जाहिरात

Heart Disease: शरीरातील या गंभीर लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, कारण तुमच्या हृदयाची धडधड होईल कायमची बंद 

Heart Disease: शरीरामध्ये आढळणाऱ्या या लक्षणांद्वारे तुमचे हृदय निरोगी की रोगी, हे समजते. तुम्ही करताय का याकडे दुर्लक्ष? वेळीच व्हा सावध, अन्यथा..

Heart Disease: शरीरातील या गंभीर लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, कारण तुमच्या हृदयाची धडधड होईल कायमची बंद 

Heart Disease : हृदयविकार हा अतिशय गंभीर आजार आहे. या विकारामागील कारणे वेगवेगळी असू शकतात. उदाहरणार्थ धूम्रपान, बैठ्या स्वरुपाचे काम, उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्ट्रॉलची पातळी, मधुमेह, लठ्ठपणा, ताणतणाव यासारख्या कारणांमुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. धकाधकीच्या जीवनामुळे नैराश्य येणे, ताणतणाव वाढणे, खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल होणे, अपुरी झोप या सर्व गोष्टींचा परिणाम थेट हृदयावर होत असतो. ज्यामुळे संपूर्ण शरीराच्या कार्यक्षमतेवर दुष्परिणाम होतात. हृदयाशी संबंधित गंभीर समस्या उद्भवल्यास तातडीने डॉक्टरांना संपर्क साधावा आणि औषधोपचार सुरू करावे. यामध्येही काही जणांना कार्डिअ‍ॅक अरेस्ट आणि हार्ट अटॅक या गोष्टी सारख्याच वाटतात. पण तसे नाहीय, हे लक्षात घ्या मंडळींनो. 

कार्डिअ‍ॅक अरेस्ट म्हणजे काय?

हृदयाचे काम करणं पूर्णपणे बंद होते, या स्थितीस 'कार्डिअ‍ॅक अरेस्ट' असे म्हणतात. एकूणच हृदयाची क्रिया अचानक बंद पडते. या स्थितीमध्ये रक्ताभिसरण आणि हृदय धडधडण्याची प्रक्रिया बंद होते, म्हणजेच हृदयाला होणारा रक्तपुरवठा पूर्णपणे बंद होतो. त्यामुळे कार्डिअ‍ॅक अरेस्ट आल्यास काही मिनिटांतच रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो.

हृदयविकारांची समस्या असणाऱ्यांना कार्डिअ‍ॅक अरेस्ट येण्याची शक्यता अधिक असते. कार्डिअ‍ॅक अरेस्ट येण्यापूर्वी छातीत दुखणे, श्वासोच्छवास प्रक्रियेमध्ये त्रास निर्माण होणे, चक्कर येणे, शुद्ध हरपणे, थकवा येणे किंवा डोळ्यासमोर अंधारी येणे यासारख्या समस्या निर्माण होतात.  

वरील लक्षणे आढळताच रुग्णाला कार्डियोपल्मोनरी रेसस्टिसेशन (सीपीआर) दिले जाते, जेणेकरुन त्याच्या हृदयाचे ठोके सामान्य होण्यास मदत मिळते.  

Hair Growth Tips: नाभीवर हे तेल लावून करा मसाज, केसांची होईल जबरदस्त वाढ

(नक्की वाचा: Hair Growth Tips: नाभीवर हे तेल लावून करा मसाज, केसांची होईल जबरदस्त वाढ)

हृदयविकाराच्या झटक्याला वैद्यकीय भाषेत मायोकार्डियल इन्फ्रक्शन असेही म्हणतात. झटका आल्यानंतर हृदयाच्या रक्तप्रवाहात अडथळे निर्माण होतात. म्हणजेच हृदयाचे काम सुरू असले तरी ते सक्षमपणे काम करत नसते.  

हृदयरोगाचे निदान करण्यासाठी काही वैद्यकीय तपासणी कराव्या

  • कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइडची पातळी तपासण्यासाठी रक्ताची तपासणी
  • स्ट्रेस टेस्ट 
  • इलेक्ट्रोकार्डिओग्रॅम (ईसीजी) 
  • इकोकार्डिओग्रॅम (2 डी एको) 
  • टिल्ट चाचणी 
  • इलेक्ट्रॉफिसिओलॉजिक चाचणी 
  • कोरोनरी अँजिओग्राम
  • सीटी (संगणकीय टोमोग्राफी) स्कॅन 

Heart Health: कार्डिअ‍ॅक अरेस्ट आणि हार्ट अटॅकमध्ये आहे इतका मोठा फरक, दुर्लक्ष करू नका; अन्यथा...

(नक्की वाचा: Heart Health: कार्डिअ‍ॅक अरेस्ट आणि हार्ट अटॅकमध्ये आहे इतका मोठा फरक, दुर्लक्ष करू नका; अन्यथा...)

डाएट कसे असावे?

आहारात ताजी फळे आणि भाज्यांचा समावेश असणे आवश्यक आहे. याद्वारे शरीराला जीवनसत्त्व, खनिज आणि फायबरचा पुरवठा होतो; जे हृदयाच्या आरोग्यासाठीही गरजेचे असते. एकाच तेलामध्ये वारंवार तळलेले पदार्थ खाणे टाळा. याऐवजी डाएटमध्ये ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड किंवा सॅच्युरेटेड फॅट्स असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. 

Warm Water & Blood Pressure : गरम पाणी प्यायल्याने रक्तदाब वाढतो का? 

(नक्की वाचा: Warm Water & Blood Pressure : गरम पाणी प्यायल्याने रक्तदाब वाढतो का?)

हार्ट अटॅकच्या रुग्णांसाठी कोणत्या पद्धतीचे उपचार केले जातात?

हार्ट अटॅक आलेल्या रुग्णावर दोन प्रकारे औषधोपचार केले जातात. मेडिकल ट्रिटमेंट आणि दुसरे म्हणजे अँजिओग्राफी किंवा अँजिओप्लास्टी यासारखे उपचार केले जातात. मेडिकल ट्रिटमेंटमध्ये हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या वाहिन्यांमध्ये झालेल्या गाठींची समस्या सोडवली जाते.  

दुसरीकडे बायपास सर्जरीही केली जाते. या शस्त्रक्रियेपूर्वी ईसीजी, इकोकार्डिओग्रॅम, अँजिओग्राफी, छातीचा एक्स-रे, रक्त आणि लघवीची तपासणीसह इत्यादी चाचणीही केली जाते. वैद्यकीय अहवाल आल्यानंतर डॉक्टर औषधोपचाराबाबतचे योग्य ते सल्ला देतात.

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: