जाहिरात

Maharashtras 288 Municipal Election Result 2025: काँग्रेस भाजपची B टीम! रोहित पवार स्पष्टच बोलले

Jamkhed Nagar Parishad Election 2025 Result: जामखेड नगर परिषदेसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपच्या प्रांजल चिंतामणी यांची नगराध्यक्षपदी निवड झाली आहे.

Maharashtras 288 Municipal Election Result 2025: काँग्रेस भाजपची B टीम! रोहित पवार स्पष्टच बोलले
Jamkhed Nagar Parishad Election 2025 Result: नगर परिषद निवडणुकीतील अपयश रोहित पवारांच्या जिव्हारी लागलंय.
रोहित पवार X
मुंबई:

राज्यात 288 नगरपालिकांच्या निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबर 2025 रोजी लागला. या निवडणुकीत भाजप हा राज्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनला आहे. या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर शिवसेना, तिसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. महाविकास आघाडीबाबत बोलायचे झाल्यास शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे प्रत्येकी 10 नगराध्यक्ष निवडून आले आहेत. काँग्रेसला 30 ठिकाणी आपले नगराध्यक्ष निवडून आणण्यात यश आले आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या एकूण नगरसेवकांच्या संख्येपेक्षा जास्त नगराध्यक्ष एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने निवडून आणले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 57 नगराध्यक्ष निवडून आले आहेत.  या निकालामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गट निराश झाला असून या पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या निकालानंतर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, हा निकाल निराशाजनक असून तो काम करणाऱ्याला नाऊमेद करणारा आहे. आपली निराशा व्यक्त करतानाच रोहित पवार यांनी महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेसवर टीका केली आहे. 

नक्की वाचा: राज्यातील 288 नगरपालिकांमध्ये कोण जिंकलं?, वाचा संपूर्ण यादी

काँग्रेसने जातीयवादी पक्षाच्या विजयाला हातभार लावला!

रोहित पवार यांनी X वर पोस्ट करताना म्हटलंय की "जनतेने दोनदा मतांचं दान भरभरुन पदरात टाकलं, त्यांच्या मी कायम ऋणात राहिल, पण कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले आणि उमेदवारांनीही पूर्ण ताकदीने निवडणूक लढवली तरी आज लागलेला हा निकाल अत्यंत निराशाजनक आणि काम करणाऱ्याला नाऊमेद करणारा आहे. जनतेवर आक्षेप नाही पण सगळीकडे पैसाच चालत असेल तर बचत गट चालक, शेतकरी, दुकानदार आणि इतर अशा राजकीय दृष्टीकोनातून दुर्लक्षित आणि सामान्य कुटुंबातील उमेदवारांना आम्ही सत्तेच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करत होतो, त्यांना न्याय कधी मिळणार, हा प्रश्नच आहे. 

आज तत्व आणि विकासावर चालणारं स्वच्छ राजकारण कमी आणि पैशांनी गढूळ झालेलंच अधिक दिसतं. म्हणूनच आमच्या विरोधात निवडून आलेल्या काही लोकांचे कारनामे आणि धंदे बघितले तर चारचौघात त्या धंद्यांचं नाव घेण्याचीही लाज वाटते… मग अशा परिस्थितीत डोक्यात विचारांचं काहूर उठल्याशिवाय राहत नाही! 

महत्त्वाचं म्हणजे काही अपक्षांनी तसंच धर्मनिरपेक्ष आणि समतेचा जप करणाऱ्या काँग्रेसने भाजपाच्या उमेदवाराला स्वतःच्या तिकिटावर उभं करुन भाजपाची बी-टीम म्हणून काम करत जातीयवादी पक्षाच्या विजयाला हातभार लावला आणि लोकंही त्यांच्या या तिरक्या चालीला बळी पडले. त्यामुळं यापुढं काँग्रेसच्या जिल्ह्यातल्या नेत्यांवरही कसा विश्वास ठेवायचा, हाही प्रश्नच आहे.

रोहित पवार यांची X पोस्ट

जामखेड नगर परिषदेसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपच्या प्रांजल चिंतामणी यांची नगराध्यक्षपदी निवड झाली आहे. या नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपने  नगराध्यक्षपदासह 15 जागांवर विजय मिळवला आहे. इथल्या निवडणुकीत भाजप नेते आणि विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे रोहित पवार यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली होती.  

नक्की वाचा: मतदारांनी कौल दिला, नशिबाने गमावला.. मंचरमध्ये 'ईश्वर चिठ्ठी'ने नगरसेवक ठरला!

Listen to the latest songs, only on JioSaavn.com