Amla Benefits: हिवाळा ऋतू सुरू होताच बाजारपेठांमध्ये पालेभाज्या, फळांसह आवळ्याचीही आवक वाढते. थंडीच्या दिवसांत पालेभाज्यांचे सेवन करणं आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. पण थंडीमध्ये आवळा हे आरोग्यासाठी सुपरफुड मानले जाते. व्हिटॅमिन सी आणि अँटी-ऑक्सिडंट्सचे उत्तम स्त्रोत म्हणजे आवळा. आवळ्याचे लोणचे, आवळ्याचा मुरांबा आणि चटणी खाणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. हिवाळ्यात आवळ्याचे सेवन केल्यास काय होते? जाणून घेऊया सविस्तर माहिती...
हिवाळ्यात आवळ्याचे सेवन का करावे? | Amla Benefits In Marathi
व्हिटॅमिन सी आणि अँटी-ऑक्सिडंट्स उत्तम साठा
आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण जास्त असते, व्हिटॅमिन सीमुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते. याद्वारे शरीराचे प्रदूषण, संसर्ग आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसपासून संरक्षण होते. आवळा खाल्ल्यास त्वचेचे आरोग्यही सुधारण्यास मदत मिळेल. सांध्यांचे आरोग्यही निरोगी राहील. व्हिटॅमिन सीव्यतिरिक्त आवळ्यामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स, गॅलिक अॅसिड, एलेजिक अॅसिड, फ्लेव्होनॉइड्स, पॉलीफेनॉल आणि टॅनिन हे गुणधर्म आहेत. याद्वारे शरीराचे हिवाळ्यातील आजारांपासून संरक्षण होण्यास मदत मिळेल.
(नक्की वाचा: Ginger Water Benefits: जेवणानंतर आल्याचे पाणी प्यायल्यास काय होतं? डॉक्टरांनी सांगितल्या 5 महत्त्वाच्या गोष्ट)
पचनसंस्था मजबूत होईल
आवळ्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, यामुळे शरीराची पचनसंस्था मजबूत होते आणि पचनाशी संबंधित समस्यांपासून सुटका होईल. आवळ्यातील फायबर आणि विशेषक फायटोकेमिकल्समुळे आतड्यांची हालचाल होण्यास मदत मिळते. यामुळे बद्धकोष्ठता आणि पोट फुगण्याच्या समस्येतून सुटका होईल.
(नक्की वाचा: Sleep Tips: गाढ झोपेसाठी कोणत्या अवयवाचा मसाज करावा? कोणते अवयव दाबल्यास झोप पटकन येते? वाचा 100% रामबाण उपाय)
त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर
आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटी-ऑक्सिडंट्सचा समावेश आहे, जे त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. आवळ्यातील व्हिटॅमिन सी आणि अँटी-ऑक्सिडंट्स गुणधर्मामुळे शरीरामध्ये कोलेजनचे उत्पादन होण्यास मदत मिळते. आवळ्याचे योग्य प्रमाणात आणि योग्य वेळेत सेवन केले तर त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत मिळेल.
आवळ्यातील फायबर आणि अँटी-ऑक्सिडंट्समुळे शरीरातील रक्तशर्करेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत मिळेल. घरच्या घरी देखील तुम्ही आवळ्याचा ज्युस तयार करू शकता.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)