Ginger Water Benefits: आल्यामुळे केवळ स्वयंपाक तसंच चहाची चव वाढतेच असं नाही तर आल्यातील पोषणतत्त्वांमुळे असंख्य आजारही बरे होण्यास मदत मिळते. आल्यामध्ये औषधी गुणधर्मांमुळे शरीर निरोगी राहण्यास मदत मिळते. आल्यामध्ये व्हिटॅमिन सी, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम, मॅग्नीज, तांबे आणि अन्य अँटी-ऑक्सिडंट्सचा समावेश आहे. बहुतांश लोक केवळ चहामध्ये किंवा डाळीभाजींमध्ये आल्याचा वापर करतात. पण तुम्हाला आल्याचे पाणी पिण्याचे फायदे माहितीयेत का? प्रसिद्ध आयुर्वेदिक डॉक्टर सलीम जैदी यांनी त्यांच्या यू-ट्युब चॅनेलवर याबाबतची माहिती शेअर केलीय.
1. सांधेदुखीपासून सुटका
डॉक्टर जैदी यांनी सांगितले की, सांधेदुखीच्या समस्येतून सुटका हवी असल्यास आल्याचे पाणी प्यावे. यातील अँटी-इन्फ्लेमेटरी आणि अँटी-ऑक्सिडंट्स गुणधर्मामुळे सांध्यांचे दुखणे दूर होण्यास मदत मिळेल.
2. वेट लॉस
आल्याचे पाणी प्यायल्यास शरीरातील फॅट्स जलदगतीने बर्न होण्यास मदत मिळेल. वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असाल तर जेवणानंतर आल्याचे पाणी प्यावे. हा उपाय केल्यास पोट आणि मांड्यांवरील चरबी कमी होण्यास मदत मिळेल.
3. रक्तशर्करा आणि हृदय
आल्यामध्ये अँटी-डाएबेटिक गुणधर्म आहेत, ज्यामुळे शरीरातील रक्तशर्करेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत मिळेल. तसेच आल्याचे सेवन केल्यास हृदयविकारांचा धोका देखील कमी होईल आणि हृदय निरोगी राहण्यास मदत मिळेल.
4. पचनप्रक्रिया
गॅस, अपचन, पोट फुगणे यासारख्या समस्यांपासून सुटका हवी असल्यास आल्याचे पाणी पिणे सुरू करावे. नियमित आल्याचे पाणी प्यायल्यास पोटासह यकृताचे आरोग्यही निरोगी राहण्यास मदत मिळेल.
(नक्की वाचा: Urinating During Bath: आंघोळ करताना लघवी का करू नये? आंघोळीदरम्यान लघवी होणे कोणत्या आजाराचे लक्षणं आहे? वाचा)
5. कोलेस्टेरॉलआल्याचे पाणी प्यायल्यास LDL म्हणजे खराब कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत मिळेल आणि चांगल्या कोलेस्टेरॉलची पातळी वाढेल. यामुळे हृदयाचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळू शकते.
(नक्की वाचा: Morning Routine for Weight Loss: वेट लॉससाठी रोज सकाळी करा या 6 गोष्टी, काही दिवसांतच व्हाल सडपातळ)
आल्याचे पाणी कसे तयार करावे?डॉक्टर सलीम जैदी यांनी सांगितलं की, एक चमचा किसलेले आले एक ग्लास पाण्यात गरम करा.
- पाणी गरम झाल्यानंतर गॅस बंद करावा. पाणी गाळून प्यावे.
- दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणानंतर तुम्ही आल्याचे पाणी पिऊ शकता.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

