Clove Benefits: महिनाभर रिकाम्या पोटी लवंग चावून खा, कल्पनाही केली नसेल इतके मिळतील चमत्कारिक लाभ

Clove Eating Benefits: नियमित सकाळी रिकाम्या पोटी लवंग चावून खाल्ल्यास शरीरास कित्येक लाभ मिळू शकतात. लवंगामुळे केवळ आजारांपासूनच संरक्षण होत नाही तर आरोग्य देखील सुधारण्यास मदत मिळते.

जाहिरात
Read Time: 2 mins
"Clove Eating Benefits: लवंग खाण्याचे चमत्कारिक फायदे"

Clove Eating Benefits In Marathi: लवंगामुळे स्वयंपाकाची चव वाढतेच पण आयुर्वेदिक उपचारांमध्येही याचा आवर्जून वापर केला जातो. लवंग केवळ गरम मसल्यांचा भाग नसून एक शक्तिशाली औषध देखील मानले जाते. लवंग खाण्याचे अगणित लाभ आहेत. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार लवंगाचा डाएटमध्ये समावेश केल्यास आरोग्यास कित्येक पोषणतत्त्वांचा पुरवठा होऊ शकतो. तुम्ही महिनाभर नियमित रिकाम्या पोटी लवंग चावून खाल्ले तर कधी कल्पनाही केली नसेल इतके आश्चर्यकारक लाभ मिळतील. या इवल्याशा गोष्टींचे फायदे बरेच मोठे आहेत.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

लवंगातील औषधी गुणधर्म

लवंगामध्ये अँटी-बॅक्टेरिअल, अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटी-ऑक्सिडंट्स गुणधर्म आहेत. यामध्ये युजेनॉल नावाचे घटक आहे, ज्यामुळे लवंग औषधीयदृष्ट्या प्रभावी बनते. तसेच यातील पोषणतत्त्वांमुळे शरीराची अनेक समस्यांपासून सुटका होते.

रिकाम्या पोटी लवंग खाल्ल्यास मिळतील असंख्य फायदे (Benefits of Chewing Cloves On An Empty Stomach In Marathi)

1. पचनसंस्थेमध्ये सुधारणा

लवंग खाल्ल्यास पचनसंस्था मजबूत होऊ शकते. यामुळे गॅस, अ‍ॅसिडिटी आणि अपचन यासारख्या समस्यांपासूनही सुटका मिळते. रिकाम्या पोटी लवंग चावून खाल्ल्यास पोटातील हानिकारक बॅक्टेरियांचा खात्मा होतो.   

2. रोगप्रतिकारकशक्ती वाढते 

लवंगातील अँटी-ऑक्सिडंट्समुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते. यामुळे शरीराचे संसर्ग आणि आजारांपासून बचाव होण्यास मदत मिळते. 

Advertisement

(नक्की वाचा: दातांना कीड लागलीय? करा हे 3 प्रभावी घरगुती उपाय, जाणून घ्या उपचारांची योग्य पद्धत)

3. तोंडाचे आरोग्य सधारते 

लवंगामुळे हिरड्या आणि दातांच्या समस्या दूर होऊ शकतात. यातील अँटी-बॅक्टेरिअल प्रभावामुळे तोंडाला येणारा दुर्गंध आणि दातांना कीड लागण्याची समस्या रोखण्यास मदत मिळू शकते.   

4. सांधेदुखीपासून आराम मिळतो

लवंगामध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्मामुळे सांध्यामधील सूज आणि वेदना कमी होण्यास मदत मिळू शकते. नियमित स्वरुपात लवंग चालून खाल्ल्यास संधिवातासारख्या समस्यांपासून आराम मिळतो.

Advertisement

(नक्की वाचा: पोट स्वच्छ होत नाही? दह्यात ही गोष्ट मिक्स करुन खा, आतड्यांच्या प्रत्येक कोपऱ्यातून घाण येईल बाहेर)

5. त्वचेवर येते तेज 

लवंगातील पोषणतत्त्वांमुळे शरीरातील विषारी घटक बाहेर फेकले जातात, ज्यामुळे त्वचा सुंदर आणि चमकदार दिसू लागते. 

6. रक्तशर्करेची पातळी नियंत्रणात राहते 

लवंगामुळे रक्तशर्करेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी लवंग खाणे फायदेशीर ठरू शकते. 

लवंग चावून खाण्याची योग्य पद्धत (Lavang Khanyachi Yogya Padhat)

सकाळी रिकाम्या पोटी एक ते दोन लवंग चावून खा. योग्य पद्धतीने लवंग चावून खाल्ल्यानंतर त्यावर एक ग्लास गरम पाणी प्यावे. सलग महिनाभर हा उपाय केल्यास शरीरामध्ये सकारात्मक परिणाम दिसून येतील  

Advertisement

या गोष्टी देखील ठेवा लक्षात 

  • लवंगाचे जास्त प्रमाणात सेवन करणे टाळावे, अन्यथा शरीरामध्ये उष्णता वाढू शकते. 
  • कोणत्याही प्रकारची अ‍ॅलर्जी असल्यास लवंग खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
  • गर्भवती महिलांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय लवंगाचे सेवन करू नये. 

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )