Weight Loss Tips : आजकाल वाढतं वजन हा नागरिकांसाठी गंभीर प्रश्न बनला आहे. एकदा वजन वाढू लागलं की यावर नियंत्रण आणणं कठीण होतं. वजन कमी करण्यासाठी अनेक जण विविध प्रकारचे उपाय आणि आपल्या लाइफस्टाइलमध्ये बदल करतात. मात्र वजन कमी करण्याची सुरुवात बऱ्याचदा खाण्या-पिण्याच्या सवयीमधील बदलांनी होते. प्रत्येक व्यक्तीसाठी वजन कमी करण्याची पद्धत वेगवेगळी असते. मात्र काही पदार्थ डाएटमधून हटविल्याने मोठा फरक पडतो. दिप्ती हर्षना हिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेयर केला आहे, ज्यात तिने वजनाबाबत मोठा खुलासा केला. तिने ११ महिन्यात तब्बल ३२ किलो वजन कमी केलं. तिचं वजन ९२ किलोवरुन थेट ६० पर्यंत घसरलं.
दिप्तीनुसार, तिने आपल्या डाएटमधून पाच पदार्थ पूर्णपणे बंद केलं. ज्यामुळे तिला वजन कमी करायला खूप मदत झाली. या बदलांमुळे तिला आपल्या ध्येयापर्यंत पोहोचणं शक्य झालं. जाणून घेऊया दिप्तीने कोणते ५ पदार्थ खाणं बंद केलं.
गोड पदार्थ...
दिप्तीने सर्वात आधी कोल्ड ड्रिंक, पॅकेज ज्यूस आणि साखर घातलेलं पेय बंद केलं. या ड्रिंक्समधून शरीरात अतिरिक्त कॅलरी वाढतात. वजन वाढते, यामुळे शरीरात पाणी साठू शकतं. त्याऐवजी, तिने लिंबाचं पाणी, नारळाचं पाणी आणि ग्रीन टी पिण्यास सुरुवात केली.
पांढरा ब्रेड...
पांढऱ्या ब्रेडमध्ये रिफाइंड कार्बोहायड्रेस असतं, ज्यामुळे शरीरात साखर जलद गतीने वाढू शकते आणि शरीरात फॅट जमा होऊ लागतं. याऐवजी तिने मल्टिग्रेन ब्रेड, पूर्ण गव्हाचा ब्रेड, सॉरडो ब्रेड आणि ओट्सचा आपल्या आहारात समावेश केला.
पॅकेटचे पदार्थ...
चिप्स, फरसाण आणि अन्य पॅकेज स्नॅक्समध्ये मीठ आणि कॅलरीचं प्रमाण अधिक असतं. यामुळे वारंवार भूक लागले आणि वजन वाढण्याची भीती असते. याऐवजी भाजलेले चणे, ड्राय फ्रूट्स आणि मखाना खाण्यास सुरू केलं.
फास्ट फूड...
दिप्तीने बर्गर, फ्रेंच फाइज आणि अन्य तळलेले पदार्थ खाणं बंद केलं. यामध्ये फॅट आणि मिठाचं प्रमाण जास्त असतं. ज्यामुळे वजन वाढू शकतं. याऐवजी घरात तयार केलेले रॅप्स, पनीर टिक्का, चिकन टिक्का आणि साधारण घरात तयार केलेले पदार्थ खाल्ले.
रात्रीच्या वेळेस विनाकारण स्नॅकिंग...
रात्रीच्या वेळी भूक नसताना काहीना काही खाल्ल्याने अतिरिक्त कॅलरी शरीरात जाते. दिप्तीने ही सवय मोडली. दिप्तीने अन्य एका व्हिडिओमध्ये सांगितलं, त्यांनी ना कोणत्या डाएटिशियनची मदत घेतली ना कोणताही फॅन्सी डाएट फॉलो केला. तिचा संपूर्ण फिटनेस रुटीन घरातील जेवण आणि दररोज ४५ मिनिटांच्या व्यायामावर आधारित होता. या नियमितता आणि अनुशासनाच्या मदतीने त्यांनी ११ महिन्यात ३२ किलो वजन कमी केलं.