Weight Loss News: लठ्ठपणा ही गंभीर समस्या ठरू शकते. शरीराचे आवश्यकतेपेक्षा वजन जास्त असेल तर जीवघेण्याचा आजारांचा साामना करावा लागू शकतो. बहुतांश लोक शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी नियमित व्यायाम, कॅलरीज् नियंत्रणात आणण्यापासून ते डाएटिंगपर्यंत सर्व उपाय करतात. पण काही केल्या वजन कमी होत नाही. वजन कमी करण्यासाठी एक सोपा आणि घरगुती उपाय आपण जाणून घेऊया. कोमट पाण्यामध्ये लिंबाचा रस आणि गुळ मिक्स करुन प्यावे. गुळ आणि लिंबाचा रस दोन्ही गोष्टी आरोग्यासाठी गुणकारी मानले जातात. हे हेल्दी ड्रिंक कसे तयार करायचे? याद्वारे कोणते फायदे मिळतील? जाणून घेऊया सविस्तर माहिती...
गुळ आणि लिंबाचे पाणी कसे तयार करावे? (How To Make Jaggery And Lemon Water)
- सर्वप्रथम पाण्यामध्ये गुळाचा छोटासा तुकडा उकळावा.
- गुळ विरघळल्यानंतर गॅस बंद करावा आणि पाणी थंड होऊ द्यावे.
- आता पाण्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस मिक्स करावा.
- सकाळी रिकाम्या पोटी गुळ-लिंबाचे पाणी प्यावे.
(नक्की वाचा: Weight Loss Tips: जीरे की ओव्याचे पाणी, वेटलॉससाठी काय ठरेल सर्वाधिक परिणामकारक?)
Photo Credit: Pexels
गुळ आणि लिंबाचे पाणी पिण्याचे फायदे (Jaggery And Lemon Water Health Benefits)
- व्हिटॅमिन सीचा उत्तम स्त्रोत म्हणजे लिंबू.
- लिंबाच्या पाण्यामुळे शरीर हायड्रेट राहण्यास मदत मिळते.
- त्वचेचा पोत चांगला होतो.
- पचनप्रक्रियाही सुधारते.
- स्ट्रोक येण्याचा धोका कमी होतो.
- हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत मिळू शकते.
- महत्त्वाचे म्हणजे वजन कमी होण्यास आणि नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.
गुळाचे आरोग्यवर्धक फायदे
गुळातील पोषणतत्त्वांमुळे पचनप्रक्रिया सुधारते.
शरीर डिटॉक्स होण्यास मदत मिळते.
शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते.
वजन घटण्यासही मदत मिळते.
(नक्की वाचा: Weight Loss Tips: सडपातळ कंबर हवीय? मग डाएटमध्ये या गोष्टी समावेश कराच)
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )