जाहिरात

Best Time To Drink Coconut Water: नारळाचे पाणी पिण्याची सर्वोत्तम वेळ कोणती? कसे मिळतील सर्वाधिक फायदे

Best Time To Drink Coconut Water: कोणत्या वेळेस नारळ पाणी प्यायल्यास आरोग्यास सर्वाधिक लाभ मिळतील? जाणून घ्या योग्य उत्तर

Best Time To Drink Coconut Water: नारळाचे पाणी पिण्याची सर्वोत्तम वेळ कोणती? कसे मिळतील सर्वाधिक फायदे
"Best Time To Drink Coconut Water: नारळ पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती"

Best Time To Drink Coconut Water: नारळाचे पाणी आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते. यातील पोषणतत्त्वांमुळे शरीर हायड्रेट राहते आणि शरीराला ऊर्जाही मिळते. यातील इलेक्ट्रोलायट्स उदाहरणार्थ पोटॅशिअम, सोडिअम आणि मॅग्नेशिअम शरीरातील पाणी तसेच खनिजांची पातळी संतुलित ठेवण्याचे कार्य करतात. नारळ पाणी पिण्याचे असंख्य फायदे माहिती असतानाही कोणत्या वेळेस पाणी पिणे आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरते? हे तुम्हाला माहितीय का? या लेखाद्वारे जाणून घेऊया योग्य उत्तर...  

नारळाचे पाणी सकाळी रिकाम्या पोटी प्यावे की पिऊ नये?

सकाळी रिकाम्या पोटी नारळाचे पाणी पिणे फायदेशीर ठरू शकते. नारळाच्या पाण्यामुळे शरीर हायड्रेट राहते, यातील अँटी-ऑक्सिडंट्समुळे शरीरातील विषारी घटक बाहेर फेकले जातात. दिवसाची सुरुवात तुम्ही नारळ पाणी पिऊन करणार असाल तर शरीरामध्ये ऊर्जा टिकून राहील. त्वचेवर नैसर्गिक तेज येईल.  

वर्कआउटनंतर पाणी प्यावे का? 

वर्कआउटदरम्यान घामावाटे शरीरातील इलेक्ट्रोलायट्स आणि खनिजांची पातळीही कमी होते. व्यायामामुळे शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी नारळ पाणी पिणे फायदेशीर ठरू शकते. यातील पोटॅशिअम आणि मेग्नीशिअममुळे थकवा दूर होण्यास मदत मिळू शकते. शरीराच्या स्नायूंनाही आराम मिळेल. 

तसेच मळमळ, उलटी, जुलाब, कमकुवतपणा जाणवणे किंवा ताप यासारख्या समस्या जाणवत असल्यास नारळाचे पाणी पिणे फायदेशीर ठरू शकते. नारळ पाण्यामुळे शरीरातील पाणी तसेच खनिजांची कमतरता भरून निघण्यास मदत मिळेल.

(नक्की वाचा: Coconut Water Benefits: रोज नारळ पाणी प्यायल्यास काय होईल?)

नारळाचे पाणी किती प्रमाणात प्यावे?

साधारणतः दिवसभरात एक ते दोन ग्लास नारळाचे पाणी पिणे पुरेसे ठरेल. मूतखडा, किडनशी संबंधित समस्या, रक्तदाब यासारख्या समस्या असणाऱ्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊन नारळ पाणी प्यावे. 

(नक्की वाचा: नारळ पाणी पिण्याची ही आहे अतिशय योग्य वेळ)
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.) 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com