जाहिरात

Walking Benefits : रिकाम्या पोटी चालण्याचा व्यायाम केल्यास काय होईल? वाचा 8 मोठे फायदे 

Benefits of Walking: काही लोकांना मॉर्निंग वॉक करणे आवडते तर काहींना संध्याकाळच्या वेळेस चालण्याचा व्यायाम करायला आवडते. पण रिकाम्या पोटी चालल्यास शरीरास अगणित लाभ मिळू शकतात. 

Walking Benefits : रिकाम्या पोटी चालण्याचा व्यायाम केल्यास काय होईल? वाचा 8 मोठे फायदे 

Benefits of Walking: रिकाम्या पोटी चालणे हा शरीरासाठी एक प्रभावी व्यायाम ठरू शकतो. योग्य पद्धतीने चालण्याचा व्यायाम केल्यास मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतात. चालण्याच्या व्यायामामुळे वजन नियंत्रणात राहण्यासह रक्ताभिसरण प्रक्रियाही सुधारते. विशेष म्हणजे हृदयाच्या आरोग्यासाठी हा व्यायाम फायदेशीर ठरतो. पण अनेकांना चालण्याची योग्य पद्धत माहिती नसते, त्यामुळे फायद्याऐवजी काहींना समस्यांचा सामना करावा लागतो. काहींना सकाळच्या वेळेस चालायला आवडते तर काही जण संध्याकाळी चालण्याचा व्यायाम करतात. पण रिकाम्या पोटी वॉक केल्यास शरीरास अगणित लाभ मिळू शकतात, जाणून घेऊया याबाबतची सविस्तर माहिती... 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

वजन घटण्यास मदत मिळते 

रिकाम्या पोटी चालण्याचा व्यायाम केल्यास शरीरातील फॅट्स जलदगतीने कमी होतात. काहीही न खातापिता चालण्याचा व्यायाम केल्यास शरीराकडून ऊर्जेसाठी फॅट्सचा वापर केला जातो. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळते. 

चयापचयाची क्षमता सुधारते 

सकाळी रिकाम्या पोटी चालण्याचा व्यायाम केल्यास शरीराची चयापचयाची क्षमता वाढते. कॅलरीज् बर्न करण्याची शरीराची क्षमता वाढते, ज्यामुळे दिवसभर शरीरातील अतिरिक्त कॅलरीज् बर्न होतात. 

Arthritis Symptoms And Causes : तरुणांमध्ये संधिवाताची समस्या वाढण्यामागील ही आहेत गंभीर कारणे 

(नक्की वाचा: Arthritis Symptoms And Causes : तरुणांमध्ये संधिवाताची समस्या वाढण्यामागील ही आहेत गंभीर कारणे)

शरीराची ऊर्जा वाढते 

रिकाम्या पोटी चालल्यास शरीराच्या रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुधारते, ज्यामुळे शरीराची ऊर्जा वाढते. आळसही दूर होतो. 

मानसिक आरोग्य सुधारते 

व्यायाम केल्याने शरीरामध्ये एंडोर्फिन हार्मोनचा स्त्राव होतो, ज्यामुळे मूड चांगला राहण्यास मदत मिळते. रिकाम्या पोटी चालण्याचा व्यायाम केल्यास तणाव कमी होतो आणि मानसिक आरोग्य सुधारते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Weight Loss Tips : वजन झटकन कमी करायचंय? फॉलो करा 6-6-6ची जबरदस्त ट्रिक

(नक्की वाचा :Weight Loss Tips : वजन झटकन कमी करायचंय? फॉलो करा 6-6-6ची जबरदस्त ट्रिक)

पचनसंस्थेसाठी लाभदायक 

रिकाम्या पोटी चालण्याचा व्यायाम केल्यास आतड्यांची हालचाल होते आणि पचनप्रक्रियाही सुधारते. यामुळे गॅस, अपचन यासारख्या पोटाशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत मिळते. 

हृदयाचे आरोग्य 

पायी चालण्याचा व्यायाम हा एक कार्डिओव्हॅस्क्युलर व्यायाम आहे, ज्यामुळे हृदयाचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते. रिकाम्या पोटी चालल्यास रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि हृदयविकारांचा धोका कमी होतो. 

वजन कमी करण्याच्या नावाखाली तुम्हीही दिवसभर पिताय गरम पाणी? वेळीच व्हा सावध 

(नक्की वाचा: वजन कमी करण्याच्या नावाखाली तुम्हीही दिवसभर पिताय गरम पाणी? वेळीच व्हा सावध)

शारीरिक क्षमता वाढते 

नियमित चालण्याचा व्यायाम केल्यास शरीराची क्षमता वाढते. ज्यामुळे तुम्ही अन्य व्यायाम आणि शारीरिक क्रिया देखील सहजरित्या करू शकता. 

झोप चांगली येते 

नियमित स्वरुपात व्यायाम केल्यास झोपेशी संबंधित समस्या कमी होतात. चालण्याच्या व्यायामामुळे शरीराला आराम मिळतो आणि चांगली झोप मिळते. 

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com