Weight Loss Tips : भारतीयांच्या दैनंदिन आहारातील चपाती हा एक अविभाज्य भाग आहे. याशिवाय जेवण अपूर्ण वाटते. पण आजच्या धावपळीच्या जीवनात वजन वाढण्याच्या भीतीने अनेक लोक चपाती खाणे टाळतात. मात्र, आहारतज्ज्ञ स्वाती सिंग यांच्या मते, चपातीला आहारातून पूर्णपणे वगळणे योग्य नाही. जर चपाती योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी खाल्ली, तर ती वजन कमी करण्यासह शरीराला अनेक फायदे देऊ शकते. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी चपाती कशी खावी, त्यात किती कॅलरी असतात आणि रात्रीच्या वेळी तिचे प्रमाण किती असावे, याबद्दलची माहिती घेऊयात.
एका चपातीमध्ये किती कॅलरीज?
भारतीय घरांमध्ये रोज खाल्ली जाणारी गव्हाची चपाती ही कार्बोहायड्रेट्सचा एक उत्तम स्रोत आहे. मध्यम आकाराच्या गव्हाच्या चपातीलमध्ये साधारणपणे 104 कॅलरी असतात. 100 ग्रॅम गव्हाच्या पिठाची चपातीत सुमारे 340 कॅलरी असतात. तूप/तेल लावल्यास चपातीमध्ये अतिरिक्त 25 कॅलरी वाढतात. गव्हाच्या चपातीच्या तुलनेत ज्वारी, बाजरी किंवा नाचणी (रागी) या धान्यांपासून बनवलेल्या भाकरी किंवा चपातीमध्ये कॅलरीचे प्रमाण कमी असते.
रात्री किती चपात्या खाव्यात?
आहारतज्ज्ञ स्वाती सिंग यांच्या मते, जे लोक दिवसा व्यवस्थित जेवण करत नाहीत, ते रात्री जास्त खातात. रात्रीच्या वेळी शरीराची कार्यक्षमता कमी होत असल्याने, जास्त रोट्या खाल्ल्यास त्या सहज पचत नाहीत आणि त्यामुळे वजन वाढते. महिलांनी रात्रीच्या जेवणात दोन रोट्यांपेक्षा जास्त खाऊ नये. तर पुरुषांनी रात्रीच्या जेवणात तीन रोट्या योग्य आहेत.
कॅलरीने वजन कसे कमी होते?
वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही घेतलेल्या कॅलरी आणि तुम्ही खर्च केलेल्या कॅलरी यांचा समतोल राखणे आवश्यक आहे. जर तुम्ही बसून काम करत असाल आणि शारीरिक हालचाल कमी असेल, तर रोट्यांची संख्या कमी करणे फायदेशीर ठरू शकते. जर तुम्ही नियमितपणे चालत असाल, व्यायाम करत असाल आणि संतुलित आहार घेत असाल, तर रोटी तुमच्या शरीरासाठी ऊर्जा आणि पोषण मिळवण्याचा एक उत्कृष्ट स्रोत ठरते.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)