जाहिरात

Vasant Panchami 2026: वसंत पंचमीच्या दिवशी सरस्वती पूजन कसे करावे? कोणते काम करावे? मंत्र आणि पूजा विधी वाचा

Vasant Panchami 2026: सनातन परंपरेमध्ये सरस्वती माता ज्ञान, कला, संगीत विद्येच्या अधिष्ठात्री देवी मानल्या जातात. वसंत पंचमीच्या दिवशी देवीमातेची पूजा कशी करावी? जाणून घेऊया सविस्तर माहिती...

Vasant Panchami 2026: वसंत पंचमीच्या दिवशी सरस्वती पूजन कसे करावे? कोणते काम करावे? मंत्र आणि पूजा विधी वाचा
"Vasant Panchami 2026: वसंत पंचमीची पूजा कशी करावी?"
Canva

Vasant Panchami 2026: हिंदू धर्मामध्ये माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला विशेष धार्मिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. कारण याच दिवशी विद्येची देवता सरस्वती देवी प्रकटल्या होत्या, असे मानले जाते. पंचांगानुसार हा उत्सव 23 जानेवारी 2026 (शुक्रवार)  रोजी साजरा केला जाईल. सनातन परंपरेनुसार माता शारदेला समर्पित हा उत्सव केवळ सरस्वती उपासकांसाठीच महत्त्वाचा नसून तो वसंत ऋतूच्या आगमनाचंही प्रतीक आहे. वसंत पंचमीच्या दिवशी माता सरस्वतीची पूजा कशी करावी? काशीचे प्रसिद्ध ज्योतिषी आणि धर्म-कर्माचे जाणकार पं. अतुल मालवीय यांच्याकडून सविस्तर माहिती जाणून घेऊया... 

वसंत पंचमीच्या दिवशी माता सरस्वतीची पूजा कशी करावी?

वसंत पंचमीच्या दिवशी विद्येची देवी सरस्वती मातेची पूजा अत्यंत शुभ आणि फलदायी मानली जाते. सनातन परंपरेनुसार माता सरस्वतीची अशी साधना केल्यास साधकाला विद्या, बुद्धी, वाणीची शुद्धता, स्मरणशक्ती आणि कलांमध्ये सिद्धी प्राप्त होते, असे म्हणतात.  

सरस्वती पूजनाचा शुभ मुहूर्त : सकाळी 07:15 वाजेपासून ते दुपारी 12:50 वाजेपर्यंत असेल

स्नान: वसंत पंचमीची पूजा करण्यासाठी पहाटे ब्रह्ममुहूर्तावर स्नान करा.

वस्त्र: वसंत पंचमीच्या दिवशी सरस्वती देवीला प्रिय असणारऱ्या पिवळ्या किंवा पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे. 

आसन: सरस्वती देवीची पूजा पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाच्या आसनावर बसून करावे. 

स्थान: वसंत पंचमीच्या दिवशी ईशान्य कोपऱ्यात  किंवा देवघर स्वच्छ करून तेथे चौरंग मांडा आणि त्यावर पिवळ्या रंगाचे कापड अंथरावे. त्यावर सरस्वती देवीची प्रतिमा किंवा मूर्ती स्थापित करावी. 

संकल्प: सरस्वती देवीच्या पूजेला आरंभ करण्यासाठी उजव्या हातात पाणी, अक्षता आणि फुल घेऊन संकल्प करावा. 
संकल्प करण्यासाठी पुढील मंत्र म्हणावा.  
“मम सर्वविद्या-बुद्धि-विवेक-वाक्शुद्धि-सिद्ध्यर्थं श्रीसरस्वतीदेव्याः पूजनं करिष्ये.

ध्यान: सरस्वती देवीच्या पूजेमध्ये तिला आवाहन करण्यासाठी किंवा ध्यान करण्यासाठी खालील मंत्र म्हणावा... 

या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता
या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना 
या ब्रह्माच्युतशंकरप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता
सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा 

Vasant Panchami 2026 Date: वसंत पंचमी कधी आहे, 23 की 24 जानेवारी? जाणून घ्या योग्य तारीख आणि सरस्वती पूजनाचा शुभ मुहूर्त

(नक्की वाचा: Vasant Panchami 2026 Date: वसंत पंचमी कधी आहे, 23 की 24 जानेवारी? जाणून घ्या योग्य तारीख आणि सरस्वती पूजनाचा शुभ मुहूर्त)

सरस्वती देवीचे पूजन कसे करावे? | Saraswati Devi Pujan Importance

  • ध्यान मंत्रानंतर माता सरस्वतीला पुष्प, हळद-कुंकू, चंदन, अक्षता, धूप आणि दीप अर्पण करावे.
  • माता सरस्वतीच्या चरणी पुस्तके, लेखणी, वाद्ये इत्यादी ठेवून प्रणाम करावा.
  • फळे आणि नैवेद्य अर्पण करून स्तोत्रपठण किंवा पुढील मंत्रांचा जप करावा: ॐ ऐं सरस्वत्यै नमः किंवा ॐ ऐं ह्रीं क्लीं सरस्वत्यै नमः
  • वसंत पंचमीच्या दिवशी आरती केल्याशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते, म्हणून आरती अवश्य करावी.
वसंत पंचमी कोणत्या कार्यांसाठी शुभ आहे?
  • विद्यारंभ संस्कार (लहान मुलांना अक्षरज्ञानाची सुरुवात) करण्यासाठी वसंत पंचमीचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो.
  • गीत, संगीत, नृत्य, लेखन आणि कला साधनेची सुरुवात करण्यासाठी वसंत पंचमीचा दिवस फलदायी आहे.
  • कोणत्याही नवीन कार्याची किंवा मंगल कार्याची सुरुवात करण्यासाठी वसंत पंचमी शुभ दिवस मानला जातो. 
  • अनेक ठिकाणी या दिवशी पतंग उत्सव साजरा केला जातो, जो आनंद आणि उत्साहाचे प्रतीक आहे.
वसंत पंचमीच्या पूजेचे कोणते फळ मिळते?

श्रद्धा आणि विश्वासाने सरस्वती देवीची पूजा केल्यास साधकाची विद्या, बुद्धी आणि कला वृद्धिंगत होते. साधना सफल होते आणि प्रत्येक क्षेत्रात प्रगती प्राप्त होते. सरस्वती मातेकडून वाणीची मधुरता, कला-साधनेत यश आणि मानसिक शुद्धता प्राप्त होते.

वसंत पंचमीचे धार्मिक महत्त्व | Vasant Panchami 2026 

वसंत पंचमी हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि शुभ सण आहे. ऋतू परिवर्तन, विद्या, ज्ञान आणि कलेच्या देवीची उपासना यासाठी हा दिवस प्रसिद्ध आहे. माता सरस्वती या विद्या, बुद्धी, वाणी, संगीत आणि ज्ञानाच्या अधिष्ठात्री देवी आहेत. पौराणिक मान्यतेनुसार याच दिवशी त्या प्रकट झाल्या होत्या. विद्यार्थी, विद्वान आणि कलाकारांसाठी हा दिवस अत्यंत फलदायी मानला जातो. शास्त्रांनुसार ही श्रेष्ठ तिथी असून या दिवशी केलेली शुभ कार्ये लवकर फळ देतात. हा एक अबूझ मुहूर्त असून विवाहासारखी मंगल कार्ये देखील करता येतात.

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.) 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com