Weight Loss: वजन होईल पटापट कमी, पोटही होईल सपाट; नियमित केवळ करा हे एकच काम

Weight Loss Tips: काही लोक नियमित जीममध्ये जाऊन वॉर्मअप करण्यासाठी ट्रेडमिलवर धावतात. पण इतका घाम गाळूनही शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होत नाही. वेटलॉससाठी ट्रेडमिलवरील कोणते पर्याय सिलेक्ट करणे फायदेशीर ठरेल? जाणून घेऊया सविस्तर माहिती...

जाहिरात
Read Time: 2 mins

Weight Loss Tips: शरीराचे वाढलेले अतिरिक्त वजन कमी करण्याची प्रक्रिया मुळीच सोपी नसते. विशेषतः ट्रेडमिलवर धावून सुटलेली ढेरी आणि फॅट्स कमी करणाऱ्यांसाठी तर ही प्रक्रिया सोपी नाहीच. धावणे हा एक सर्वात उत्तम कार्डिओ एक्सरसाइज (Cardio Exercise) आहे. यामुळे हृदयाशी संबंधित विकार दूर राहण्यास मदत मिळते आणि कित्येक समस्यांपासून सुटकाही मिळते. काही लोक जीममध्ये जाऊन ट्रेडमिलवर धावून घाम गाळतात. पण यामुळेही फॅट्स घटत नाहीत. बेलीफॅटवरही याचा काहीही परिणाम होत नाही. त्यामुळे लवकरात लवकर वेटलॉस करण्यासाठी ट्रेडमिलवर कोणते पर्याय सिलेक्ट करावे? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया...

(नक्की वाचा: Diabetes and Sugar Level : किती असावी शुगर लेव्हल ? वाचा, कोणती टेस्ट आहे सर्वोत्तम)

वेटलॉससाठी ट्रेडमिलवर कोणत्या मोडवर धावणे ठरेल बेस्ट 

तज्ज्ञांच्या माहितीनुसार, ट्रेडमिलवर धावून सुटलेले पोट सपाट करण्याची इच्छा असेल तर इनक्लाइंड (Inclined) मोड सर्वात उत्तम ठरेल. जवळपास प्रत्येक ट्रेडमिलमध्ये इनक्लाइंड (Inclined) मोडचा पर्याय उपलब्ध असतो. यामुळे वजन जलदगतीने कमी होण्यासाठी मदत मिळते. 

Photo Credit: Pexels

ट्रेडमिलवरील इनक्लाइंड (Inclined) मोडचे फायदे 

तज्ज्ञांच्या माहितीनुसार, इनक्लाइंड मोडचा वापर केल्यास हार्ट रेट वाढतो आणि कॅलरीज् बर्न होण्यास मदत मिळते. ब्रिटेनमधील 20 वर्षांच्या तरुणीने याच इनक्लाइंड (Inclined) मोडचाच वापर करून तब्बल 40 किलोग्रॅम वजन घटवले होते, अशी माहिती काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. ट्रेडमिलवरील हा पर्याय अतिशय प्रभावी आहे.  

Advertisement

(नक्की वाचा: Yoga Day 2024: बेलीफॅटपासून हवीय सुटका? करा या आसनाचा नियमित सराव)

इनक्लाइंड वॉक करण्याची पद्धत

ट्रेडमिलवर चालण्याची पद्धत ही डोंगर चढल्याप्रमाणेच असते. या यंत्राचा वापर करायचा असल्यास इनक्लाइंड मोडमध्ये 12 टक्क्यांचा पर्याय सिलेक्ट करावा आणि जवळपास पाच किमी प्रति तास या वेगाने 30 मिनिटे धावा. सुरुवातीला सामान्य पद्धतीने वॉक करावा. यामुळे हळूहळू हार्ट रेट वाढेल आणि कॅलरीज् बर्न होण्यास मदत मिळेल. शारीरिक क्षमता सुधारेल आणि चालण्याचा वेगही वाढेल. परिणामी वजन घटण्यास मदत मिळेल. एका संशोधनातील माहितीनुसार, पाच टक्के इनक्लाइंड मोड निवडून ट्रेडमिलवर चालल्यास 17 पट वेगाने कॅलरीज् बर्न होतात. यामुळे शरीरास जबरदस्त फायदे मिळतात.

Advertisement

(नक्की वाचा: बेलीफॅटपासून ते पचनप्रक्रियेपर्यंतच्या सर्व समस्या होतील दूर, या आसनांचा करा सराव)

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

शिर्डीतल्या शाळकरी मुलांनी स्वातंत्र्यदिनी दिला सर्वधर्म समभावाचा संदेश, पाहा Droneच्या नजरेतून