Yogurt Storage Tips : जेवणासोबत दही खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं. वजन कमी करण्यासाठीही दह्याचा उपयोग होतो. दही प्रत्येक वयोगटातील लोकांचा आवडता पदार्थ आहे. आरोग्याच्या दृष्टीनेही दह्याला नैसर्गिक प्रोबायोटिक मानलं जातं. ज्यामुळे पचन सुधारतं आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते. पण फ्रिजमध्ये ठेवलेलं दही किती दिवसांपर्यंत ताजं राहतं? शिळं दही खाणं आरोग्यासाठी सुरक्षीत आहे की नाही? असे प्रश्न अनेकांना पडतात.
अनेक लोकांना वाटतं की, दही फ्रिजमध्ये ठेवलं की खूप दिवस खराब होत नाही, तर काही लोक 2-3 दिवसांनीच ते फेकून देतात. पण नेमकं सत्य काय? दही योग्य पद्धतीने साठवून ठेवलं, तर ते अनेक दिवस सुरक्षित राहू शकतं, पण योग्य वेळ निघून गेल्यावर दही आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. चला, फ्रिजमध्ये दही किती दिवस चांगलं राहतं आणि ते साठवण्याची योग्य पद्धत काय आहे? जाणून घ्या सविस्तर माहिती.
फ्रिजमध्ये दही किती दिवस ताजं राहतं?
1. घराच बनवलेला ताजा दही
जर दही घरात बनवलेला असेल आणि तो व्यवस्थित झाकून फ्रिजमध्ये ठेवलेला असेल, तर साधारणपणे दही 5 ते 7 दिवसांपर्यंत खाण्यास योग्य राहते. पण दह्याची चव आणि प्रोबायोटिक फायदे पहिल्या 3-4 दिवसांतच मिळतात. त्यानंतर दही आंबट होऊ लागते.
2. बाजारातून आणलेला पॅकेटमधील दही
पॅकेटमधल्या दह्यामध्ये प्रोसेसिंग आणि प्रिझर्वेशन चांगलं असतं, त्यामुळे एक्सपायरी डेटपर्यंत दही ताजा राहतो. पण दह्याचं पॅकेट उघडलेलं नसावं. एकदा पॅकेट उघडल्यानंतर तेही 3-4 दिवसांच्या आत संपवणं योग्य ठरतं.
नक्की वाचा >> Cauliflower Worms Tricks: फुलकोबीत किडे आहेत की नाही? काही मिनिटांतच कळेल, 'या' सोप्या ट्रिक्स फॉलो करा
दही स्टोर करण्याची योग्य पद्धत कोणती?
1) नेहमी स्वच्छ आणि कोरड्या भांड्याचा वापर करा
दही ठेवण्यासाठी काचेचं किंवा फूड-ग्रेड प्लास्टिकचा स्वच्छ डब्बा वापरा. ओलं किंवा घाणेरडं भांडं वापरल्यास दही लवकर खराब होतं.
2) झाकण नीट बंद ठेवा
दही नेहमी एअरटाइट कंटेनरमध्ये ठेवा. उघड्या भांड्यात ठेवलेला दही फ्रिजमधील वास शोसून घेतं आणि ते लवकर आंबट होतं.
3) फ्रिजच्या योग्य भागात ठेवा
दही फ्रिजच्या दरवाज्यावर ठेवू नका, कारण तिथे तापमान वारंवार बदलतं. दही फ्रिजच्या मधल्या किंवा मागच्या शेल्फवर ठेवा, जिथे थंडावा स्थिर राहतो.
नक्की वाचा >> Gk News : गणितात 'I Love You' ला काय म्हणतात? 99 टक्के लोक झाले फेल, उत्तर सांगेल तोच खरा प्रेमी
4) चमचा नेहमी स्वच्छ ठेवा
दही काढताना ओला किंवा खराब चमचा कधीही वापरू नका. यामुळे बॅक्टेरिया दह्यात जातात आणि तो लवकर खराब होतो.
5) वारंवार बाहेर काढू नका
दही वारंवार फ्रिजमधून बाहेर काढून पुन्हा आत ठेवल्यास त्याच्या ताजेपणा निघून जातो. जेवढी गरज आहे तितकाच दही वेगळा काढा.
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world