Weight Loss: आता उपाशी न राहता वजन करा कमी! रोजच्या जेवणात ठेवा 'या' 4 पौष्टिक सॅलेडचा समावेश

आहारतज्ज्ञांच्या मते, फायबर आणि प्रथिनांनी युक्त सॅलेड हा वजन कमी करण्याचा एक शास्त्रीय मार्ग आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Weight Loss Salad Recipe: आजच्या धकाधकीच्या जीवनात वाढते वजन ही अनेक आजारांचे मूळ ठरत आहे. लठ्ठपणामुळे मधुमेह, रक्तदाब आणि शारीरिक कमकुवतपणा यांसारख्या समस्या उद्भवतात. अनेकजण वजन कमी करण्यासाठी उपाशी राहतात. परंतु उपाशी राहणे हा पर्याय नसून योग्य आहार घेणे महत्त्वाचे आहे. वजन नियंत्रित ठेवण्यासाठी आणि शरीराला पुरेसे पोषण देण्यासाठी आम्ही तुम्हाला 4 प्रकारच्या सॅलेडचे पर्याय सांगणार आहोत. वाढता लठ्ठपणा ही सध्याच्या काळातील एक गंभीर आरोग्य समस्या बनली आहे. लठ्ठपणामुळे केवळ सौंदर्यच बाधित होते असे नाही, तर मधुमेह आणि उच्च रक्तदाबासारखे गंभीर आजारही बळावतात. 

अशा परिस्थितीत 'डाएटिंग'च्या नावाखाली उपाशी राहण्यापेक्षा योग्य आहाराची निवड करणे आवश्यक आहे. आहारतज्ज्ञांच्या मते, फायबर आणि प्रथिनांनी युक्त सॅलेड हा वजन कमी करण्याचा एक शास्त्रीय मार्ग आहे. सकाळी फळांचे सॅलेड, दुपारी फायबरयुक्त भाज्या आणि रात्री हलके वाफवलेले ग्रीन सॅलेड घेतल्यास शरीरातील अन्नाची गरज पूर्ण होते आणि चयापचय क्रिया (Metabolism) वेगवान होते. विशेषतः उकडलेली कडधान्ये आणि फळे यांचा मेळ घातल्यास शरीराला आवश्यक पोषणमूल्ये मिळतात. कोणती सॅलेड तुम्ही तुमच्या आहारात ठेवाल यावर एक लक्ष टाकूयात. 

Advertisement

नक्की वाचा - Hair Fall: लांबसडक- घनदाट केसांसाठी 'हे' 3 स्वस्त तेल ठरेल वरदान! आयुर्वेदिक तज्ज्ञांनी सांगितला सोपा उपाय

1. फळांचे सॅलेड (ब्रेकफास्टसाठी उत्तम)
सकाळच्या नाश्त्यात फळांचे सॅलेड घेणे अतिशय फायदेशीर ठरते. पपई, टरबूज आणि खरबूज यांसारखी फळे सकाळी खावीत. यामध्ये अंजीर आणि विविध बिया (Seeds) मिक्स केल्यास चव वाढते आणि शरीराला चांगले पोषण मिळते. यामुळे शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते.

2. हाय प्रोटीन मोड आलेले सॅलेड
जर तुम्हाला सकाळी फळे खायला आवडत नसतील, तर मोड आलेल्या कडधान्यांचे सॅलेड खाऊ शकता. मूग किंवा चणे उकडून त्यात टोमॅटो, कांदा आणि लिंबू पिळून खाल्ल्यास शरीराला ऊर्जा आणि प्रोटीन मिळते. कच्चे कडधान्य पचायला जड जात असल्यास ते हलके उकडून घेणे केव्हाही चांगले.

3. दुपारच्या जेवणासाठी फायबरयुक्त सॅलेड
दुपारच्या जेवणापूर्वी अर्धा तास काकडी, टोमॅटो, बीट आणि गाजर यांचे सॅलेड खावे. हे सॅलेड फायबर आणि जीवनसत्त्वांनी भरपूर असते. जेवणाआधी सॅलेड खाल्ल्यामुळे भूक नियंत्रित राहते आणि अति जेवण टाळता येते. हे सॅलेड सर्वात उत्तम मानले जाते. त्यामुळे आहार ही संतुलीत राहातो. 

4. रात्रीसाठी हलके ग्रीन सॅलेड
रात्रीच्या वेळी शक्यतो धान्याऐवजी हलका आहार घ्यावा. ढोबळी मिरची, पालक आणि थोडे उकडलेले चणे वापरून ग्रीन सॅलेड तयार करा. लक्षात ठेवा, पालेभाज्या कधीही कच्च्या खाऊ नयेत, त्या हलक्या वाफवून किंवा उकडूनच खाव्यात. यामुळे रात्रीच्या वेळी पचन सुधारते आणि वजन कमी होण्यास मदत होते.
 

Advertisement