Weight Loss: ना डाएट, ना महागडी सप्लिमेंट्स, ना जिम; तरुणीने 22 किलो वजन 4 सोप्या सवयींनी केलं कमी

Weight Loss Tips: नेहा परिहारचा मेसेज स्पष्ट आहे की तुम्हाला महागड्या सप्लिमेंट्सची, गुंतागुंतीच्या डाएटची गरज नाही. तुम्हाला फक्त बेसिक गोष्टी सुधारण्याची आवश्यकता आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

वजन कमी करणे म्हणजे कठोर डाएट प्लॅन, महागडी सप्लिमेंट्स आणि जिममध्ये तासन्तास घाम गाळणे, असा अनेकांचा गैरसमज असतो. अनेकांना वाटते की वजन कमी करण्यासाठी संपूर्ण जीवनशैली बदलणे आवश्यक आहे. मात्र साध्या सवयी देखील शरीरात चांगल्या बदलासाठी पुरेशा असतात, ज्यांना आपण अनेकदा 'खूप बेसिक' म्हणून दुर्लक्ष करतो.

याच साध्या सवयींचे महत्त्व सांगणारी आणि लाखो लोकांना प्रेरणा देणारी नेहा परिहार सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. नेहा जी स्वतः एक कंटेंट क्रिएटर आणि वेट लॉस कोच आहे. तिने केवळ घरी राहून 22 किलोग्राम वजन कमी केले आहे. नोव्हेंबरमध्ये तिने इन्स्टाग्रामवर ही पोस्ट शेअर केली.

नेहाने केलेल्या चार महत्त्वाच्या गोष्टी

1. कमी नाही, तर जास्त खाणे (Eating More – Not Less)

नेहाने कधीही स्वतःला उपाशी ठेवले नाही किंवा जेवण वगळले नाही. ती म्हणाली, "मी अक्षरशः दररोज 3 वेळ भरपेट जेवण आणि स्नॅक खाणे सुरू ठेवले. तिचा तर्क सोपा होता, जेवण वगळल्यास मेटाबॉलिज्म मंदावतो. त्यामुळे तिने आपल्या आहारात प्रथिने आणि फायबरला प्राधान्य दिले.

Advertisement

2. दररोज चालणे

नेहाने दररोज फक्त 30 मिनिटे चालणे, विशेषतः रात्रीच्या जेवणानंतर चालणे सुरू केले. या लहान बदलामुळे तिचे पचन, झोप आणि पोटाची चरबी सुधारण्यास मदत झाली. यामुळे व्यायामाचा दबाव तिच्यावर कधी आला नाही.

3. 100% 'हेल्थी' खाणे थांबवले

नेहाने कबूल केले की तिने नेहमीच 'उत्तम खाण्याचा' आग्रह सोडला. तिने 80:20 चा सोपा नियम पाळला. ज्यात 80% शिस्तबद्ध नियमीत आहार केला आणि 20% मनसोक्त खाल्लं. आठवड्यातून एकदा घेतलेल्या 'रिलॅक्स्ड मील'मुळे तिचे हार्मोन्स स्थिर राहिले आणि परिणाम सातत्यपूर्ण मिळाले.

Advertisement

4. लवकर आणि हलका आहार

संध्याकाळी 7.30 पर्यंतरात्रीचे जेवण करणे तिने बंधनकारक केले. तिने डिनरमध्ये चिल्ला, क्विनोआ डोसा किंवा डाळ-भाजी असे साधे पदार्थ ठेवले. लवकर आणि हलके जेवल्याने तिचे पचन, झोप, मनःस्थिती सुधारली आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पोटाची चरबी कमी झाली.

नेहा परिहारचा मेसेज स्पष्ट आहे की तुम्हाला महागड्या सप्लिमेंट्सची, गुंतागुंतीच्या डाएटची गरज नाही. तुम्हाला फक्त बेसिक गोष्टी सुधारण्याची आवश्यकता आहे. जेवणाची वेळ, झोप , शारीरिक हालचाल आणि शांत मन ठेवण्याची गरज आहे..नेहाचा प्रवास हे सिद्ध करतो की वजन कमी करणे अतिरेकी नसावे, तर ते सातत्यपूर्ण असावे.

Advertisement

Topics mentioned in this article