Signs Of Stroke: हिवाळ्यातच पक्षाघाताचा धोका का वाढतो? तज्ज्ञांनी सांगितली महत्त्वाची माहिती

Paralysis Attack Symptoms : पक्षाघात म्हणजे काय? स्ट्रोक येण्याची काय आहेत लक्षणे आणि कारणे, जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली माहिती...

जाहिरात
Read Time: 2 mins

- डॉ पवन पै, इंटरव्हेंशनल न्यूरोलॉजिस्ट आणि स्ट्रोक स्पेशलिस्ट 

Paralysis Attack Symptoms : हिवाळ्यामध्ये स्ट्रोक येणाच्या प्रकरणांमध्ये वाढ होतात, जी अतिशय चिंताजनक बाब ठरू शकते. थंड हवामानामध्ये स्ट्रोक येण्याच्या वाढीव जोखमीमागील कारणे समजून घेणे, त्यावर प्रभावी औषधोपचार करण्यासह हिवाळ्यात स्वतःचे आरोग्य सुरक्षित ठेवणेही तितकेच आवश्यक आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पक्षाघात म्हणजे काय?

मेंदूला होणारा रक्तप्रवाह ठप्प झाला की स्ट्रोक येतो. स्ट्रोक आल्यानंतर चेहऱ्याचा भाग एका बाजूला झुकणे, हातामध्ये कमकुवतपणा येणे आणि बोलताना अडथळे निर्माण होणे यासारख्या समस्या निर्माण होतात. 

(नक्की वाचा: Walking Benefits : रिकाम्या पोटी चालण्याचा व्यायाम केल्यास काय होईल? वाचा 8 मोठे फायदे)

पक्षाघाताची लक्षणे

  • शरीराचा तोल जाणे
  • अस्पष्ट दिसणे 
  • चेहऱ्याचा भाग एका बाजूला झुकणे 
  • एक हात निष्क्रिय होणे
  • बोलताना अडथळे निर्माण होणे

हिवाळ्यामध्ये स्ट्रोक येण्यामागील कारणे

हिवाळ्यात थंड तापमानामुळे रक्तदाब वाढू शकतो, ज्यामुळे स्ट्रोकचाही धोका वाढण्याची शक्यता असते. थंड तापमानामुळे शरीरातील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, ज्यामुळे रक्तदाबाची समस्या वाढते. थंड हवामानात रक्ताच्या गुठळ्या तयार होऊ शकतात. शारीरिक हालचालींच्या अभावामुळे वजन वाढू शकते, कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू शकते आणि रक्तदाबही वाढू शकतो. परिणामी स्ट्रोक येण्याचाही धोका होतो.

Advertisement

यामुळे संवाद साधणे कठीण होते, नैराश्य, आतड्या तसेच लघवीशी संबंधित त्रास आणि अपंगत्व येणे यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.

काही लोकांना डिहायड्रेशनचा त्रास होतो, ज्यामुळे रक्ताच्या गुठळ्या होऊ शकतात आणि स्ट्रोक येण्याची शक्यता वाढते. स्ट्रोक टाळण्यासाठी प्रत्येकाने आवश्यक ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. 

Advertisement

(नक्की वाचा: Arthritis Symptoms And Causes : तरुणांमध्ये संधिवाताची समस्या वाढण्यामागील ही आहेत गंभीर कारणे)

स्ट्रोक टाळण्यासाठी आरोग्याची काळजी  घ्यावी?

उच्च रक्तदाबाच्या समस्येमुळे पक्षाघाताचा धोका मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. ही समस्या टाळण्यासाठी आरोग्याची योग्य पद्धतीने काळजी घेणे आवश्यक आहे. 

  • नियमितपणे तुमचा रक्तदाब तपासा. 
  • डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घ्या. 
  • हिवाळ्यातही नियमित व्यायाम करावा. 
  • तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार घरातच व्यायाम करण्याचा प्रयत्न करावा. 
  • नियमित किमान दोन तीन लिटर पाणी प्यावे. 
  • धुम्रपान आणि मद्यपान कमी करावे.  कारण धुम्रपान केल्याने रक्तवाहिन्या अरुंद होतात, ज्यामुळे रक्तदाब वाढतो आणि रक्तवाहिन्यांचे नुकसान होते.  

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )