Negative Energy Removal Remedies: घरातील नकारात्मक ऊर्जेमुळे नैराश्य येते? 9 उपाय करा पहिल्याच दिवशी दिसेल बदल

Negative Energy Removal Remedies: कित्येकदा घरामध्ये असताना अचानक उदास वाटू लागते. तुम्हालाही याच गोष्टीचा अनुभव येत असेल तर या लेखाद्वारे घरातील नका

जाहिरात
Read Time: 3 mins
"Negative Energy Removal Remedies: घरातील नकारात्मक ऊर्जा कशी दूर करावी?"
Canva

Negative Energy Removal Remedies: स्वतःच्याच घरात प्रवेश केल्यानंतर तुम्हालाही थकवा जाणवणे, शरीर जड झाल्यासारखे वाटणे आणि नैराश्याची भावना जाणवते का? यामागील कारण घरातील नकारात्मक ऊर्जा असू शकते. नकारात्मक ऊर्जेमुळे केवळ मानसिकच नव्हे तर शारीरिक थकवा आणि नैराश्य देखील येऊ शकते. वास्तुशास्त्र आणि धर्मशास्त्रामध्ये घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी काही पारंपरिक उपाय सांगितले आहेत. वर्ष 2025 संपून आता वर्ष 2026 सुरू होणार आहे, नववर्षासाठी अवघे काही तास क्षिल्लक आहेत, त्यामुळे वास्तूतील नकारात्मकता दूर करून सकारात्मकता वाढवण्यासाठी रामबाण उपाय नक्की जाणून घ्या, पहिल्याच दिवशी तुम्ही मोठा बदल अनुभवाल. 

घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी महाउपाय | Negative Energy Removal Remedies

1. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार, घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी रोज पूजा करताना धूप, कापूर आणि शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करावा. पूजेचा हा उपाय केल्यास देवाची कृपादृष्टी होतेच शिवाय सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जाही वाढते; असे म्हणतात.   

2. हिंदू मान्यतेनुसार, घरामध्ये मंत्र जप केल्यास सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन नकारात्मक ऊर्जा दूर होते. वास्तूमध्ये नकारात्मक ऊर्जा वाढलीय, असे तुम्हाला जाणवत असल्यास रोज सकाळी आराध्य दैवताच्या मंत्रांचा जप करावा किंवा फोन अथवा ऑडिओ सिस्टमच्या माध्यमातून मंत्र लावावे. मंत्राच्या ऊर्जेमुळे केवळ तुमच्या घरातच नव्हे तर जीवनातही सकारात्मकता येईल.

3. नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी मंत्र जपव्यतिरिक्त घरामध्ये हनुमान चालीसा, सुंदरकांड किंवा रामचरितमानसचे पठणही करू शकता. 

4. हिंदू धर्म मान्यतेनुसार, घराच्या आतमध्ये कोणत्याही नकारात्मक ऊर्जेने प्रवेश करू नये यासाठी प्रवेशद्वार शुभ चिन्हांनी सजवावे. रोज सकाळी स्नान केल्यानंतर पाण्यात हळद मिक्स करून मुख्य द्वाराच्या दोन्ही कोपऱ्यात शिंपडावे. 

Advertisement

(नक्की वाचा: How To Stop Overthinking: मन भरकटतंय? राग-अतिविचार करतंय? रोज 5 मिनिटांचा उपाय करा, मनाच्या औषधामुळे होईल चमत्कार)

5. हिंदू धर्म मान्यतेनुसार घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी नेहमीप्रमाणे प्रत्येक शनिवारी आणि अमावस्येच्या दिवशी विशेष स्वरुपात घराची स्वच्छता करावी. घरामध्ये जितक्या खराब वस्तू असतील त्यांची लवकरात लवकर विल्हेवाट लावावी. हा उपाय केल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा लवकरच दूर होईल आणि धनाची देवी लक्ष्मीमातेचा आशीर्वाद मिळेल. 

6. वास्तूशास्त्रानुसार घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढू लागल्यास रोज सकाळी काही वेळासाठी घराच्या खिडक्या आणि दरवाजे उघडण्यास सुरुवात करावी. जेणेकरून शुद्ध हवेसह सकारात्मकतेचाही घरामध्ये प्रवेश होईल. वास्तूशास्त्रानुसार ताजी हवा आणि सूर्यप्रकाश नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी सर्वात मोठा उपाय आहे. 

Advertisement

7. बाहेरुन घरात आल्यानंतर चप्पल-बुट रॅकमध्ये ठेवा, घरामध्ये आणू नये. घराच्या आत असताना वेगळ्या स्लीपर्स वापराव्या. घराच्या आतमध्ये घाणेरडे फुटवेअर इकडेतिकडे फेकू नये. वास्तुनुसार घराच्या उंबरठ्याजवळ कधीही बूट-चप्पल काढू नये आणि उंबरठ्याजवळ घाण साचू देऊ नये, कारण यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते.

8. वास्तुशास्त्रानुसार समुद्राच्या मीठामध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची शक्ती असते. म्हणून दर शनिवारी पाण्यात मीठ मिक्स करून संपूर्ण घर पुसून स्वच्छ करावे. या उपायाने नकारात्मकता दूर होईल आणि सकारात्मकता वाढेल. 

Advertisement

(नक्की वाचा: Depression Symptoms: एखादी व्यक्ती डिप्रेशनमध्ये आहे, हे कसं ओळखायचं? डिप्रेशनमुळे कोणते दुष्परिणाम होतात?)

9. कित्येकदा वस्तू तुटल्यानंतर किंवा खराब झाल्यानंतरही आपण त्यांचा घराच्या कोपऱ्यात ढीग करून ठेवतो. वास्तुनुसार तुटलेल्या आणि निरुपयोगी वस्तू घरातील नकारात्मक ऊर्जा देखील वाढवतात. नकारात्मक उर्जेपासून मुक्त होण्यासाठी घरातील तुटलेल्या वस्तू लवकरात लवकर काढून टाकाव्या किंवा त्या दुरुस्त करून पुन्हा वापरात आणा.

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)