जाहिरात

What Is Jalebi's English Name: जिलबीला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? नाव ऐकून डोकं फिरेल गोलगोल

What Is Jalebi's English Name: जिलबीचे मूळ नाव काय आहे? हा गोड पदार्थ इंग्रजी भाषेमध्ये कोणत्या नावाने ओळखला जातो? जाणून घेऊया माहिती...

What Is Jalebi's English Name: जिलबीला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? नाव ऐकून डोकं फिरेल गोलगोल
"What Is Jalebi's English Name: जिलबीचे मूळ नाव काय आहे?"

What Is Jalebi's English Name: जिलबी हा भारतातील लोकप्रिय गोड पदार्थ आहे. या गोड पदार्थांचे नाव ऐकताच तोंडाला पाणी सुटते. सणसमारंभापासून ते मंगलकार्यापर्यंत खाद्यपदार्थांच्या यादीत जिलबीचा समावेश आवर्जून केला जातो. काही लोकांना नाश्त्यामध्येही जिलबी खाणे पसंत आहे. गोड, कुरकुरीत आणि गरमागरम जिलबीचा आस्वाद घेण्याचा आनंद काही औरच असतो. पण जिलबीला हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये काय म्हणतात हे तुम्हाला माहितीये का?  या पदार्थांची नावं ऐकून तुम्हाला धक्का बसेल. तसेच जिलबीशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टीही जाणून घेऊया. 

जिलबी म्हणजे काय? (What Is Jalebi In Marathi)

जिलबी हा एक गोल आकारामध्ये तयार केला जाणार गोड पदार्थ आहे. गरम तेल किंवा तुपामध्ये जिलबी तळली जाते. यानंतर साखरेच्या पाकामध्ये जिलबी ठेवली जाते. जिलबीला इंग्रजी भाषेमध्ये स्वीट प्रेट्झेल (Sweet Pretzel) आणि कॉइल्ड फनल केक (Coiled Funnel Cake) असेही म्हणतात. इंडियन सीरप कोटेड डेसर्ट (Indian Syrup-Coated Dessert) या नावानेही जिलबी हा पदार्थ ओळखला जातो. ही मिठाई बाहेरील बाजूने कुरकुरीत आणि साखरेच्या पाकामुळे आतील बाजूने रसाळ असते.

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: Canva

जिलबी चवीला कशी असते?

जिलबीच्या चवीबाबत सांगायचे झाले तर ज्यांनी गरमागरम जिलबी खाल्लीय त्यांनाच या पदार्थाची चव समजली असणार, यात काही शंका नाही. काही लोक जिलबी रबडी, दूध किंवा दह्यासोबतही खातात. जिलबी केवळ मिठाई नाहीय, तर आनंद साजरा करण्याची परंपरा आहे. कित्येक राज्यांमध्ये नाश्त्यामध्येही जिलबी खाल्ली जाते.  

जिलबीला हिंदी भाषेमध्ये काय म्हणतात? (Jalebi Name In Hindi)

जिलबीला हिंदी भाषेमध्ये जलेबी असे म्हणतात. अरबी शब्द जलाबियापासून जलेबी या शब्दाची निर्मिती झाल्याचे म्हटले जाते. 

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: Canva

जिलबी मिठाईबाबतच्या या गोष्टी माहिती आहेत का?

जिलबी हा पदार्थ मध्य आशियातून भारतामध्ये आल्याचे म्हणतात. तेथे हा पदार्थ जलाबिया किंवा जुलाबिया या नावाने ओळखला जातो.  

Ghee English Name: तुपाला इंग्लिश भाषेमध्ये काय म्हणतात? 99 टक्के लोकांना नाही माहीत

(नक्की वाचा: Ghee English Name: तुपाला इंग्लिश भाषेमध्ये काय म्हणतात? 99 टक्के लोकांना नाही माहीत)

जागतिक जिलबी दिवस | World Jalebi Day 2025

दरवर्षी 30 जुलैला जागतिक जिलबी दिवस साजरा केला जातो.  

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: Canva

जगभरात प्रसिद्ध आहे जिलबी

जिलबी केवळ भारतातच नव्हे तर पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळसह अन्य काही देशांमध्येही आवडीने खाल्ली जाते.  

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Listen to the latest songs, only on JioSaavn.com