSC Lecturer, Medical Officer Recruitment 2025: Number of Vacancies Available

  • अतिरिक्त सरकारी वकील(Additional Government Advocate): ५ पदे
  • अतिरिक्त कायदेशीर सल्लागार (Additional Legal Adviser): १८ पदे
  • सहायक सरकारी वकील (Assistant Government Advocate): १ पद
  • उपसरकारी वकील (Deputy Government Advocate): २ पदे
  • उपकायदेशीर सल्लागार (Deputy Legal Adviser): १२ पदे
  • उर्दू व्याख्याता  (Lecturer Urdu)): १५ पदे
  • मेडिकल ऑफिसर (Medical Officer): १२५ पदे
  • अकाउंट्स ऑफिसर (Accounts Officer): ३२ पदे

असिस्टंट डायरेक्टर (Assistant Director): ३ पदे
 

USA H-1B Visa: अमेरिकेला सोडा आता 'हे' 5 देश आहेत वर्क व्हिसासाठी चांगले पर्याय, मिळेल बक्कळ पगार

काय आहे पात्रता आणि निवड प्रक्रिया कशी असेल?| UPSC Lecturer Recruitment 2025: What is Eligibility Criteria, Selection Process?

मेडिकल ऑफिसर पदासाठी एकूण १२५ रिक्त जागा आहेत. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी वयोमर्यादा UR/EWSs साठी ४० वर्षे, SCs/STs/ALC साठी ४५ वर्षे आणि PwBDs साठी ५० वर्षे निश्चित करण्यात आली आहे. उमेदवाराकडे नॅशनल मेडिकल कमिशन अ‍ॅक्ट २०१९ (National Medical Commission Act 2019) च्या चॅप्टर ६ मध्ये समाविष्ट असलेली मान्यताप्राप्त MBBS पदवी असणे आवश्यक आहे.

UR (Unreserved) आणि EWS (Economically Weaker Section) श्रेणीसाठी किमान ५०%, OBCs (Other Backward Classes) साठी ४५%, तर SC (Scheduled Caste), ST (Scheduled Tribe) आणि PwBD (Persons with Benchmark Disability) साठी ४०% गुण आवश्यक आहेत. प्रत्येक पदासाठी पात्रता आणि निवड प्रक्रिया भिन्न आहे, त्यामुळे उमेदवारांनी वय आणि शैक्षणिक पात्रतेसह संपूर्ण माहितीसाठी अधिकृत अधिसूचना पाहणे आवश्यक आहे. ही अधिसूचना तुम्ही "UPSC Recruitment 2025" द्वारे तपासू शकता.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com