Vastu Shastra : वास्तूशास्त्रानुसार घर आणि लाईफस्टाईलमध्ये (Lifestyle) कुटुंबांना मोठं महत्त्व आहे. घर बनवताना दिशांचा विचार केला जातो तसंच झोपतानाही याचं मोठं महत्त्व आहे.
तुम्ही चुकीच्या दिशेनं पाय करुन झोपत असाल तर तुमची झोप कमी होईल तसंच तुमची तब्येतही (Health) नीट राहणार नाही. उत्तर दिशेला पाय करुन झोपणं हे खूप फायदेशीर आहे, असं मानलं जातं. पाहूया उत्तर दिशेला पाय करुन झोपण्याचे काय आहेत फायदे
तुमच्या बेडची दिशा कशी असावी हे देखील वास्तूमध्ये सांगण्यात आले आहे. त्यानुसार झोपताना पाय उत्तर दिशेला आणि डोकं दक्षिणेला हवं तसं केलं तर तुमचं आयुष्य सुखाचं होतं, त्याचबरोबर घरामध्ये सूख आणि समृद्धी नांदते.
मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर
वास्तूनुसार उत्तर दिशेला पाय करुन झोपणे हे मानसिक आरोग्यासाठीही चांगले आहे. त्या व्यक्तीचे विचार सकारात्मक राहतात. त्याचबरोबर वैवाहिक आयुष्यातील आनंदामध्येही याचा उपयोग होतो. उत्तर दिशा ही मानसिक आरोग्यासाठी चांगली मानली जाते. या दिशेला पाय ठेवल्यानं तुमची फक्त झोप चांगली होत नाही तर सकाळी उठल्यावर तुम्हाला थकवा देखील जाणवत नाही. संपूर्ण दिवसभर तुमच्यामध्ये उत्साह असतो.
(Disclaimer : ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. NDTV मराठी याची पृष्टी करत नाही.)