Depression Symptoms: नैराश्य केवळ आजार नाहीय तर खोलवर येणाऱ्या मानसिक थकव्यामुळे एखाद्या व्यक्तीचे विचार, ऊर्जा आणि जीवनाचा आनंद हळूहळू कमी होऊ लागतो. ग्लोबल रीसर्चनुसार, चारपैकी एक व्यक्ती कधी ना कधी या मानसिक आरोग्याच्या समस्येचा सामना करत असते. जगभरात 28 कोटी लोक नैराश्याविरोधात झुंज देतायेत आणि दुर्दैवाने विकसित देशांमध्येही केवळ 50 टक्के उपचारांची सुविधा उपलब्ध आहे. कर्ज, ब्रेकअप किंवा मधुमेहापेक्षाही नैराश्याची समस्या अधिक धोकादायक मानले जाते कारण ही समस्या हळूहळू एखाद्या व्यक्तीच्या भावना आणि मानसिक शक्ती कमकुवत करते. पण योग्य वेळीच नैराश्याची कारणं आणि लक्षणं ओळखली तर सहजरित्या जीवनशैलीमध्ये ठराविक बदल करून त्यावर मात केली जाऊ शकते. नैराश्याची सुरुवात कशी होते आणि त्यावर मात कशी करायची? जाणून घेऊया सविस्तर माहिती...
कोणत्या गोष्टींच्या कमतरतेमुळे नैराश्य येते? (What Causes Depression)
नैराश्य कोणत्याही गोष्टीच्या कमतरतेमुळे येत नाही तर हार्मोन्स, खनिजे आणि न्युरोट्रान्समीटरच्या असंतुलनामुळे नैराश्याची सुरुवात होते. सेरोटोनिन हार्मोनला मूड बूस्टर हार्मोन असे म्हटलं जातं. या हार्मोनच्या कमतरतेमुळे मूड खराब होणे, चिडचिड होणे, राग येणे आणि भावनांवर नियंत्रण ठेवणं कठीण होते. दुसरे कारण म्हणजे व्हिटॅमिन डीची कमतरता, यामुळे थेट शारीरिक ऊर्जा आणि मूडवर परिणाम होतात. याव्यतिरिक्त व्हिटॅमिन B12 आणि लोहाच्या कमतरतेमुळेही मेंदूच्या कार्यप्रणालीवर परिणाम होतात, ब्रेग फॉग वाढते आणि हळूहळू नैराश्याचे लक्षणे वाढू लागतात.
डिप्रेशनची लक्षणं (Top Symptoms Of Depression)
- पहिले आणि सर्वात महत्त्वाचे लक्षण म्हणजे सतत उदास किंवा रिक्तपणाची भावना निर्माण होणे. ज्या गोष्टींमुळे तुम्हाला पूर्वी आनंद मिळत होता, त्याच गोष्टी न आवडणं हे लक्षणं एक मोठा संकेत असू शकते.
- दुसरे लक्षण म्हणजे आठ-नऊ तास झोपल्यानंतरही थकवा आणि आळस जाणवणे. मन आणि शरीर सतत जड वाटत असेल तर हे मेंदूतील रासायनिक असंतुलनाचे लक्षण असू शकते.
- तिसरे लक्षण म्हणजे अति तसेच नकारात्मक विचार. अशा परिस्थितीत एखादी व्यक्ती लहान गोष्टींबद्दलही अतिविचार करू लागते. स्वतःला दोष देऊ शकते किंवा भविष्याबाबत भीती वाटू शकते.
- जर ही लक्षणे दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ राहिली तर त्याकडे दुर्लक्ष करू नये.
- कामाचा ताण आणि कामाच्या ठिकाणामुळे होणारा त्रास ही सर्वात मोठी कारणं आहेत. जास्त वेळ काम करणं, कमी झोपणे आणि योग्य काम करत असतानाही पाठिंबा न मिळणे यामुळे मानसिक थकवा वाढतो.
- रिलेशनशिप आणि कौटुंबिक समस्याही मोठे कारण असू शकतात.
- एकटेपणा, ब्रेकअप, असुरक्षितचेची भावना आणि कौटुंबिक तणाव यामुळेही मनावर खोलवर दुष्परिणाम होतात.
- तिसरे मोठे कारण म्हणजे आरोग्याच्या समस्या आणि हार्मोन्सचे असंतुलन. यामुळे थायरॉइड, PCOS, मधुमेह आणि व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे नैराश्याची समस्या निर्माण होऊ शकते.
(नक्की वाचा: Ginger Oil For Foot Massage: आल्याच्या तेलाने पायांचा मसाज केल्यास काय होते? कसा करावा उपाय)
कोणत्या सवयींमुळे नैराश्य कमी होऊ शकते? (Helpful Habits For Depression)- सकाळी 15-20 मिनिटे कोवळ्या उन्हात बसल्यास शरीरामध्ये सेरोटोनिन हार्मोन आणि व्हिटॅमिन डीची पातळी वाढेल, यामुळे मूड चांगला होईल.
- रोज 30 मिनिटे चालण्याचा व्यायाम करावा, योग आणि मेडिटेशन केल्यास हॅपी हार्मोन्सचा स्त्राव होईल, ज्यामुळे मानसिक तणाव कमी होण्यास मदत मिळेल.
- रात्री झोपताना स्क्रीन टाइम कमी करावा, यामुळे मेंदूला शांतता मिळेल.
- एखाद्या विश्वासातील व्यक्तीकडे मन मोकळे करावे.
(नक्की वाचा: How To Calm Your Mind: मन सतत धावतंय, शांत होत नाहीय? करा हे 8 सोपे उपाय)
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

