जाहिरात
Story ProgressBack

ना नवरा, ना वरात, तरीही इथं मुली करतायत लग्न, काय आहे प्रकार?

What is solo weeding :  या लग्नात नवरी मुलगी लग्नासाठी सर्व प्रकारची तयारी करते. फक्त त्यामध्ये नवरा मुलगा नसतो.

Read Time: 2 mins
ना नवरा, ना वरात, तरीही इथं मुली करतायत लग्न, काय आहे प्रकार?
Solo Wedding चा ट्रेंड वेगानं वाढत आहे. (प्रतिकात्मक फोटो)
मुंबई:

What is Solo Wedding? : लग्न हा दोन जीवांच्या मिलनाचा पवित्र विधी मानला जातो. नातेवाईक, मित्रमंडळींच्या उपस्थितीमध्ये मुलगा आणि मुलगी एकमेकांशी लग्न करण्याची पद्धत जगभरात आहे. काही देशांनी आता समलैंगिक विवाहांनाही मान्यता दिलीय. या प्रकारच्या लग्नासाठीही दोन व्यक्तींची आवश्यकता आहे. सध्या एक लग्नाचा वेगळाच प्रकार ट्रेंड होत आहे. ज्यामध्ये सामान्य लग्नासारखी सर्व तयारी केली जाते. सर्वांना निमंत्रण जातात, पण नवरा मुलगा नसतो. इथं मुली स्वत:शीच लग्न करतात. 

जपानमध्ये या लग्नाचं प्रमाण वाढलंय. विशेष म्हणजे जपानमध्ये सामान्य पद्धतीच्या लग्नामध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात घट होत आहे. पण, या प्रकारच्या लग्नाचा ट्रेंड ( Solo Wedding ) लोकप्रिय होतोय.

 या लग्नात नवरी मुलगी लग्नासाठी सर्व प्रकारची तयारी करते. फक्त त्यामध्ये नवरा मुलगा नसतो.

जपानी कंपन्यांनी या नव्या प्रकारच्या लग्नासाठी खास प्रोडक्ट आणि सर्व्हिस देऊन नफा कमावण्याचं लक्ष्य निश्चित केलं आहे. 

सोलो वेडिंग ट्रेंड ( Solo Wedding Trend )

सोलो वेडिंगसाठी जपान हे नवं मार्केट उदयाला आलं आहे. या प्रकारची लग्न हा पैसे कमावण्याचा चांगला मार्ग आहे, असं वेडिंग प्लॅनर्सचं मत आहे. या लग्नांना डोळ्यासमोर ठेवून अनेक प्रॉडक्ट्स तसंच खास सेवा सुरु करण्यात आल्या आहेत. यामध्ये फोटोशुट ते हानीमून पॅकेज पर्यंतच्या वेगवेगळ्या सेवांचा समावेश आहे.

 ( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

जपानमधील एका कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार, 'सोलो वेडिंग हा बदलत्या काळाचा संकेत आहे. आता जपानी महिला लग्नाशिवाय स्वत:चा सांभाळ करु शकतात. त्यांना पारंपारिक बंधनामध्ये जखडून राहणे मान्य नाही.' या नव्या ट्रेंडवर सोशल मीडियावरही जोरदार चर्चा सुरु आहे. 'सोलो वेडिंग ही चांगली कल्पना वाटत आहे. आनंद मिळवण्याचे अनेक मार्ग आहेत. पण, तुम्ही स्वत:वर प्रेम करणे सर्वात महत्त्वाचं आहे,' असं मत एका युझरनं व्यक्त केलंय. 

( ट्रेंडींग न्यूज : तरुणांमध्ये वाढत असलेला Boysober रिलेशनशिप ट्रेंड काय आहे? यामध्ये मुलं-मुली काय करतात? )
 

कुणी सुरु केला ट्रेंड? (Wedding Without The Bridegroom)

सोलो वेडिंगचा ट्रेंड सुरु करण्याचं श्रेय एडल्ट व्हिडिओ स्टार माना सकुराला दिलं जातं. सकुरानं मार्च 2019 मध्ये स्वत:ला लग्नाची अंगठी घालत शपथ घेतली होती. 'मी माझ्या आयुष्याचा आदर करेन. निरोगी असताना किंवा आजारी पडल्यानंतरही स्वत:वर प्रेम करेन आणि स्वत:ला आनंदी ठेवेन,' अशी शपथ तिनं घेतली होती. 

हनाओका या जपानी महिलेनं तिच्या सोलो वेडिंगवर 250,000 येन खर्च केले. तिनं टोक्योमधील एका रेस्टॉरंटमध्ये पाहुण्यांच्या अनुपस्थितीमध्ये स्वत:शी लग्न केलं. 'स्वत:शी लग्न करण्याचा अर्थ मी कोणत्याही पुरुषाशी लग्न करणार नाही, असा होत नाही,' असं हनाओकानं यावेळी सांगितलं. 

( ट्रेंडींग न्यूज : रिलेशनशिपमध्ये आहात? ‘या' 5 चुका कधीही करु नका, आयुष्यभर होईल पश्चाताप )
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
Previous Article
तुमच्या मुलांमध्ये हे '5' गुण आहेत? असतील तर तुमचे मूल भविष्यात प्रचंड यशस्वी होईल
ना नवरा, ना वरात, तरीही इथं मुली करतायत लग्न, काय आहे प्रकार?
mukhyamantri majhi ladaki bahin yojna Eligible women must have savings account in bank
Next Article
लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी अपडेट, लाभासाठी ही अट पूर्ण करावीच लागणार
;