Homemade Face Glowing Cream: अपुरी झोप, धकाधकीच्या लाइफस्टाइलमुळे बहुतांश लोकांच्या चेहऱ्यावरील नैसर्गिक चमक नाहीशी होते. चेहऱ्यावर तेज यावं, यासाठी लोक महागड्या प्रोडक्ट्सचा वापर करतात. पण अधिकचा पैसा खर्च करण्याऐवजी घरच्या घरी फेस ग्लो क्रीम तयार करू शकता. याद्वारे शरीराला पोषणतत्त्वांचा पुरवठा होईल आणि त्वचेचे केमिकलयुक्त ब्युटी प्रोडक्ट्सपासून संरक्षणही होईल. शिवाय त्वचा निरोगी राहण्यासही मदत मिळेल.
घरच्या घरी फेस ग्लो क्रीम कशी तयार करावी? (How To Make Face Glow Cream At Home)
- घरच्या घरी फेस ग्लो क्रीम तयार करण्याची प्रक्रिया अतिशय सोपी आहे.
- दोन चमचे कोरफडीचा गर
- एक चमचा ग्लिसरीन
- एक चमचा गुलाब पाणी
- त्वचा कोरडी असेल तर नारळाच्या तेलाचे चार ते पाच थेंब
- सर्व सामग्री एकत्रित करून एका डब्यात भरा
- घरगुती क्रीममुळे त्वचा हायड्रेट राहील आणि चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येईल
- रोज रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर क्रीम लावा
चेहऱ्यावर लगेचच ग्लो येण्यासाठी काय करावे? (What To Apply For Instant Face Glow)
- चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो येण्यासाठी तांदळाचे पीठ आणि कच्चे दूध एकत्रित करून पेस्ट चेहऱ्यावर लावा.
- 10 मिनिटांनंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावा.
- त्वचेवरील डेड स्किनची समस्या कमी होईल.
(नक्की वाचा: Black Raisins Benefits: रोज 5 मनुके पाण्यात भिजवून खाल्ल्यास काय होईल? कोणत्या समस्यांमधून मिळेल मुक्तता?)
रात्री झोपताना चेहऱ्यावर काय लावावे? (What To Apply On Face At Night)
- रात्री झोपण्यापूर्वी चेहरा पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावा.
- यानंतर कोरफड जेल किंवा घरच्या घरी तयार केलेली क्रीमचा वापर करावा.
- हाताने चेहऱ्याचा मसाज करावा, यामुळे चेहऱ्याच्या भागातील रक्ताभिसरण प्रक्रिया सुधारेल.
- त्वचा कोरडी असेल तर बदामाच्या तेलाने चेहऱ्याचा मसाज करावा.
(नक्की वाचा: Amla Benefits: आवळा हे हिवाळ्यातील सुपरफुड का मानले जाते? थंडीत आवळा खाल्ल्यास काय होते? वाचा 5 फायदे)
सकाळच्या ब्युटी केअर रुटीन कसं फॉलो करावं?- सकाळी उठल्यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुऊन घ्या.
- यामुळे त्वचा फ्रेश होईल. यानंतर क्लींझर चेहऱ्यावर लावा.
- गुलाब जल किंवा टोनरने चेहरा स्वच्छ करावा.
- घरातून बाहेर पडण्यापूर्वी सनस्क्रीन लावायला विसरू नका.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

