Vi युजर्ससाठी खूशखबर! मुंबई 5G सेवेची चाचणी सुरु, अनलिमिटेड डेटामुळे ग्राहकांची मज्जा

Vi network 5G Testing : मुंबईतील Vi युजर्सनी 5G ॲक्टिव्हेशन मेसेज इत्यादीद्वारे खुलासा केला आहे की कंपनीने या ठिकाणी 5G सेवा सुरू केली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

भारतातील प्रमुख टेलिकॉम ऑपरेटर जिओ आणि एअरटेल गेल्या काही काळापासून त्यांच्या 5G सेवा ग्राहकांना देत आहेत. मात्र BSNL आणि Vodafone Idea (Vi) यांनी अद्याप 5G मध्ये प्रवेश केलेला नाही. Vi युजर्ससाठी आता एक खुशखबर आहे. कारण कंपनीने मुंबईत 5G चाचण्या सुरू केल्या आहेत. ज्यामुळे निवडक ग्राहकांना अमर्यादित डेटा मिळत आहे. अनेक युजर्सना तसे मेसेज मिळत आहेत. काही युजर्सने सोशल मीडियावर याचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत.

Vi च्या तिसर्‍या तिमाहीच्या आर्थिक वर्ष 2025 च्या अहवालानंतर ही माहिती समोर आली आहे. मुंबईत मार्च 2025 पर्यंत व्यावसायिक 5G लाँच करण्याचं प्लानिंगत कंपनीचं होतं. त्यानंतर एप्रिल 2025 मध्ये दिल्ली, बंगळुरू, चंदीगड आणि पटना येथे त्याची अंमलबजावणी होण्याची अपेक्षा आहे. 

(नक्की वाचा-  'झिरो-क्लिक' मालवेयर म्हणजे काय? ऑनलाईन फसवणुकीसाठी कसा वापर होतेय?)

मुंबईतील Vi युजर्सनी 5G ॲक्टिव्हेशन मेसेज इत्यादीद्वारे खुलासा केला आहे की कंपनीने या ठिकाणी 5G सेवा सुरू केली आहे. काही चाचण्यांनंतर ही सेवा प्रत्येकासाठी सुरू केली जाऊ शकते. सध्या या सेवेची चाचणी काही ग्राहकांसोबतच केली जात आहे. या काळात कंपनी या ग्राहकांना अमर्यादित डेटा देखील देत आहे, जेणेकरून या सेवेची योग्य चाचणी घेता येईल. आता ही सेवा सर्वांसाठी कधी उपलब्ध होणार याची प्रतीक्षा आहे. 

(नक्की वाचा -  Goa Tourism 'इडली-सांबारमुळे गोव्यात आंतरराष्ट्रीय पर्यटकांची संख्या रोडावली', आमदाराचा अजब दावा)

युजर्सना आलेल्य मेसेजमध्ये असं म्हटलं आहे की, “अभिनंदन! तुमच्या नंबरवर Vi 5G सेवा अॅक्टिव्ह केली आहे. 299 रुपये किंवा त्यावरील अनलिमिटेड पॅकसहमअमर्यादित 5G डेटा ऑफरचा आनंद घ्या."

Advertisement
Topics mentioned in this article