Skin Care Tips In Marathi: त्वचा सुंदर, सतेज आणि नितळ दिसावी; यासाठी लोक महागड्या क्रीम, फेस पॅक, पार्लर ट्रीटमेंट करतात. पण इतका पैसा खर्च करूनही त्वचेशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळत नाही. ऋतुनुसार त्वचेशी संबंधित समस्यांमध्ये बदल होत राहतो. त्यानुसार स्किन केअर रुटीनही बदलावे लागते. त्वचा सुंदर दिसावी यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च करण्याऐवजी काही घरगुती उपाय केल्यास ते त्वचेसाठी फायदेशीर ठरू शकतात. काही लोक हिवाळ्यामध्ये बेसन फेस पॅक वापरतात. बेसनमधील गुणधर्मामुळे त्वचा मऊ, चमकदार होते. याच प्रमाणे आणखी एक घरगुती फेस पॅक तुम्ही वापरू शकता. तांदळाच्या पिठाचा लेप चेहऱ्यावर लावल्यास त्वचेशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळू शकते.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
तांदळाचे फेस पॅक (Rice Flour Face Pack)
- तांदळाचे फेस पॅक वापरण्यापूर्वी काही गोष्टी जाणून घेणे गरजेचे आहे. अन्यथा फायद्यांऐवजी नुकसान होऊ शकतात.
- सर्वप्रथम तुमच्या त्वचेचा प्रकार जाणून घ्या.
- तुमची त्वचा अतिशय संवेदनशील आणि कोरडी असेल तर तांदळाच्या मास्कमुळे त्वचेवर जळजळ होऊ शकते, त्वचा कोरडी होऊ शकते.
- म्हणूनच तांदळाचे मास्क वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट करून पाहावी.
- अॅलर्जी असल्यास तांदळाचे फेस पॅक वापरू नये.
- तांदळाचे पॅक चेहऱ्यावर लावल्यास ते 10-15 मिनिटांहून अधिक वेळ त्वचेवर ठेवू नये.
- यानंतर थंड किंवा कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवावा.
(नक्की वाचा: Hair Care Tips: केस होतील घनदाट आणि लांबसडक, असा करा तुपाचा वापर)
कसे तयार करावे फेस पॅक?
- एक मोठा चमचा तांदळाचे पीठ किंवा एक चमचा तांदूळ मिक्सरमध्ये वाटून घ्या.
- पिठामध्ये पाणी आणि अॅलोव्हेरा जेल मिक्स करा. पॅक तयार झाल्यानंतर चेहऱ्यावर लावा.
- 15 मिनिटांनंतर चेहरा स्वच्छ धुऊन घ्यावा.
तांदळाचे फेस पॅकचे फायदे
- तांदूळ हे एक नॅचरल एक्सफॉलिएटर आहे. ज्यामुळे त्वचा मऊ होण्यास मदत मिळते.
- तांदळातील पोषणतत्त्वांमुळे त्वचा हायड्रेटेड राहते.
- त्वचेवरील डाग, मुरुमांची समस्या कमी होण्यास मदत मिळू शकते.
- तांदळाच्या फेस पॅकवर त्वचेवर नैसर्गिक चमक येण्यास मदत मिळू शकते.
(नक्की वाचा :Winter Skin Care Tips : कोरड्या त्वचेमुळे आहात त्रस्त? या सोप्या 3 उपायांमुळे चेहऱ्यावर येईल तेज)
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world