जाहिरात

Rice Flour Bhakari : 15 दिवस सलग तांदळाची भाकरी खाल्ल्याने काय होईल? फायदे वाचून तुम्हीही आजपासून सुरू कराल

Tandalachya Bhakriche Fayde : तांदळाचं पीठ आरोग्यदायी असतं. जर तुम्ही सलग १५ दिवस तांदळाची भाकरी खाल्ली तर शरीरात अनेक चांगले बदल पाहायला मिळतील. 

Rice Flour Bhakari : 15 दिवस सलग तांदळाची भाकरी खाल्ल्याने काय होईल? फायदे वाचून तुम्हीही आजपासून सुरू कराल
Rice Flour Roti Benefits

Rice Flour Roti Benefits For Health: अधिकांश घरांमध्ये सर्वसाधारणपणे गव्हाची चपाती केली जाते. त्यासोबत नाचणी, ज्वारी, बाजरीच्या पिठाची भाकरीही अनेक घरांमध्ये नियमित खाल्ली जाते. कोकणातील अधिक घरांमध्ये मात्र सवयीप्रमाणे तांदळाची भाकरी खाण्याची पद्धत आहे. तांदळाचं पीठ आरोग्यदायी असतं. दक्षिणेकडे तांदळाच्या भाकरीला 'अक्की रोटी' म्हटलं जातं. दक्षिणेकडे अक्की रोटी प्रसिद्ध आहे. जर तुम्ही सलग १५ दिवस तांदळाची भाकरी खाल्ली तर शरीरात अनेक चांगले बदल पाहायला मिळतील. 

तांदळाची भाकरी चविष्ट तर असतेच शिवाय पचन, वजन, त्वचा आणि ऊर्जेचा विचार करता अत्यंत फायदेशीरही आहे. ही भाकरी खाल्ल्याने काय फायदे मिळतील, हे जाणून घेऊया. 

तांदळाच्या भाकरीत काय असतं? | What Is in Rice Flour Roti?

तांदळाच्या भाकरीत कार्बोहायड्रेट, फायबर, प्रोटीन, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि विटॅमिन बीसारखे पोषक तत्व असतात. तांदळाचं भाकरी ग्लुटेन फ्री असते. त्यामुळे ज्यांना गव्हाची एलर्जी आहे त्यांच्यासाठी हा चांगला पर्याय आहे. 

15 दिवसांपर्यंत दररोज तांदळाची भाकरी खाण्याचे फायदे | Benefits of Eating Rice Flour Rotis Daily for 15 Days

सर्वाधिक ताकद देणारं फळ कोणतं? | 6 Best Winter Fruits

नक्की वाचा - सर्वाधिक ताकद देणारं फळ कोणतं? | 6 Best Winter Fruits

१ पचन व्यवस्था मजबूत होते (Rice Flour Roti Benefits for Digestion)

तांदळाची भाकरी हलकी असते आणि लवकर पचते. यामधील फायबर पोट स्वच्छ ठेवायला मदत करते आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. जर तुमचं पोट स्वच्छ होत नसेल तर तुम्ही तांदळाची भाकरी ट्राय करू शकता. 

२ वजन कमी व्हायला मदत (Rice Flour Benefits For Weight Loss) 

तांदळाच्या भाकरीत कमी कॅलरीत असतात आणि यामुळे दीर्घकाळ पोट भरलेलं राहतं. त्यामुळे वारंवार खाण्याची इच्छा कमी होते आणि वजय नियंत्रणात राहतं. जर तुमचं पोट वाढत असेल तर ही भाकरी फायदेशीर ठरेल. 

३ चेहऱ्याची चमक वाढते (Rice Flour Roti Benefits for Skin)

तांदळातील अँटीऑक्सिडेंट्स आणि विटॅमिन्समुळे त्वचेला पोषण मिळतं. याच्या नियमित सेवनाने चेहरा उजळतो आणि चेहऱ्यावरील फोड कमी होतात. ज्या लोकांना चेहऱ्यावर चमक हवी असेल त्यांच्यासाठी तांदळाचं पीठ बेस्ट पर्याय आहे. 

४ ग्लुटेनची एलर्जी असणाऱ्यांसाठी सुरक्षित (Rice Flour Roti For Gluten Allergy Person)

ज्या लोकांना गहु किंवा मैद्याची एलर्जी असते त्यांच्यासाठी तांदळाची भाकरी एक सुरक्षित आणि चविष्ठ पर्याय आहे. असे लोक तांदळाची भाकरी आपल्या दररोजच्या डाएटमध्ये सामील करू शकतात. 

५ शरीरची ऊर्जा वाढवते  (Rice Flour Roti Benefits For Body Energy)

तांदळाच्या पिठामधील कार्बोहायड्रेट शरीरात तातडीने ऊर्जा देते. ज्यामुळे थकवा कमी येतो आणि दिवसभर उत्साही वाटतं. 

तांदळाची भाकरी कशी कराल? (How to Make Rice Flour Roti?)
साहित्य:

1 कप तांदळाचं पीठ
चवीनुसार मीठ
गरम पाणी

तांदळाची भाकरी तयार करण्याची पद्धत | Ways to Make Rice Flour Roti

तांदळाचं पीठ मीठ आणि गरम पाणी घालून मळून घ्यावं किंवा पातेल्यात पाणी घ्यावं. ते गरम होऊ द्यावं. त्यानंतर जितकं पाणी तितकं पीठ पाण्यात घालावं. यानंतर लाकडी चमच्याने सर्व पीठ एकत्र करून घ्यावं. पातेल्यावर झाकण ठेवा. आच बंद करावी. अशी उकड काढलेलं पीठ मोठ्या परातीत काढून घ्यावं. पाणी किंवा तूप लावून मळून घ्यावं. यानंतर भाकरी थापून घ्यावं किंवा लाटण्याने लाटून घ्यावं. ही भाकरी तव्यावर दोन्ही बाजून छान भाजून घ्यावी.

या गोष्टींची काळजी घ्या...

मधुमेही रुग्णांनी तांदळाचं सेवन नियंत्रित स्वरुपात करावं. 
भाकरीला खूप जास्त तेल वा तूप लावू नये, अन्यथा फायदे कमी होतील.
तांदळाची भाकरी डाळ, भाजी किंवा दहीसोबत खावी. ज्यामुळे न्यूट्रिशन संतुलित राहील. 


जर तुम्ही सलग १५ दिवस तांदळाची भाकरी खाल्ली तर पचन यंत्रणेत सुधारणा होईल. याशिवाय वजन, त्वचा चांगली होईल. उत्साही राहाल. हा एक सोपा, चवदार आणि आरोग्यदायी पर्याय आहे. ज्याचा वापर तुम्ही दररोजच्या आहारात करू शकता. 

(NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com