जाहिरात

How To Stop Overthinking: मन भरकटतंय? राग-अतिविचार करतंय? रोज 5 मिनिटांचा उपाय करा, मनाच्या औषधामुळे होईल जादू

How To Stop Overthinking: मन शांत करण्यासाठी आयुर्वेदानुसार कोणते औषध करावे, याबाबत तज्ज्ञांनी दिलेली माहिती सविस्तर जाणून घेऊया...

How To Stop Overthinking: मन भरकटतंय? राग-अतिविचार करतंय? रोज 5 मिनिटांचा उपाय करा, मनाच्या औषधामुळे होईल जादू
"How To Stop Overthinking: मनाचे अतिविचार कसे थांबवावे?"
Canva

How To Stop Overthinking: ऑफिसमधील कामाचा ताण, स्पर्धा तसेच खासगी जीवनातील समस्या यामुळे शरीरासह मनावरही मोठा परिणाम होतो.मन अस्थिर झाल्यास राग येणे, चिडचिड होणे, अतिविचार यासारख्या समस्या उद्भवतात. मनावरील ताण कमी करण्यासाठी डॉक्टर रुचा पै यांनी सोशल मीडियावर पोस्टद्वारे महत्त्वाची माहिती दिलीय, जाणून घेऊया त्यांनी सांगितलेला उपाय...

आत्मचिंतन म्हणजे काय? | What Is Self Introspection? 

डॉक्टर रुचा पै यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलंय की, आयुर्वेदिक दृष्टीने 'आत्मचिंतन' म्हणजे काय? तर आत्मचिंतन म्हणजे स्वतःच्या आत्मस्वरूपाचा विचार करणे, स्वभाव, कृती, विचार, आणि भावनांचा आत्मनिरीक्षणाने अभ्यास करणे. आयुर्वेदात आत्मा हे पंचमहाभूतांच्या पलीकडची चेतन तत्त्व आहे, जी शरीराला जीवन, चेतना आणि अर्थ देते. आत्म्याचे चिंतन म्हणजे त्या चेतनतेचा अनुभव घेणे आणि तिच्या माध्यमातून शरीर-मन-इंद्रिय यांचे संतुलन साधणे.

ग्रंथसंदर्भः चरक संहिता - सूत्रस्थान, अध्याय 1 (चरक सूत्र 1/42): “शरीरेंद्रियसत्त्वात्मसंयोगो जीवनम् ।”
याचा अर्थ असा की शरीर, इंद्रिय, मन आणि आत्मा यांचा संयोग म्हणजेच जीवन. यावरून स्पष्ट होते की, आत्मचिंतन हे केवळ अध्यात्म नव्हे तर आरोग्याचा आधार आहे. मन शुद्ध केल्याने सत्त्वशुद्धी होते आणि त्यामुळे दोष-दोषसंघटन शमते.

चरक सूत्र 1/58: “सत्त्वावजयेन रोगान् जयेत्।” म्हणजे मनावर विजय मिळवून रोगांवर विजय मिळवा, यासाठीच आत्मचिंतन हे मनशुद्धीचं औषध मानलंय. 

आत्मचिंतन कसं करावं? | Self Introspection Method

1. तयारी -

मन आणि शरीर शांत करा
सकाळी सूर्योदयापूर्वी  किंवा रात्री झोपण्यापूर्वी काही क्षण स्वतःसाठी ठेवा.
दिवा प्रज्वलित करा आणि तीन दीर्घ श्वास घ्या. मन आणि श्वास एकसंध झाल्यावर आत्मचिंतन सुरू करा.
"मनः प्रसादः सौख्यं च सत्त्वशुद्धिर्विनिश्चयः।” मन प्रसन्न झालं की आत्मा जागृत होतो.

2. आत्मनिरीक्षण- स्वतःशी प्रामाणिक संवाद स्वतःला प्रश्न विचारा

आज मी काय अनुभवलं?
माझ्या कृतींनी कोणाचं भलं झालं का?
कुणाला अनवधानाने दुखावलं का?
माझं मन आज शांत होतं का?
मी माझ्या प्रकृतीशी आणि मूल्यांशी प्रामाणिक राहिलो का?
उत्तर देण्याची घाई करू नका - फक्त मनातल्या भावनांचं निरीक्षण करा.
मन जसं आहे तसं स्वीकारणं - हाच आत्मचिंतनाचा पहिला टप्पा आहे.

3. साक्षीभाव 

विचारांवर नियंत्रण नव्हे, निरीक्षण करा.
मनात जे विचार येतात त्यांना थांबवू नका, फक्त पाहा.
जसे पाण्यावर तरंग उठतात आणि शांत होतात तसे मनही स्थिर होतं. त्या स्थिरतेतूनच आत्म्याचा आवाज ऐकू येतो.
"सत्त्वावजयेन रोगान् जयेत्।" - चरकसंहिता मनावर विजय मिळवला की रोग आपोआप शांत होतात.

4. लेखन आणि कृतज्ञता अनुभव जतन करा  

आत्मचिंतनानंतर काही ओळी लिहा :"आज माझ्या मनाने काय शिकवलं?" "उद्या मी काय सुधारू शकतो?”
आणि दिवसाचा शेवट या भावनेने करा : "माझ्याकडे जे आहे, त्याबद्दल मी आभारी आहे."

5. आत्मचिंतन मंत्र 

मन शांत करण्याची सर्वात सोपी पद्धत “सोऽहम्”
अर्थः "मी तोच आहे - जो सर्वत्र आहे."
श्वास घेताना "सो”, श्वास सोडताना "हम" असा जप करा. मन हळूहळू केंद्रित होते.
"शांतं, शिवं, अद्वैतं आत्मानं"
अर्थः "माझं आत्मरूप शांत, शुभ आणि अद्वैत आहे."
हा मंत्र मनातील ताण, राग, अस्वस्थता विरघळवतो.

How To Calm Your Mind: मन सतत धावतंय, शांत होत नाहीय? करा हे 8 सोपे उपाय

(नक्की वाचा: How To Calm Your Mind: मन सतत धावतंय, शांत होत नाहीय? करा हे 8 सोपे उपाय)

6. आत्मचिंतनाचे फायदे
  • मन शांत आणि स्थिर होते.
  • चिंता, क्रोध, राग कमी होतो.
  • शरीरात प्राणशक्ती वाढते.
  • आत्मविश्वास, करुणा आणि आनंद वाढतो.
  • नात्यांमध्ये समज आणि सौम्यता निर्माण होते.

दररोज पाच मिनिटे स्वतःसाठी क्षिल्लक ठेवा. आत्मचिंतन हे औषधांपेक्षा प्रभावी असतं. 

Depression Symptoms: एखादी व्यक्ती डिप्रेशनमध्ये आहे, हे कसं ओळखायचं? डिप्रेशनमुळे कोणते दुष्परिणाम होतात?

(नक्की वाचा: Depression Symptoms: एखादी व्यक्ती डिप्रेशनमध्ये आहे, हे कसं ओळखायचं? डिप्रेशनमुळे कोणते दुष्परिणाम होतात?)

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

Listen to the latest songs, only on JioSaavn.com