- डॉ. रुचा पै
Amaranth Benefits: राजगिरा केवळ उपवासासाठी नव्हे तर रोजच्या आहारासाठीही पौष्टिक सुपरफूड मानले जाते. डाएटमध्ये राजगिऱ्याचा समावेश केला तर कोणत्या समस्यांपासून सुटका मिळेल, जाणून घेऊया सविस्तर माहिती...
राजगिऱ्यातील पोषणतत्त्व | Rajgira Benefits In Marathi
- प्रथिने (Protein) : शरीराची ताकद वाढवतात, अशक्तपणा कमी करतात
- कॅल्शिअम : हाडे आणि दात मजबूत होण्यास मदत मिळते
- लोह (Iron) : रक्तवाढीस मदत, अॅनिमियाग्रस्तांसाठी उपयुक्त
- फायबर : पचन सुधारते, वजन नियंत्रणात ठेवते
- मॅग्नेशियम : स्नायू आणि मज्जासंस्थेसाठी उपयुक्त
- ग्लूटेन-फ्री पोषकद्रव्ये : पचनास हलके
राजगिरा खाल्ल्यास कोणत्या समस्या दूर होतील?
अशक्तपणा असेल, अॅनिमिया आजार, वजन नियंत्रणात ठेवायचे असेल आणि मधुमेहाची समस्या असेल तर योग्य प्रमाणात राजगिऱ्याचे सेवन करावे.
राजगिरा - आयुर्वेदिक दृष्टिकोनातून महत्त्व
आयुर्वेदानुसार राजगिरा हे बल्य म्हणजे ताकद वाढवणारे, पुष्टिकारक म्हणजे धातुपोषण करणारे, अग्निदीपक म्हणजे पचन सुधारणारे असे धान्य मानले जाते.
शरीरातील दोषांवर कसा होतो परिणाम?
- वात शमन करते
- योग्य प्रमाणात घेतल्यास कफ नियंत्रणात राहतो
- मेदधातूचा अति संचय कमी होण्यास मदत मिळते
(नक्की वाचा: Homemade Face Glowing Cream: चेहऱ्यावर हीरोइनसारखी चमक कशी येईल? झटपट घरातच तयार करा क्रीम, ग्लो येईल पटापट)
राजगिरा खाल्ल्यास वजन कमी होईल का?- राजगिऱ्यामध्ये प्रोटीन, फायबरचे प्रमाण जास्त असते त्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.
- राजगिरी ग्लुटेन फ्री असल्याने पोट हलके राहण्यास मदत मिळते.
(नक्की वाचा: Reels Side Effects: आणखी एक Reel आणि सर्वच संपलं! तुमचा मेंदू होतोय गुलाम, क्षणभराचा आनंद ठरेल प्रचंड घातक)
राजगिऱ्याचे सेवन कसे करायचे?- राजगिरा लाह्या तव्यावर कोरड्या भाजून आणि कोमट दुधात मिक्स करून सेवन करावे.
- अशक्तपणात दूर होण्यास मदत मिळेल.
- राजगिरा भाकरी / पोळी
- राजगिरा चिक्की पण मधुमेह आणि वजन वाढीची समस्या असेल तर चिक्की खाणे टाळावे.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

