जाहिरात

आदर्श सुनेमध्ये कोणते गुण असतात? नव्या घरात सर्वांची मनं कशी जिंकाल? 99% तरुणींना माहीत नाही याचं उत्तर

सुनेने सासरी कसं राहायला हवं, या काही छोट्या-मोठ्या गोष्टी मोठा परिणाम करतील हे निश्चित.

आदर्श सुनेमध्ये कोणते गुण असतात? नव्या घरात सर्वांची मनं कशी जिंकाल? 99% तरुणींना माहीत नाही याचं उत्तर

Sasu suna Relationship Tips: सून ही एखाद्या नदीप्रमाणे घरातील प्रत्येकाला सांधत असते, जोडून ठेवत असते. नव्या घरात पाऊल ठेवताच आपल्या चांगल्या वागणुकीने ती सर्वांना आपलंस करुन घेण्याचा, नव्या घरातील माणसांना समजून घेण्याचा प्रयत्न करीत असते. एका आदर्श सुनेची लक्षणं काय असतात आणि सासुला खूश करण्यासाठी काय करायला हवं, रिलेशनशीप कोच यांनी याचं उत्तर दिलं आहे. 

एका चांगल्या सुनेमध्ये काय गूण असायला हवेत?  What qualities should a good daughter-in-law have

आदर राखणं सर्वात मोठा गूण

अधिकांश रिलेशनशिप कोच म्हणतात, एका चांगल्या सुनेची ओळख तिच्या व्यवहारातून होते. ती घरातील प्रत्येक व्यक्तींचा आदर करते. त्यांचं म्हणणं शांतपणे ऐकून घेते आणि आपलं मतही नम्रपणे मांडते. आदर केवळ शब्दांमधून नाही तर व्यवहारातून दर्शवते. जेव्हा सून सासुला आपली आई मानते तेव्हा त्यांचं नातं अधिक मजबूत होते. या घराचा आधार आहे ही भावना सासुमध्ये निर्माण करून दिली तर तुम्ही अर्धी लढाई जिंकली म्हणून समजा.  

गोड बोलणं आणि समजूतदारपणा दाखवणं...

प्रत्येक नात्यात गैरसमज होतात. मात्र चांगली सून रागावर नियंत्रण ठेवते. वाद करीत नाही आणि गोड शब्दात वातावरण हलकं करते. सासूचं नातं सांभाळण्यासाठी तुम्ही कसा संवाद साधता हे महत्त्वाचं आहे. तु्म्ही नम्रपणाने बोलू लागतात तर सासूही हळूहळू तुम्हाला मुलीसारखं मानू लागते. 

रूढी-परंपरांचा आदर करणे

प्रत्येक कुटुंबाच्या काही रुढी-परंपरा असतात. चांगली सून घरातील या परंपरांचा स्वीकार करते आणि त्यांचं पालन करते. एखाद्या उत्सवाची तयारी असो वा पुजेची पद्धत...सासूला अशा सूना आवडतात. कोणत्याही परंपरेविषयी प्रश्न असतील तर चांगली सून प्रेमाने याची उकल करून घेते.  

Latest and Breaking News on NDTV

पोशाखाकडे लक्ष द्या...

सासूला खूश करण्यासाठी आणखी एक सोपी पद्धत म्हणजे तुमचा पोशाख. साधे आणि सण-उत्सवानुसार पोशाख घाला. याचा अर्थ तुम्ही स्टायलिश कपडे घालू नये असा होत नाही. कपड्यांचं संतुलन राखणं आवश्यक आहे. परंपरा आणि ट्रेंड यांचा संतुलन राखलेला पोशाख केला तर सासूला तुमच्याविषयी विश्वास निर्माण होतो. 

पतीच्या घराला स्वत:चं घर समजा...

सून जेव्हा पतीचं घर स्वत:चं घर मानते, तेव्हा घरातील प्रत्येक कोपऱ्यात आपलेपणा जाणवतो. घरातील प्रत्येक छोट्या मोठ्या कामात मदत करणे, सणाच्या कार्यक्रमात सहभाही होणं आणि जबाबदारीने काम करणं...यावरुन लक्षात येतं की ती कुटुंबाचा भाग आहे. अशी सून पाहून सासूच्या मनात सूनेविषयी प्रेम निर्माण होतं. 

What is IV Bar: लग्नात 'आयव्ही बार'चा ट्रेंड! पाहुणे मंडळी थेट ड्रिप लावून घेतात; नेमका प्रकार काय?

नक्की वाचा - What is IV Bar: लग्नात 'आयव्ही बार'चा ट्रेंड! पाहुणे मंडळी थेट ड्रिप लावून घेतात; नेमका प्रकार काय?

चर्चेने सर्व समस्या सुटतात...

अनेकदा सासू-सूनेमधील लहान-सहान गोष्टी मोठं रुप घेतात. यावर सोपा उपाय असतो. जर एखादी गोष्ट खटकली तर मनात ठेवू नये, त्याऐवजी शांतपणे सासूसमोर आपलं म्हणणं मांडावं. यातून नातं पुन्हा चांगलं होण्यास सुरुवात होईल. संवादाने नातं मजबूत होतं आणि दुरावा आपोआप कमी होतो. 

Latest and Breaking News on NDTV

सासूच्या आवडी-निवडीकडे लक्ष द्या

छोट्या गोष्टी अनेकदा परिणामकारक असतात. सासूला खूश करण्यासाठी तिची पसंत समजून घेणं आवश्यक आहे. त्यांना जेवायला काय आवडतं, रंग कोणता आवडतो, याची माहिती करून घ्यावी. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीचं आवडीचं जेवण बनवता तेव्हा तुम्हाला त्या व्यक्तीविषयी प्रेम असल्याचं समजतं. सासूसोबत आपलेपणाने बोला. सासूला आनंदी करण्यासाठी तिच्याशी बसून गप्पा मारा, तिच्या भूतकाळातील आठवणी ऐका किंवा एकत्र चित्रपट पहा. लहान लहान स्टेप्स मोठा परिणाम करू शकतात.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com