UPSC Exam : UPSC परीक्षेत केव्हाच पेपरफुटी का होत नाही? या व्यवस्थेत नेमकं काय आहे खास?

दरवर्षी लाखो उमेदवार UPSC ची परीक्षा देतात, मात्र आजपर्यंत युपीएससी परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याची कोणतीही मोठी घटना समोर आलेली नाही.

जाहिरात
Read Time: 2 mins

UPSC Exam : देशातील विविध भरती परीक्षांमध्ये पेपर लिक होण्याच्या घटनांनी लाखो तरुण चिंतेत आले आहेत. अशा परिस्थितीत लोकसेवा आयोगाची (UPSC) सिव्हिल सेवा परीक्षा आपली विश्वासार्हता आणि सुरक्षा व्यवस्थेसाठी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. दरवर्षी लाखो उमेदवार ही परीक्षा देतात, मात्र आजपर्यंत युपीएससी परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याची कोणतीही मोठी घटना समोर आलेली नाही. यामागे आयोगाची अत्यंत कडक आणि बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था कारणीभूत आहे. 

UPSC परीक्षा कशी घेते?

UPSC प्रश्नपत्रिकेचा संच तयार करण्याची प्रक्रिया पूर्णपणे गोपनीय ठेवते. प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या तज्ज्ञांची ओळख काही ठराविक लोकांनाच माहीत असते. विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ प्रश्न तयार करतात आणि संपूर्ण प्रक्रियेवर अनेक स्तरांवर देखरेख ठेवली जाते. कोणत्याही एका व्यक्तीकडे संपूर्ण माहिती नसते, ज्यामुळे गोपनीयता जपली जाते.

Advertisement

नक्की वाचा - Women Property : पती-मुलं नसतील तर महिलेच्या संपत्तीवर कुणाचा अधिकार? माहेर की सासर; हैराण करणारा नियम

प्रश्नपत्रिकांची छपाई...

प्रश्नपत्रिकांची छपाईदेखील अत्यंत सुरक्षित वातावरणात केली जाते. छपाई केंद्रात प्रवेश आणि बाहेर पडण्याच्या प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवलं जातं. कर्मचाऱ्यांचे मोबाइल फोन, इंटरनेट आणि अन्य माध्यमांच्या वापरावर बंदी असते. अनेक ठिकाणी सीसीटीव्ही आणि बायोमेट्रिक नियंत्रणासारखी व्यवस्था लागू केली जाते, ज्यामुळे कोणीही परवानगीशिवाय बाहेर जाऊ शकत नाही. 

विशेष सीलबंद पॅकेट...

प्रिटिंग झाल्यानंतर प्रश्नपत्रिकांचा संच विशेष सीलबंद पाकिटांमध्ये ठेवला जातो. ही पाकिटं परीक्षा केंद्रांपर्यंत पोहोचविण्यासाठी सुरक्षित वाहतूक व्यवस्थेचा अवलंब केला जातो. संपूर्ण प्रक्रियेत प्रत्येक टप्प्याचा रेकॉर्ड ठेवला जातो आणि जबाबदार अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली साहित्य पाठविले जाते. कोणत्याही पॅकेटमध्ये छेडछाड झाल्यास, ती तत्काळ ओळखता येते.

परीक्षा केंद्रांवरही कडक तयारी...

परीक्षा केंद्रांवर सुरक्षेची मोठी तयारी असते. प्रश्नपत्रिका परीक्षा सुरू होण्याच्या काही मिनिटांपूर्वी दिलेल्या प्रक्रियेनुसार उघडल्या जातात. केंद्र अधिक्षक आणि अन्य अधिकाऱ्यांच्या निरीक्षणाखाली ही प्रक्रिया राबवली जाते. यामुळे परीक्षा सुरू होण्यापूर्वी प्रश्नपत्रिका बाहेर जाण्याची शक्यता संपुष्टात येते. 

UPSC ची विश्वासार्हता...

UPSC च्या विश्वासार्हतेचं एक प्रमुख कारण म्हणजे त्यांच्या संस्थेची स्वायतत्ता आहे. 
संविधानानुसार स्थापित, हा आयोग स्वतंत्रपणे काम करतो आणि भरती परीक्षा आयोजित करताना उच्च मानकांचं पालन केलं जातं. यामुळेच UPSC ला देशातील सर्वात विश्वासार्ह परीक्षा संस्थांपैकी एक मानला जातो.

Advertisement