
Banana Side Effects In Marathi: शरीर सुदृढ राहण्यासाठी आपण विविध फळांचं सेवन करतो. यातील बहुतांश जणांचं आवडतं फळ म्हणजे केळं. देशभरात केळ खाण्याचं प्रमाण सर्वाधिक असल्याचं सांगितलं जातं. केळ्यापासून अनेक पदार्थ तयार केले जातात. जिमला जाणारे लोक आवर्जुन केळी खातात. केळामध्ये कार्बोहायड्रेट, फायबर, विटॅमिन बी6, विटॅमिन सी, पोटॅशियम, मॅग्नेशियन, मॅगेनीजसारखे घटक असतात. जे शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहेत.
मात्र केळ सर्वांसाठी फायदेशीर नाही. हो हेच सत्य आहे. हेड क्लिनिकल न्यूट्रिशन, FMRI डॉक्टर दीप्ती खटूजा यांनी यासंदर्भातील अधिक माहिती दिली आहे. दीप्ति खटूजा यांनी सांगितलं की, तु्म्ही कोणतंही फळ कधीही खाऊ शकता. मात्र जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर कमी प्रमाणात केळ्याचं सेवन करावं असा सल्ला दिला जातो.

केळी कोणी खाऊ नये?
डॉ. दीप्ती खतुजा यांच्या मते, जर तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर केळी कमी प्रमाणात खाणं आवश्यक आहे. वजन कमी करण्यासाठी केळी बंद करण्याची गरज नाही. केळी हा पोटॅशियमचा चांगला स्रोत आहे. त्यामुळे फळांचा चाट करताना केळी नक्कीच घालू शकता. मात्र याचं प्रमाण कमी असावं. यासोबतच, डॉक्टरांनी सांगितलं की, केळीमध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते. किडनीच्या रुग्णांना केळी खाण्याचा सल्ला दिला जात नाही. म्हणून, जर तुम्हाला किडनीचा त्रास असेल तर चुकून ही हे फळ खाऊ नका.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world