जाहिरात

Union Budget 2026: यंदाचा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी रोजी मांडला जाणार की नाही? का आहे संभ्रम?

भारतात 2017 सालापासून अर्थसंकल्प दरवर्षी 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता सादर करण्याची परंपरा आहे. मात्र, 2026 मध्ये 1 फेब्रुवारी रोजी रविवार आहे.

Union Budget 2026: यंदाचा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी रोजी मांडला जाणार की नाही? का आहे संभ्रम?
बजट 2026 के डेट को लेकर कंफ्यूजन गहरा गया है.
  • भारत में वित्त वर्ष 2025-26 का बजट आमतौर पर एक फरवरी को पेश किया जाता है, पर इस बार तारीख सस्पेंस में है.
  • 2026 में एक फरवरी रविवार होने के कारण बजट इसी दिन पेश होगा या नहीं, इस पर अभी तक कोई निर्णय नहीं हुआ है.
  • बजट पेश करने की एक फरवरी की परंपरा 2017 में तत्कालीन वित्त मंत्री अरुण जेटली ने शुरू की थी.
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

Budget 2026 Date:  नवीन वर्ष म्हणजे केवळ नवीन आशा-आकांक्षा नव्हे, तर देशाच्या अर्थव्यवस्थेची दिशा ठरवणारा 'केंद्रीय अर्थसंकल्प' देखील घेऊन येतो. भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण वित्त वर्ष 2025-26 साठीचा अर्थसंकल्प सादर करतील. मात्र, यावेळेस अर्थसंकल्पाच्या तारखेवरून मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. नेहमीप्रमाणे 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर होणार की तारीख बदलणार? जाणून घेऊया यामागील नेमकं कारण.

1 फेब्रुवारीला रविवार असल्याने निर्माण झाला पेच

भारतात 2017 सालापासून अर्थसंकल्प दरवर्षी 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता सादर करण्याची परंपरा आहे. मात्र, 2026 मध्ये 1 फेब्रुवारी रोजी रविवार आहे. सामान्यतः रविवारी सरकारी कार्यालये आणि शेअर बाजार बंद असतात. अशा परिस्थितीत, अर्थमंत्री त्याच दिवशी अर्थसंकल्प सादर करतील की नाही, याबाबत अद्याप स्पष्टता मिळालेली नाही.

(नक्की वाचा-  मल्लिका शेरावतने 'व्हाईट हाऊस'मध्ये ट्रम्प यांच्या ख्रिसमस डिनरला लावली हजेरी; "आमंत्रण कसं मिळालं?"...)

काय आहेत शक्यता?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्थसंकल्पाच्या तारखेबाबत सध्या तीन पर्यायांवर चर्चा सुरू आहे.

  • 31 जानेवारी (शनिवार) म्हणजेच एक दिवस आधी अर्थसंकल्प सादर केला जाऊ शकतो. यापूर्वीही शनिवारी बजेट सादर झाले आहेत.
  • 1 फेब्रुवारी (रविवार) सुट्टी असूनही परंपरेनुसार त्याच दिवशी बजेट मांडला जाऊ शकतो.
  • 2 फेब्रुवारी (सोमवार) रोजी सुट्टीनंतरच्या पहिल्या कामकाजाच्या दिवशी बजेट सादर केले जाऊ शकतो.
  • विशेष म्हणजे, 1 फेब्रुवारी रोजी संत रविदास जयंती देखील आहे. ज्यामुळे सुट्टीचे महत्त्व अधिक वाढते. यावर अंतिम निर्णय 'संसदीय व्यवहारांच्या कॅबिनेट समिती' कडून घेतला जाईल.

इतिहासातील काही महत्त्वाचे संदर्भ

  • 2017 च्या सुरुवातीला तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बजेट 1 फेब्रुवारीला सादर करण्याची परंपरा सुरू केली होती. त्याआधी बजेट फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी सादर केले जायचे.
  • माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी 28 फेब्रुवारी 1999 रोजी रविवारी बजेट सादर केले होते. इतकेच नाही तर, त्यांनीच बजेट सादर करण्याची वेळ संध्याकाळी 5 वरून सकाळी 11 वाजेवर आणली होती.
  • यावर्षी म्हणजे *2025* मध्ये 1 फेब्रुवारी रोजी शनिवार होता आणि त्या दिवशी अंतरिम बजेट सादर करण्यात आले होते.

(नक्की वाचा-  Washim News: वाशिममध्ये भाजप उमेदवाराची 'दादागिरी', ठाकरे गटाच्या उमेदवाराला मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी)

शेअर बाजाराची भूमिका महत्त्वाची

अर्थसंकल्पाचा सर्वात मोठा परिणाम शेअर बाजारावर होतो. जर रविवारी अर्थसंकल्प सादर केला, तर त्या दिवशी शेअर बाजार विशेष सत्रासाठी उघड ठेवावा लागेल. त्यामुळे गुंतवणूकदार आणि आर्थिक विश्लेषकांचे डोळे आता सरकारच्या अधिकृत घोषणेकडे लागले आहेत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com