जाहिरात

Hair Fall: लांबसडक- घनदाट केसांसाठी 'हे' 3 स्वस्त तेल ठरेल वरदान! आयुर्वेदिक तज्ज्ञांनी सांगितला सोपा उपाय

खोबरेल तेलासोबत मिसळून लावल्यास याचे फायदे दुप्पट होतात. यामुळे केस सुरक्षित आणि लांबसडक होण्यास मदत होते.

Hair Fall: लांबसडक- घनदाट केसांसाठी 'हे' 3 स्वस्त तेल ठरेल वरदान! आयुर्वेदिक तज्ज्ञांनी सांगितला सोपा उपाय
  • धावपळीच्या जीवनशैलीमुळे केस गळणे आणि अकाली पांढरे होणे या समस्या वाढत आहेत
  • आयुर्वेदिक तज्ज्ञांच्या मते ब्राह्मी तेल स्कॅल्पमधील रक्ताभिसरण सुधारून केसांच्या मुळांना मजबुती देते
  • भृंगराज तेल केस गळती थांबवण्यासाठी उपयुक्त आहे.
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

Herbal Oil For Long Hair: धावपळीची जीवनशैली, चुकीचा आहार आणि वाढते प्रदूषण यामुळे केस गळणे (Hair Fall) व अकाली पांढरे होणे (Grey Hair) या समस्या वाढल्या आहेत. आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. राम अवतार यांच्या मते, महागड्या उत्पादनांऐवजी नैसर्गिक तेलांचा वापर केसांच्या मुळांना पोषण देऊन त्यांना मजबुती प्रदान करतो. केसांचे आरोग्य केवळ बाह्य उत्पादनांवर अवलंबून नसून त्यांना मिळणाऱ्या पोषणावर असते. आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. राम अवतार यांनी केसांच्या वाढीसाठी ब्राह्मी, भृंगराज आणि आवळा या तीन तेलांचे महत्त्व अधोरेखित केले आहे.

1. ब्राह्मी तेल (Brahmi Oil):
ब्राह्मीमध्ये मुबलक प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स असतात. हे तेल केसांच्या मुळांना पोषण देऊन स्कॅल्पमधील रक्ताभिसरण सुधारते. कोमट ब्राह्मी तेलाने 10-15 मिनिटे मसाज करा आणि 30 मिनिटांनंतर केस धुवा. उत्तम परिणामांसाठी आठवड्यातून दोनदा याचा वापर करावा. केसांना मुळापासून मजबूत करण्यासाठी ब्राह्मी तेलाचा वापर करा. हे तेल डोक्याला थंडावा देते आणि केसांची वाढ वेगाने करते.

2. भृंगराज तेल (Bhringraj Oil):
आयुर्वेदात भृंगराजला 'केशराज' म्हटले जाते. केस गळती थांबवण्यासाठी आणि नवीन केसांच्या वाढीसाठी हे अत्यंत प्रभावी आहे. हे तेल मुळांना लावून रात्रभर राहू द्यावे आणि दुसऱ्या दिवशी सौम्य शॅम्पूने केस धुवावेत. जर तुमचे केस खूप तुटत असतील किंवा टक्कल पडण्याची भीती वाटत असेल, तर भृंगराज तेल नक्की वापरा. याला 'केशराज' म्हणतात कारण हे केसांच्या सर्व समस्यांवर गुणकारी आहे.

3. आवळा तेल (Amla Oil):
व्हिटॅमिन सी आणि खनिजांनी समृद्ध असलेले आवळा तेल केसांचा नैसर्गिक रंग टिकवून ठेवण्यास आणि वाढ वेगाने करण्यास मदत करते. खोबरेल तेलात आवळा तेल मिसळून मसाज केल्यास केसांचा पोत सुधारतो. केसांना चमक हवी असेल तर आवळ्याच्या तेलाचा वापर करा. खोबरेल तेलासोबत मिसळून लावल्यास याचे फायदे दुप्पट होतात. यामुळे केस सुरक्षित आणि लांबसडक होण्यास मदत होते. 

नक्की वाचा - Weight Loss Tips: तरुणीने 90 Kgवरून थेट 55kg वजन घटवलं, ना जिम ना डाएटिंग; वाचा वेटलॉस जर्नी

तेल लावण्याची योग्य पद्धत काय आहे ते ही आपण जाणून घेवूयात. तेल नेहमी थोडे कोमट करून लावा. नखांचा वापर न करता बोटांच्या टोकांनी हलक्या हाताने मसाज करा. रात्रभर तेल लावून ठेवल्यास अधिक फायदा होतो. केसांना तेल लावताना स्कॅल्प मसाज (Scalp Massage) अत्यंत महत्त्वाचा आहे. यामुळे डोक्यातील रक्तभिसरण वाढते आणि केसांची मुळे सक्रीय होतात. तेल लावल्यानंतर किमान 2 ते 3 तास ते केसांत राहू द्यावे.

नक्की वाचा - Pigeon Repellent Ideas: तुमच्याही बाल्कनी, खिडकीवर कबूतर करतायेत घाण; समस्या दूर करण्यासाठी फॉलो करा 9 टिप्स

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com