जाहिरात

Joint Pain Remedy: सांध्यांमधील वेदना खेचून बाहेर काढतील हे उपाय, फॉलो करा हंसा योगेंद्र यांनी सांगितलेले उपाय

What Is The Best Way To Relieve Joint Pain: नैसर्गिक उपचार पद्धतींनी तुम्ही सांधेदुखीच्या समस्येतून सुटका मिळवू शकता, कशी? जाणून घेऊया याबाबतची माहिती...

Joint Pain Remedy: सांध्यांमधील वेदना खेचून बाहेर काढतील हे उपाय, फॉलो करा हंसा योगेंद्र यांनी सांगितलेले उपाय
"Joint Pain Remedy: सांधेदुखीच्या समस्येतून सुटका मिळवण्यासाठी उपाय"

Joint Pain Remedy: सांधेदुखी ही एक सामान्य समस्या आहे. पूर्वी वयस्कर लोक सांधेदुखीच्या समस्येमुळे त्रस्त असत, पण आता तरुणमंडळीही सांध्यांच्या दुखण्यामुळे हैराण असल्याचे आढळते . एकाच ठिकाणी दीर्घकाळ बसणे, खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयी, तणाव आणि शरीरातील पोषणतत्त्वांची कमतरता यासारख्या गोष्टी सांधेदुखीसाठी कारणीभूत असतात. सांधेदुखीच्या समस्येतून झटपट सुटका मिळवण्यासाठी लोक औषधोपचाराची मदत घेतात. पण यामुळे कायमस्वरुपी त्रास दूर होणार नाही. प्रसिद्ध योगगुरू आणि हंसा योगेंद्र यांनी त्यांच्या यु-ट्यूब चॅनेलवर यासंदर्भात व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये त्यांनी सांधेदुखीच्या त्रासातून सुटका व्हावी, यासाठी सोपे आणि रामबाण उपाय शेअर केले आहेत. जाणून घेऊया सविस्तर माहिती...

सांधेदुखीच्या समस्येतून कशी मिळेल सुटका?

स्ट्रेचिंग आणि आसन

योगगुरू हंसा योगेंद्र यांनी सांगितले की, सांध्यांची हालचाल योग्य पद्धतीने व्हावी, यासाठी स्ट्रेचिंग करणे आवश्यक आहे. दिवसभरात थोडासा वेळ काढून वॉक करावा, मानेची योग्य पद्धतीने हालचाल करावी, खांदे आणि मनगट हलक्या स्वरुपात स्ट्रेच करावे. शरीर स्ट्रेच झाल्यानंतर पवनमुक्तासन, भुजंगासन, वक्रासन यासारख्या आसनांचा सराव करावा. आसनांमुळे सांध्यांची हालचाल वाढते आणि वेदना कमी होण्यास मदत मिळते. 

(नक्की वाचा: Joint Pain Treatment: 2 थेंब लावा हे तेल, सांधेदुखी पटकन होईल गायब)

प्राणायाम 

हंसा योगेंद्र यांनी सांगितले की, योग्य पद्धतीने श्वास घेतल्यासही वेदना कमी होण्यास मदत मिळेल. नियमित प्राणायम केल्यास तणाव कमी होईल आणि शरीरामध्ये ऑक्सिजनची पातळी वाढण्यासह ऑक्सिजनचा प्रवाह देखील सुधारेल. यामुळे वेदना कमी होण्यास मदत मिळेल. 

(नक्की वाचा: Healthy Bones Tips: हाडे मजबूत कशी ठेवावी? केवळ 20 मिनिटे करा हे काम)

तणाव मुक्तता 

योगगुरूंच्या माहितीनुसार, तणावामुळे सांध्याचे दुखणे अधिक वाढते. यामुळे काही वेळ आराम करणे आवश्यक आहे. शवासन, ध्यानधारणा यासारख्या गोष्टींचा सराव करावा. मन शांत होण्यास, वेदना कमी होण्यास मदत मिळेल. 

योगिक डाएट

आले, काळी मिरी, लवंग, शेवग्याच्या शेंगा यासारख्या खाद्यपदार्थांचा डाएटमध्ये समावेश केल्यास हाडे आणि सांध्यांच्या आरोग्यास फायदे मिळतील. कॅल्शिअम, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्सयुक्त आहारामुळे सांधे मजबूत होतील. सांधेदुखीच्या वेदना नैसर्गिक स्वरुपात कमी होतील. 

गरम पाण्याने शेक द्यावा

  • वरील उपाय करणं शक्य नसल्यास हंसा योगेंद्र यांनी सांगितले की सांधेदुखीच्या समस्येतून सुटका मिळवण्यासाठी गरम पाण्याच्या पिशवीने शेक द्यावा. 
  • शक्य असल्यास रोज 10-15 मिनिटे कोवळ्या उन्हामध्ये बसणे फायदेशीर ठरेल, यामुळे शरीराला नैसर्गिक स्वरुपात व्हिटॅमिन डी मिळेल. 
  • सांधेदुखीची समस्या गंभीर वाटत असल्यास वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधावा.  

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com