- डॉ कुशल बांगर, जनरल फिजिशियन आणि इंटेन्सिव्हिस्ट, एम्स हॉस्पिटल, डोंबिवली
मधुमेहग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. लहानांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्व वयोगटातील लोकांमध्ये हा आजार आढळतो. मधुमेह होण्यामागील प्रमुख कारण खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि अयोग्य जीवनशैली असू शकतात. इन्सुलिनच्या कमतरतेमुळे रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढल्यामुळे हा गंभीर आजार उद्भवू शकतो, यापासून दूर राहायचे असेल तर आतापासूनच आहाराची काळजी घ्यायला सुरुवात करा. तसेच मधुमेहग्रस्तांनीही आहाराची पुरेपूर काळजी घेणे आवश्यक आहे. दरवर्षी 14 नोव्हेंबरला जागतिक मधुमेह दिवस (World Diabetes Day 2024) साजरा केला जातो. या दिवशी मधुमेह आजाराबाबत जनजागृती केली जाते.
(नक्की वाचा: World Diabetes Day : उपाशी राहणाऱ्यांनाही डायबेटीस होण्याचा धोका)
मधुमेह असणाऱ्या रुग्णांना रक्तशर्करेच्या असंतुलनामुळे समस्यांचा सामना करावा लागतो. या समस्या टाळण्यासाठी तुम्ही तुमच्या लाइफस्टाइलमध्ये बदल केला, पौष्टिक आहाराचे सेवन केले तर मधुमेहाची समस्या नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळू शकते. आहारव्यतिरिक्त मधुमेहाच्या रुग्णांनी पुरेशा प्रमाणात झोप घेणे तितकेच गरजेचे आहे.
रात्रीच्या वेळेस रक्तशर्करेची पातळी वाढण्याची समस्या रुग्णांमध्ये अधिकतर आढळते, म्हणूनच रात्रीचे जेवण संध्याकाळी 7-8 वाजेदरम्यान केले पाहिजे. जेणेकरुन अन्नाचे पचन होण्यास वेळ मिळतो. महत्त्वाचे म्हणजे डाएटमध्ये फायबर आणि प्रथिनेयुक्त पदार्थांचा समावेश करावा. कार्बोहायड्रेट्सयुक्त पदार्थ टाळावे आणि रात्रीच्या वेळेस पचनास हलका आहार असावा.
(नक्की वाचा: Heart Disease: शरीरातील या गंभीर लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, कारण तुमच्या हृदयाची धडधड होईल कायमची बंद)रात्रीचे संतुलित जेवण
मधुमेहाच्या रुग्णाने रात्रीचे जेवण संतुलित स्वरुपातचेच केले पाहिजे. प्रथिने, कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स आणि भाज्यांचा जेवणामध्ये समावेश असावा. लाल रंगाचा तांदूळ आणि वाफवलेल्या भाज्यांसह ग्रील्ड चिकन खाऊ शकता.
आराम करावा
मधुमेहाच्या रुग्णांनी पुरेश झोप घेण्यासह आराम करणेही आवश्यक आहे. ध्यानधारणा करावी, सोप्या स्वरुपातील व्यायाम करावे.
पुरेशी झोप घ्यावी
मधुमेहाच्या रुग्णाने त्यांच्या शरीरातील रक्तशर्करेची पातळी नियंत्रणात राहावी, यासाठी सात ते आठ तास झोपणे आवश्यक आहे.
(नक्की वाचा: Hair Growth Tips: नाभीवर हे तेल लावून करा मसाज, केसांची होईल जबरदस्त वाढ)मद्यपान टाळावे
मद्यपानामुळे शरीरातील रक्तशर्करेची पातळी अचानक वाढू शकते, यामुळे मद्यपान करणे टाळावे.
झोपण्यापूर्वी जास्त पाणी पिऊ नये
रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला पाणी पिण्याची सवय असेल तर ही सवय वेळीच सोडावी. मधुमेहग्रस्तांमध्ये वारंवार लघवीला जाण्याची समस्या असतेच झोपण्यापूर्वी पाणी प्यायल्यास तुमच्या झोपेवर परिणाम होतो.
रात्री झोपण्यापूर्वी साखरेची पातळी तपासा
नियमित रक्तशर्करेची पातळी तपासणे गरजेचे आहे. रात्री झोपण्यापूर्वीही रक्तशर्करेची पातळी तपासणे आवश्यक आहे. तसेच रात्रीच्या वेळेत रक्तशर्करेची पातळी 88-80 mg/dL इतक्या श्रेणीमध्ये असावी.
जेवणानंतर शतपावली करावी
जेवणानंतर थेट झोपण्याऐवजी थोडा शतपावली करावी, यामुळे मधुमेहग्रस्तांच्या आरोग्यास अगणित लाभ मिळू शकतात.
झोपण्यापूर्वी दात घासा
मधुमेहग्रस्तांनी दात आणि हिरड्यांची अधिक काळजी घ्यावी. टाइप 2 मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी झोपण्यापूर्वी दात घासणे गरजेचे आहे. कारण यामुळे हिरड्यांचे आजार आणि दातांमध्ये पोकळी निर्माण होण्याची आवश्यकता असते.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world