जाहिरात

Winter Hair Care Tips: हिवाळ्यात डोक्याला येणाऱ्या खाजेमुळे त्रस्त आहात? करा हे 5 उपाय

Winter Hair Care Tips: हिवाळा ऋतूमध्ये डोक्याच्या त्वचेवर येणाऱ्या खाजेमुळे तुम्ही देखील हैराण होता का? जाणून घ्या पाच सोपे उपाय...

Winter Hair Care Tips: हिवाळ्यात डोक्याला येणाऱ्या खाजेमुळे त्रस्त आहात? करा हे 5 उपाय
"Winter Hair Care Tips: हिवाळ्यामध्ये तुम्ही देखील केसांच्या समस्येमुळे त्रस्त असता का?"
Canva

Winter Hair Care Tips: हिवाळ्यात तापमानात घट होण्यासह आर्द्रताही कमी होत जाते. हवामानातील या बदलाचे परिणाम आरोग्यासह त्वचा आणि केसांवरही होतात. स्कॅल्प म्हणजे डोक्याच्या त्वचेवरही दुष्परिणाम होतात. डोक्याला खाज येणे, त्वचा कोरडी होणे, कोंडा होणे यासारख्या समस्या सामान्य आहेत. आयुर्वेदानुसार शरीरामध्ये वात दोष वाढल्याने ही समस्या निर्माण होऊ शकते. शरीरातील पोषणतत्त्वांची कमतरता आणि रक्तप्रवाह प्रक्रिया सुरळीत नसणे या गोष्टीही स्कॅल्पची त्वचा कोरडी होण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात. 

टाळूच्या त्वचेतून स्त्राव होणारे नैसर्गिक तेल आणि ओलावा कमी होतो, त्यावेळेस हेअर कॉलिकल कमकुवत होतात तसेच डोक्याला खाज येते आणि केस कोरडे होतात. 

हिवाळ्यामध्ये केस आणि स्कॅल्पची काळजी कशी घ्यावी? | Winter Hair Care Tips 

1. नारळाचे तेल

नारळाच्या तेलाने डोक्याचा मसाज केल्यास त्या भागातील रक्तप्रवाह सुधारतो, याद्वारे स्कॅल्पला पोषणतत्त्वांचा पुरवठा होऊन त्वचेचा कोरडेपणा कमी होतो. म्हणून स्नान करण्यापूर्वी किंवा झोपण्यापूर्वी कोमट तेलाने डोक्याचा मसाज करणे फायदेशीर मानले जाते. आयुर्वेदानुसार नारळाचे तेल स्कॅल्पवर लावल्यास शरीरातील वातदोष शांत होण्यास मदत मिळते. 

2. अ‍ॅलोव्हेरा जेल

अ‍ॅलोव्हेरातील पोषणतत्त्वांमुळे डोक्यावरील जळजळ, स्कॅल्पला येणारी खाज आणि त्वचेचा कोरडेपणा कमी होण्यास मदत मिळेल. कोरफडीचे ताजे पान काढा, त्याचा पल्प तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटू शकता. अ‍ॅलोव्हेराची पेस्ट स्कॅल्पवर 15-20 मिनिटांसाठी लावून ठेवा आणि यानंतर कोमट पाण्याने केस स्वच्छ धुऊन घ्यावे. नियमित स्वरुपात हा उपाय केल्यास स्कॅल्पला थंडावा मिळेल.  

3. लिंबाचा रस

लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी असते, यामुळे केस मुळासकट मजबूत होतात आणि डोक्याला येणारी खाज कमी होण्यास मदत मिळते. लिंबाचा रस पाण्यात मिक्स करुन स्कॅल्पवर लावा आणि 10-15 मिनिटांनंतर केस कोमट पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या. 

4.ऑलिव्ह ऑइल

ऑलिव्ह ऑइलमध्ये ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिडचे प्रमाण जास्त असते, याद्वारे केसांच्या मुळांना पोषणतत्त्वांचा पुरवठा होईल आणि केसांचा कोरडेपणा कमी होईल. तेल थोडेसे कोमट करून केसांवर लावा आणि 30 मिनिटांनंतर केस स्वच्छ धुऊन घ्या. नियमित हा उपाय केल्यास स्कॅल्पला ओलावा मिळेल, कोरड्या-निस्तेज केसांची समस्या कमी होईल. डोक्याला खाज येणार नाही. 

Glowing Face Tips: कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे चेहरा काळा पडू लागतो? काय खाल्ल्यास चेहऱ्यावर नॅचरल ग्लो येईल

(नक्की वाचा: Glowing Face Tips: कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे चेहरा काळा पडू लागतो? काय खाल्ल्यास चेहऱ्यावर नॅचरल ग्लो येईल)

5. अ‍ॅपल सायडर व्हिनेगर 

स्कॅल्पला येणाऱ्या खाजेपासून सुटका मिळवण्यासाठी अ‍ॅपल सायडर व्हिनेगरचा वापर करू शकता. अर्धा कप पाण्यात एक चमचा अ‍ॅपल सायडर व्हिनेगर मिक्स करा. हे मिश्रण स्कॅल्पला लावा, 15-20 मिनिटांनंतर कोमट पाण्याने केस स्वच्छ धुऊन घ्या. स्कॅल्पवरील जंतूंचा खात्मा होईल आणि डोक्याला खाज येणार नाही. स्कॅल्पची त्वचा निरोगी राहण्यासही मदत मिळेल.  

Hair Growth Tips: केसांची वाढ भराभर कशामुळे होईल,आवळा की अ‍ॅलोव्हेरा? घनदाट आणि लांबसडक केसांसाठी काय वापरावे

(नक्की वाचा: Hair Growth Tips: केसांची वाढ भराभर कशामुळे होईल,आवळा की अ‍ॅलोव्हेरा? घनदाट आणि लांबसडक केसांसाठी काय वापरावे)

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

(Content Source : IANS)

Listen to the latest songs, only on JioSaavn.com