
WhatsApp Scam : सायबर गुन्हेगार लोकांची फसवणूक करण्यासाठी वेगवेगळे पर्याय शोधून काढत आहेत. सायबर गुन्हेगारांची ट्रिक लक्षात येण्याआधीच ते फसवणुकीची नवीन पद्धत शोधून काढतात. अशाप्रकारे सायबर गुन्हे लोकांच्या एक पाऊल पुढे जाऊन फसवणूक करतात. फसवणुकीचा असाच एक नवीन मार्ग सायबर गुन्हेगारांनी शोधून काढला आहे. यासाठी त्यांनी व्हॉट्सअॅपची निवड केली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
एखाद्या अनोळखी नंबरवरून व्हॉट्सअॅपवर आलेला एक फोटो तुमचं बँक खातं रिकामं करु शकतो. त्यामुळे आता फक्त एक लिंक किंवा कॉलच नाही तर एक साधा फोटो देखील तुमचं मोठं नुकसान करु शकतो.
कशी होते फसवणूक?
सायबर गुन्हेगार मॅलवेअरने भरलेले फोटो पाठवण्यासाठी व्हॉट्सअॅप सारख्या प्लॅटफॉर्मचा वापर करतात. जेव्हा एखादा युजर त्या फोटोवर क्लिक करतो, तेव्हा त्याच्या नकळत फोनमध्ये धोकादायक सॉफ्टवेअर म्हणजेच मॅलवेअर इन्स्टॉल होतात. यानंतर फोनचे संपूर्ण नियंत्रण सायबर गुन्हेगारांकडे जाते.
(नक्की वाचा- Mobile App : हे 5 सरकारी अॅप तुमच्या मोबाईलमध्ये असायलाच हवेत! काय होईल फायदा?)
याद्वारे, गुन्हेगार तुमची गॅलरी, कॉन्टॅक्ट लिस्ट, बँकिंग अॅप्स, पासवर्ड अॅक्सेस करू शकतात. टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन देखील करू शकतात. या स्थितीत तुमच्या बँकिंग अॅपमध्ये ओटीपी किंवा फिंगरप्रिंट सिक्युरिटी सेट केली असली तरीही ते तुमचे पैसे ट्रान्सफर करू शकतात.
आर्थिक फसवणूकच नाही तर सायबर गुन्हेगार तुमची ID cloning करुन बनावट सोशल मीडिया किंवा बँक खाती देखील तयार करू शकतात. हा डेटा इतर सायबर गुन्ह्यांमध्ये देखील वापरला जाऊ शकतो.
(नक्की वाचा- Post Office Scheme : बँक FD पेक्षा जास्त व्याज, गुंतवणूकही सुरक्षित; दरमाह मिळतील चांगले पैसे)
काय खबरदारी घ्याल?
- कोणताही अनोळखी फोटो, फाइल किंवा लिंक तपासल्याशिवाय उघडू नका.
- तुमच्या फोनवर फक्त प्ले स्टोअर किंवा अॅप स्टोअरवरून अॅप्स डाउनलोड करा.
- बँकिंग अॅप्समध्ये मजबूत पासवर्ड आणि टू-फॅक्टर सिक्युरिटी वापरा.
- जर कोणतीही संशयास्पद हालचाल दिसून आली तर ताबडतोब सायबर क्राईम हेल्पलाइन क्रमांक 1930 वर तक्रार करा.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world