Copper Vessel Water: तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्यास कोणत्या आजारातून मुक्ती मिळेल? कोणी पाणी पिऊ नये?

Copper Vessel Water Benefits: तांब्याच्या भांड्यामध्ये किती दिवस पाणी ठेवावे? तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे फायदेशीर मानले जाते, पण ठराविक लोकांनी हे पाणी पिणे टाळावे. जाणून घेऊया सविस्तर माहिती...

जाहिरात
Read Time: 3 mins
"Copper Vessel Water Benefits: तांब्याच्या भांड्यातील पाणी कधी पिऊ नये?"

Copper Vessel Water Benefits: भारतीय परंपरेमध्ये तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे ही एक अतिशय प्राचीन पद्धत म्हणून जगभरात प्रसिद्ध जाते. आयुर्वेदानुसार तांब्यांच्या भांड्यातील पाणी प्यायल्यास शरीरास कित्येक फायदे मिळतात. तांब्यातील अँटी-बॅक्टेरियल, अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात. हे पाणी प्यायल्यास काही आजारांपासून सुटका मिळू शकते पण सर्वांसाठीच ही पद्धत लाभदायक ठरेल, असे नव्हे.  तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्यास कोणत्या आजारांपासून मुक्तता मिळेल आणि कोणत्या लोकांनी हे पाणी पिणे टाळावे, जाणून घेऊया सविस्तर माहिती...  

तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे फायदे आणि तोटे (Advantages And Disadvantages Of Copper Vessel Water)

तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्यास कोणते आजार ठीक होतील?

  1. तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्यास गॅस, अ‍ॅसिडिटी, बद्धकोष्ठता, अ‍ॅनिमिया आणि संधिवात यासारख्या आजारांपासून मुक्तता मिळेल. 
  2. तांब्यातील अँटी-बॅक्टेरिअल, अँटी- इन्फ्लेमेटरी गुणधर्मामुळे पचनप्रक्रिया सुधारते आणि शरीर डिटॉक्स होण्यास मदत मिळते. 
  3. लोह योग्य पद्धतीने शोषून घेण्यास शरीराला मदत मिळते, ज्यामुळे अ‍ॅनिमिया आजाराचा धोका टळू शकतो. 
  4. अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्मांमुळे संधीवातामुळे येणारी सूज आणि वेदना कमी होण्यास मदत मिळेल.  

(नक्की वाचा: Joint Pain Remedy: सांध्यांमधील वेदना खेचून बाहेर काढतील हे उपाय, फॉलो करा हंसा योगेंद्र यांनी सांगितलेल्या टिप्स)

सकाळी रिकाम्या पोटी तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्यास कोणते फायदे मिळतील?

तांब्याच्या भांड्यामध्ये रात्रभर पाणी ठेवून सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्यास अ‍ॅनिमिया आजारापासून मुक्तता होण्यास मदत मिळते, असे म्हणतात. याव्यतिरिक्त थायरॉइड हार्मोनचे संतुलन राखण्यास मदत करते. चयापचयाची क्षमता सुधारते आणि शरीरातील हार्मोनल असंतुलनाची समस्या कमी करण्यास मदत मिळते.

तांब्याच्या भांड्यातील पाणी कोणी पिऊ नये?

  • गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांनी तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे टाळावे.
  • जुलाब, उलटी, मळमळणे, गॅस, पोटातील जळजळ किंवा रक्तस्त्रावाशी संबंधित गंभीर समस्या असल्यास तांब्याच्या भांड्यातील पाणी पिऊ नये. 
  • तसेच ज्यांच्या शरीरामध्ये तांब्याची पातळी वाढली असल्यास त्यांनीही हे पाणी पिणे टाळावे. 

तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे तोटे

तांब्याच्या भांड्यांचा जास्त वापर केल्यास किंवा चुकीच्या पद्धतीने वापर केल्यास कॉपर टॉक्सिसिटीचा सामना करावा लागू शकतो. यामुळे मळमळ, उलट्या, पोटदुखी आणि अतिसार यासारख्या समस्या उद्भवू शकतात. काही प्रकरणांमध्ये यकृत आणि मूत्रपिंडाचेही नुकसान होऊ शकते. लिंबू किंवा दही यासारख्या आंबट गोष्टी तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवू नये.  

(नक्की वाचा: Side Effects Of Eating Wheat: गव्हाची पोळी रोज खाताय? यातील एक प्रोटीन आरोग्यासाठी ठरू शकते घातक)

तांब्याच्या भांड्याचा उपयोग कधी करू नये?

  • तांब्याच्या भांड्यामध्ये दही, दूध, लिंबू यासारख्या गोष्टी ठेवू नये. 
  • असे केल्यास पदार्थांमध्ये वाईट रिअ‍ॅक्शन होते आणि आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतात. 
  • उन्हाळ्यामध्ये तांब्याच्या भांड्यांचा वापर टाळावा. कारण शरीरातील उष्णता अधिक वाढू शकते. 
  • तांब्याचे भांडे जुने झाले असेल तर वापरू नये. 

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)