Mumbai Local Viral Video: मुंबई लोकलमध्ये महिला प्रवाशांना सुरक्षितपणे सेवा पुरवण्यासाठी मुंबई पोलीस, रेल्वे पोलीस कार्यरत असतात. मात्र अनेकदा मुंबई लोकलमध्ये माथेफिरुंची, टोळक्यांची दादागिरी पाहायला मिळते, ज्यामुळे महिला प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. महिलांच्या डब्यामध्ये शिरुन अश्लील चाळे केल्याच्या, मारहाण केल्याच्या घटनाही मुंबई लोकलमध्ये घडतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक संतापजनक व्हिडिओ समोर आला आहे, ज्याने मुंबई लोकलमध्ये महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
माथेफिरु महिलांच्या ट्रेनमध्ये चढला, तरुणीला ढकललं!
मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या लोकलमधील महिला डब्यात घुसखोरी करणाऱ्या एका विकृताने १८ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीला धावत्या लोकलमधून ढकलून दिल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी घडली. पनवेल ते खांदेश्वर स्थानकांदरम्यान ही घटना घडली असून, सुदैवाने या तरुणीचा जीव वाचला आहे. या घटनेने रेल्वेतील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, श्वेता संजय महाडीक ही १८ वर्षीय तरुणी खारघर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. गुरुवारी सकाळी ७:५९ च्या पनवेल-सीएसएमटी लोकलने ती मैत्रिणीसह जात होती. यावेळी महिलांच्या डब्यात शेख अख्तर नवाज हा पुरुष प्रवासी शिरला. महिला प्रवाशांनी त्याला जाब विचारत डब्यातून उतरण्यास सांगितले. याचा राग मनात धरून शेख याने धावत्या गाडीत श्वेताला जोराचा धक्का देऊन रुळावर ढकलून दिले.
धक्कादायक व्हिडिओ...
50 year old Shaikh Akhtar Nawaz boarded the ladies compartment of Mumbai Local, he was confronted by 18yr Old College Shweta Mahadik, angry Shaikh pushed Shweta from the moving train; she's in hospital pic.twitter.com/g0dVd32Hlp
— Mihir Jha (@MihirkJha) December 20, 2025
या भीषण अपघातात श्वेताच्या डोक्याला आणि कंबरेला गंभीर दुखापत झाली आहे. घटनेनंतर आरोपीने पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र खांदेश्वर स्थानकातील प्रवाशांनी प्रसंगावधान राखत त्याला पकडून रेल्वे पोलिसांच्या हवाली केले. भरदिवसा आणि गर्दीच्या वेळी घडलेल्या या प्रकारामुळे रेल्वे पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. दरम्यान, या ,संपूर्ण घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
VIDEO: रुम नव्हे डंपिग ग्राऊंड! गेमिंगच्या नादात तो 2 वर्ष बाहेर पडलाच नाही, खोलीची अशी भयाण अवस्था
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world