VIDEO: शहरापेक्षा गाव भारी! रानात बसून 27 लाखांची कमाई; समजून घ्या आकडेवारी

आजकाल नोकरीमध्ये रात्रंदिवस राबूनही एवढे मोठे पॅकेज मिळवण्यासाठी बराच संघर्ष करावा लागतो. अशा परिस्थितीत, हा मेंढपाळ केवळ पारंपरिक व्यवसाय करून मोठे आर्थिक यश मिळवत आहे, हे प्रेरणादायी आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

नोकरीच्या मागे धावणाऱ्या तरुणाईसाठी एक प्रेरणादायी व्हिडीओ समोर आला आहे. वाशिम जिल्ह्यातील सोमठाणा येथील एका छोट्या मेंढपाळाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. रानात बसून वर्षाकाठी 27 लाख रुपयांचे पॅकेज कमावण्याची किमया याने साधली आहे. मेघानंद इंगोले (इंस्टाग्राम युझर @me_nand_) याने आपल्या अकाऊंटवरून शेअर केलेल्या एका व्हिडिओतून हे गणित समजावून सांगितलं आहे. ज्यात त्याने मेंढपाळाला आणि त्याच्या सुमारे 400 मेंढ्यांना दाखवले आहे.

या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या मेंढपाळाने काही दिवसांपूर्वीच 100 मेंढ्या विकल्याची माहिती मेघानंदने दिली आहे. एका बकरीचा भाव सुमारे 9000 रुपये असतो. अशा रितीने, या मेंढपाळाने अवघ्या तीन ते चार महिन्यांत 100 मेंढ्या विकून (9000 x 100) एकूण 9 लाख रुपये कमावले. 

Advertisement

महत्त्वाचे म्हणजे, तीन ते चार महिन्यांत मेंढी विक्रीसाठी तयार होते आणि एका वर्षात असे तीन वेळा करणे शक्य होते. या हिशोबानुसार, वर्षाला तीन वेळा कमाई केल्यास एकूण 27 लाख रुपये होतात. याचाच अर्थ, हा मेंढपाळ रानात बसून 27 लाखांचे वार्षिक पॅकेज कमावतो आहे.

हा व्हिडिओ व्यवसायाची ताकद किती मोठी असू शकते, हे दर्शवतो. आजकाल नोकरीमध्ये रात्रंदिवस राबूनही एवढे मोठे पॅकेज मिळवण्यासाठी बराच संघर्ष करावा लागतो. अशा परिस्थितीत, हा मेंढपाळ केवळ पारंपरिक व्यवसाय करून मोठे आर्थिक यश मिळवत आहे, हे प्रेरणादायी आहे. 

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकजण या मेंढपाळाचे कौतुक करत आहेत आणि पारंपरिक व्यवसायाकडे नव्या दृष्टीने पाहण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करत आहेत. यामुळे तरुणांना शेती आणि पशुधन आधारित व्यवसायांमध्ये किती प्रचंड क्षमता आहे, हे स्पष्ट होते.

Topics mentioned in this article